स्पर्श
एक असह्य वेदना आणि मग एक विचित्र मोकळेपणाचा आभास …. डोळ्यावर आलेली ती तंद्री, तरी पण त्या मध्ये घड्याळाकडे पाहण्याची तळमळ. वेळ पहिली आणि डोळे आपोआप मिटले. आजूबाजूला होणारी लगबग, आवाज, वेदनाच्या किंकाळ्या सर्व काही एकू येत होत, जाणवत होत. पण शरीर खूप थकल होत. मग मला उचलून स्ट्रेचर वर ठेवण्यात आल. वार्ड बोय आणि मावशाची धावपळ उमगत होती. पण डोळे बंदच होते, जणू कल्पोकल्पाचा भार वाहून आज मी मोकळी झाली होते त्यातून. सिस्टर कसले तरी गाठोळे माझ्या मांडी वर देऊन मला बाहेर नेण्याची सूचना करत होत्या मावशींना . दरवाजा उघडण्याचा किरकिर आवाज ऐकला आणि बाहेर येताच आईचा हाताचा स्पर्श जाणवला कपाळावर.