भयकथांचे रमाकांत आचरेकर : लवक्राफ्ट
"तुम्हाला कसिनोत जाऊन जर रुले ( म्हणजे ते फिरणारे चक्र) खेळायचे असेल तर तुम्हाला सुतारकाम शिकून फायदा नाही, तुम्हाला गणित शिकावे लागेल" - गणित तज्ञ् तालेब
एकदा क्रिकेट मधील जाणकारांच्या पार्टीत रमाकांत आचरेकर ह्यांच्या नावाचा उल्लेख आला. तिथे सलील अंकोला होता. त्याने सहज म्हटले कि ज्या माणसाने आयुषांत कधीही एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही त्या व्यक्तीने अनेक महान खेळाडू घडवले ह्यावरून कोचिंग आणि प्रत्यक्ष खेळ हि एक दोन वेगळी क्षेत्रे आहेत असे लक्षांत येते. मला क्रिकेट विशेष आवडत नसले तरी अंकोलाचे शब्द मनात घर करून गेले.