परवाच सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली.. एकाचवेळी दोन प्रतिक्रिया मनात उमटत होत्या. शिवाजी महाराजांचा पराक्रमाचे प्रतीक पाहून अभिमानाने छाति भरून यत होती तर दुसर्याच वेळी किल्ल्याची झालेली द्यनीय अवस्था पाहून लाजेने मान खाली झुकत होती. काय रुबाब होता एक वेळ सिंधुदुर्गाचा!!! अरबी समुद्राच्या लाटेला न जुमनता थेट परकीय जुलमी राजवटीला आव्हान देत मराठ्यांचे समुद्रावर वर्चस्व निर्माण करणारा आज तोच त्या समुद्राच्या लाटांमधे स्वतहाचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतोय. कधी ओळखणार आपण ह्या किल्ल्यांची किंमत, एकेठिकाणी आधुनिक शिवसमारक उभारताना त्याच अरबी समुद्रात आपल्या अस्तित्वाची लढाई देत अजूनही ठामपणे उभ्या असलेल्या मराठांच्या वारसदारांची आर्त हाक केव्हा ऐकू येईल आपल्याला?? शेवटी काळ बदलला असला तरी शिवरायांचे गडकील्ले मात्र अजूनही लढत आहेत, त्यावेळी गनिम होते आणि ह्यावेळी निसर्ग. कधी संपेल आपल्या किल्ल्यांची लढाई?? कधी येतील त्याना अच्छे दिन? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधत जड अंत:कर्णाने सिंधुदुर्गाचा निरोप घेतला...
प्रतिक्रिया
10 Mar 2017 - 4:21 pm | दिगोचि
भारतीयाना आपल्या इतिहासाविशयी कुतुहल नाही आनि गर्व पण नाही. त्यामुळे आपल्या अनेक ऐतिहसिक वस्तुन्ची प्रिस्थिती आज खरब आहे. यात अर्थात राज्यकर्ते व इतर पक्शान्चे नेते यान्चा उल्लेख करवा लागेल. या वस्तुन्ची डगदुजी करायला जे लोक लागतील ते देखील यवयाला तयारहि होतील की नाही याची शन्काच वाटते.
11 Mar 2017 - 12:53 pm | टवाळ कार्टा
अगदी अगदी...आपल्या भाषेचाही खून आपणच करतो
13 Mar 2017 - 8:04 am | संजय पाटिल
मोकलाया... आठवले!
11 Mar 2017 - 12:38 am | ज्योति अळवणी
खरंय! आपले गढ आणि किल्ले ऐतिहासिक वारसा म्हणून जतन केलेच पाहिजेत. पण मनात एक प्रश्न येतो... ही जवाबदारी केवळ सरकारचीच आहे का? आपण जर कोणाला तिथे काही चुकीच्या गोष्टी करताना बघितलं तर आपण त्यांना थांबवतो का? बरं, कदाचित त्यांना थांबवणं आपल्या प्राणावर बेतू शकत पण मग आपण पोलिसांना काही कळवतो का? जर पोलीस काहीच करणार नाहीत असं वाटत असेल तर आपण त्यापुढे जाऊन काही करतो का?
मला वाटत वाईट वाटून घेणं आणि दुःख करणं सोपं असत. यावरचे उपाय आपण शोधुया की. कदाचित सर्कसरी यंत्रणा असेल देखील असे ऐतिहासिक वारसे जतन करण्या संदर्भात. आपण मिपाकर एकत्र येऊन माहिती घेऊया आणि जवाबदारी देखील. काय वाटत? निदान एखाद्या किल्ल्यासाठी तर प्रयत्न करता येईल न!
14 Mar 2017 - 3:49 pm | मनिमौ
पण भितीदायक आहे. कालच पुण्यात गुड लक चौकात राॅन्ग साईड ने गाडी का चालवली हे विचारल्यावर त्या मोटारसायकल वाल्याने तरूणाला भोसकले.