भारत-तैवान-चीन - एक सुवर्णसंधी
गेल्या आठवड्यात ट्रंपने तैवानच्या अध्यक्षाला फोन केल्याची बातमी वाचली. त्यावरुन चिनने केलेला थयथयाट पण पाहिला. खरतर ही भारतासाठी असलेली सुवर्णसंधी आहे.
आजपर्यंत तैवान हा चिनचा भाग आहे ही दिलेली मान्यता आपण आता काढुन घ्यायला हवी. तैवानला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणुन मान्यता द्यायला हवी.
खरतर चिनचा ग्वादार बंदर आणी एकुणच CPEC योजनेला भारताची ही भुमिका जबर धक्का ठरेल. विशेषतः अमेरिका+ भारत अशा दोघांनीही ही घोषणा केली तर जगाचा याकडे बघायचा द्रुष्टीकोनच बदलेल. आणी ते योग्यच आहे. भारताला तैवानचा उपयोग पूर्वेकडचे भारताचे ग्वादार म्हणुन करता येईल.