एक अनावृत्त(छी! अश्लिल!) पत्र
रवि, अरे काय नाव ठेवलंस बाबा सिनेमाचं? न्युड? अरे! केवढं हे अश्लैल्य? 'दिगंबर' वगैरे सात्विक, शुचिर्भूत नाव ठेवलं असतंस तर चाललं असतं(हा आपला लेखकाचा कल्पनाविलास बर्का! दिगंबर नाव ठेवलं असतं तर उभा चिरला असता डायरेक्टरला). छे छे! संस्कृती बुडाली. (च्यामारी!(च्या आणि मारी दोन्हीही पतंजलीचे बर्का!) ह्या संस्कृतीला पोहायला शिकवले पाहिजे. सारखी बुडते. पण पोहायला शिकवायचं म्हणजे स्विमिंग कॉश्च्युम, आणखी अश्लैल्य! छे छे!!) 'न्युड'पणाचं आपल्या संस्कृतीला फार वावडं. कुंभमेळ्यात कधी दिसलाय न्युड साधू? कधीच नाही. आहे कुठला बुवा, महाराज अर्धन्युड? अंह!