विचार

क्रिकेट शौकीन ग्राहकाचा ग्राहक न्यायालयातील षटकार !

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
26 Feb 2016 - 7:01 am

कसोटी सामन्यात फलंदाजाने एखादा टोलेजंग षटकार लगावल्यावर प्रेक्षक उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करतात. पण एखादा क्रिकेट शौकीन चक्क ग्राहक न्यायालयात जाऊन षटकार ठोकतो त्यावेळी आपण सर्व ग्राहकांनीही त्याचं असंच भरघोस कौतुक करायला हवं. 

हे ठिकाणधोरणमांडणीप्रकटनविचार

समान संधीच महत्व

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
26 Feb 2016 - 12:29 am

जेव्हा एखाद्या बाबतीत/ठिकाणी समान संधीच तत्व पाळल जात नाही तेव्हा सहसा जे संधी पासून मुकले ज्यांना संधी नाकारली गेली त्यांचाच विचार आपण सहसा करतो, समान संधीच्या तत्वाकडे दुर्लक्ष करणार्‍यांना खरेतर त्यांचे अथवा त्यांच्या संस्थेचे जे काही उद्दीष्ट आहे त्या उद्दीष्टाचीच संधी नाकारली जाती आहे हे लक्षात येत नसते, कदाचित कामास सर्वोत्कृष्ट न्याय देऊ शकणार्‍या व्यक्तिपासून नकळत तुमच्या उद्दीष्टाची संधी गेली असू शकते -शेवटी नुकसान कशाचे तुमच्याच उद्दीष्टाचे.

शिक्षणविचार

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ५)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
26 Feb 2016 - 12:20 am

भाग १ | भाग २ | भाग ३ |भाग ४
-----------------------------

इतिहाससमाजराजकारणविचारलेखमत

मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 9:34 pm

स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...

हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत...

१. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील.

राजकारणशिक्षणविचारप्रतिक्रियाबातमी

कुत्री पालन ---- भाग २ ---- बीगल

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 2:26 pm

पहिल्या भागाची लिंक ===> http://www.misalpav.com/node/34821

आमची स्वीटी (लॅब्रेडॉर जातीची) देवाघरी गेली आणि मी मानसीक रोगी झालो.(साधारणपणे कुत्री पाळणारे बहूतेक जण ह्या स्थितीतून जातात.)

मी जिथे असेन तिथे स्वीटी माझ्या जवळच असल्याने, तिचा विरह मला सहन होईना.बायकोच्या आणि मुलांच्या लक्षांत ही गोष्ट आली.३-४ दिवस रडण्यातच गेले पण मनाला काही आराम मिळेना.शेवटी एक दिवस बायको म्हणाली की, आपण आता अजून एक कुत्री पाळू या.

ह्या वेळी मात्र एक ठरवले की, मोठे कुत्रे घेण्यापेक्षा एखादे छोटे-खानी कुत्रे घेवू.

समाजजीवनमानशिक्षणमौजमजाप्रकटनविचारअनुभव

साहित्याचे मारेकरी - चेतन भगत, सुदीप नगरकर, दुर्जोय दत्ता.

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 4:31 am

आज सकाळी परत एकदा 'एबीपी माझा' वरती महाराष्ट्रीयन इंग्रजी लेखक (?) सुदीप नगरकराची मुलाखत पहिली. याच सुदीप नगरकरला एबीपी माझाने काही वर्षांपूर्वी 'महाराष्ट्राचा शिलेदार' म्हणून नावाजले होते. थोडेसे त्याच्याविषयी आणि त्याच्या सारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हणतोय.

साहित्यिकविचार

घोळक्याने केले जाणारे 'वर्तमानपत्री' लिखाण- आणि नव्या लेखनाविषयीची असहिष्णुता- भाग एक

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 1:28 am

मिपावर मी दोन दिवसांपूर्वीच आलो आहे. तसे मिपाचे वाचन खूप दिवसांपासून करत आहे. आज आल्या आल्या एक शाब्दिक चकमक झाली जिच्यामुळे हा लेख लिहिणे महत्वाचे वाटले.

साहित्यिकविचार

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ४)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 12:34 am

भाग १ | भाग २ | भाग ३
-------------
काश्मीर प्रश्नाचे वेगळे[पण समजून घेण्यासाठी मी प्रथम त्याची जुनागढ आणि हैद्राबाद बरोबर तुलना करतो आणि मग तेंव्हाचा घटनाक्रम सांगतो.

जुनागढ भारतीय भूभागाला लागून होते. हैद्राबाद भारतीय भूभागाने वेढलेले होते. या दोन्ही संस्थानांची पाकिस्तानशी भौगोलिक जवळीक किंवा सलगता नव्हती. तर काश्मीर भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांबरोबर मोठी सीमा असलेले संस्थान होते.

इतिहाससमाजराजकारणविचारलेखमत

ढग, पाउस, आठवणी आणि भावना यांच्यात काही नाते आहे का?

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जनातलं, मनातलं
24 Feb 2016 - 4:44 pm

औरंगाबादला सकाळपासूनच आभाळात काळसर ढगांची गर्दी झालीये... बऱ्याच दिवसांनी कम्प्युटरवर काम करत असताना खिडकी बाहेर दुपारच्या ३ वाजताही अगदी संथपणे वाहणाऱ्या थंड वाऱ्यावर झुलणारी नारळाची पाने खूपच सुखद वाटली. मग काम बंद करून बाहेर येउन बसलो.एरवी मला लहानपण, शाळा, पाऊस यांच्याविषयी बोलणं भावनाप्रधान आणि मूर्खपणाच वाटतं पण या प्रचंड शहरात, माणसांच्या गर्दीत, आठ-आठ दहा-दहा मजली इमारतींमध्ये, आपण येउन पडलो हे वाईट कि चांगले हे कळायला मार्ग नाही.

साहित्यिकविचार