सनी दिवानी, आबा बंगाली आणि सदा' या कथेतील एक अंश.

बोबो's picture
बोबो in जनातलं, मनातलं
7 Nov 2017 - 12:51 pm

"चला तर सदाशेठ. तुम्हाला अजिबात ताटकळत न ठेवता लवकरात लवकर तुमची इच्छा मी पूर्ण करून टाकतो."

आपल्या छातीचे ठोके जोरजोरात पडताहेत हे सदाला जाणवलं.

सनी दिवानी - मादक सौंदर्याचा ऍटमबॉम्ब, मदनिका, पूर्वाश्रमीची मादकपटांची नायिका व आताची चित्रपट अभिनेत्री.  सनी दिवानी, जिने संपूर्ण जगभरातील तरुणांची हृदयं आणि जिच्या मादक व्हिडीओजनी त्यांच्या मोबाईलमधली मेमरी आणि कॉप्युटर्समधली हार्ड डिस्क व्यापली होती, ती सनी दिवानी.  तिला भेटण्याच्या कल्पनेने सदाची अशी अवस्था झाली होती, त्यात नवल ते काय?

जादूगाराने सदाला पुरुषभर उंचीच्या बंदिस्त अशा एका लाकडी खोक्याजवळ नेलं. त्याचा दरवाजा उघडून त्याने सदाला आत जायला सांगितलं. जादूगाराने डोळे मिटले आणि तो मंत्र पुटपुटणार एवढ्यात सदाने दरवाजा उघडला आणि त्याला अडवलं.

"जादूगारसाहेब मंत्र व्यवस्थित म्हणा. नाहीतर सनी दिवानीऐवजी मी सनी देवल नामक मल्ल अभिनेत्याच्या बाहुपाशात जाऊन पोहोचायचो."

***********
यंदाच्या आवाज दिवाळी अंकातील 'सनी दिवानी, आबा बंगाली आणि सदा' या माझ्या कथेतील एक अंश.

कथाविनोदkathaaलेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

7 Nov 2017 - 1:37 pm | प्रचेतस

टाकायची असेल तर पूर्ण कथा टाका नपेक्षा ह्याला जाहिरातीपलीकडे जास्त महत्व नसेल.

प्रचेतस - नुकतीच प्रकाशित झालेली असल्याने ही पूर्ण कथा एवढयात नाही टाकता येणार. त्या ऐवजी दुसरी पूर्ण कथा टाकेन.

धर्मराजमुटके's picture

7 Nov 2017 - 1:53 pm | धर्मराजमुटके

अंश कसला साहेब, अगदीच अणू रेणू एवढा भाग टाकला आहे. यंदा आवाज वाचायला मिळाला नाही. दिवाळी फटाक्यांविनाच गेली म्हणायची !

धर्मराजमुटकेसाहेब - दुसरी पूर्ण कथा टाकता काही वेळाने. मलासुद्धा मी मुंबईत नसल्याने आवाजच काय, कुठलाच दिवाळी अंक अजून प्रत्यक्ष पाहायला मिळाला नाहीय. :-(