कविता

आणखी काय हवं?

Pratham's picture
Pratham in जे न देखे रवी...
14 Oct 2020 - 8:33 pm

मावळणाऱ्या दिवसाची संध्याकाळची वेळ
वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सरसरणारी पाने
कडाडणारे ढग आणि चमकणाऱ्या विजा
पावसाचे पाणी व मातीचा सुगंध
बरसणाऱ्या थेंबाचा रपरपणारा आवाज
गरम चहा बरोबर आवडते पुस्तक
बोला आणखी काय हवं?

कविताभाषासाहित्यिक

शब्द

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जे न देखे रवी...
12 Oct 2020 - 8:27 pm

*शब्द*
शब्द देतात आनंद
दुःखही देतात शब्दच,
शब्दानेच मिळते वेदना
त्यावर मलम होती शब्दच !!

शब्दातून मिळते प्रेम
माया हि होतात शब्दच,
शब्दच नात्यांतला दुरावा,
नवी नाती जुळवतो शब्दच !!

ह्रदयातून यावा शब्द,
साखरमाखला गोड गोड,
भावनेने ओथंबलेला ,
काही नको त्यात तडजोड !!

कधी मुके होतात शब्द,
अन् बोलू लागतात डोळे,
भाव मनीचे याचे त्याला,
जातात समजून सगळे !!

कविता

पाऊस

मका म्हणे's picture
मका म्हणे in जे न देखे रवी...
12 Oct 2020 - 8:24 pm

पाऊस मनातला
पाऊस आठवणीतला
पाऊस तुषारांचा
पाऊस वळवाचा
पाऊस कडाडणाऱ्या विजांचा
पाऊस घनगर्द काळ्या नभाचा
पाऊस सरींवर सरींचा
पाऊस भरून वाहणाऱ्या नद्यांचा
पाऊस खळाळत येणाऱ्या ओढ्यांचा
पाऊस धबधब्यातून कोसळणारा
पाऊस निसर्गात भरून राहिलेला

कविता

विश्वास

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जे न देखे रवी...
11 Oct 2020 - 2:32 pm

*विश्वास*
तो कोसळतो, सहस्त्रधारांनी
अविरत अखंड आपल्याच नादात..
तीच्या डोळ्यातली वेदना...
निथळते..तीच्याच फाटक्या पदरात !

तीच्या खोपटात दोन भगुली,
ओल्या काटक्या नी थंड चूल..
रिकामे डबे, अन् ओच्यात,
भुकेनं रडून थकलेलं मूल !

तीचे डोळे पावसाच्या आरपार,
आसावले, वाटेवर धन्याच्या
तुंबळ पावसातही लेकराला आणेल..
पसाभर तरी कण्या धान्याच्या !

पावसाला आळवते मनातून
थांब रे , असा नको माजवू कहर,
गेला धनी कामाला, परतून येउदे,
तोवर जोराची, तुझी झड ती आवर !

कविता

शब्द

राजा सोवनि's picture
राजा सोवनि in जे न देखे रवी...
9 Oct 2020 - 9:58 pm

शब्द.....
शब्द हा शब्द छोटा ,शब्दाला अर्थ मोठा
शब्दच देती आसू, शब्दच देती हासू
शब्दच उडवती खटका, शब्दच करवती सुटका
शब्दाने वाढतो मान,शब्दाने जाते शान
शब्दाने होतो खुलासा, शब्दाने मिळ तो दिलासा
शब्दाने मिळते धैर्य , शब्दाने स्फुरते शौर्य
शब्दाने मिळते भिक्षा, शब्दाने मिळते शिक्षा
शब्दाने फुलते धाम,शब्दाने फुटतो घाम
शब्दाने मिळते माया, शब्दाने प्रफुल्लित काया
शब्दाने येते विरक्ती, शब्दाने होते भक्ती
शब्दाने मिळते ज्ञान , शब्दाचे ठेवावे भान
शब्दात असावी गहराई ,शब्दात आसावी नरमाई

कविता

slow down

अमलताश_'s picture
अमलताश_ in जे न देखे रवी...
9 Oct 2020 - 12:59 pm

एका क्षणाचा
निळा डोह
आकाशातून पाहिलेला.

त्याच क्षणाचा
अरुंद काठ.

काठाच्या हिरवळीवरून
डोहाच्या पाण्यात
पाय खेळवत बसायचय ,
पावलांनी आकाशाचे
तुषार उडवत.

जरा थांब ना....
slow down .
मला तो क्षण
पकडू दे.

कविता

(...मारीला म्यां डोळा ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
5 Oct 2020 - 12:10 pm

पेरणा http://misalpav.com/node/47605

अनंतयात्रींची "...पाहिले म्यां डोळा" लैच अस्वस्थ करून गेली

म्हणून वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न...

...मारीला म्यां डोळा 😉

काणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडरोमांचकारी.कविताइंदुरीऔषधोपचारकृष्णमुर्ती

स्थलांतर..

Vivekraje's picture
Vivekraje in जे न देखे रवी...
1 Oct 2020 - 10:40 am

भाकरी साठी शोधली चाकरी, चाकरीसाठी सोडलं गांव..
शहरात कुणी ओळखेना तरी , गावात राहायचं नाही राव..

रोजच्या साठी रोज कमवायचं, मिळेल खायला ते गोड मानायचं..
मजूर म्हणून असंच जगायचं, अन श्रीमंतीचं स्वप्न बघायचं..

थकलेलं मन रोज सांगायचं, एक दिवस मी मालक होईल..
माझ्या मालकीच्या गाडीतून माझ्या गावी परत जाईल..

तेव्हढ्यात कुठला आजार आला, धावणारा माणूस घरात कोंडला..
उद्योगधंदे बाजार बंद, अन वाहणारा रस्ता ओस पडला..

घरात खायला पुरणार किती, दुसरीकडं मागायचं किती..
आठवणीने परत गावच्या, मंद झाली होती मती..

मांडणीवावरकवितामुक्तकविडंबनसमाजजीवनमान

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे ....( आजकालचं)

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
1 Oct 2020 - 8:25 am

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी अगदी सेम असतं..

सक्काळी उठल्या उठल्या पहिला मेसेज चेक करता?
झोपेतसुद्धा मोबाईल उशीपाशीच ठेवता?
काय म्हणता, Last seen चेक करत उशीरापर्यंत जागता??
मिशीतल्या मिशीत किंवा गालातल्या गालात दिवसभर हसत असता?
म्हणजे मग झालं तर! घोडं गंगेत न्हालं तर!
व्हर्च्युअल जरी असलं, तरी बावनकशी जेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

मुक्त कविताकविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिभा

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
28 Sep 2020 - 11:03 pm

मी तुझ्या रोज भोवती असते
एक अदृश्य सोबती असते

मी कधी रिक्त शाश्वती असते...
वा कधी दिव्य आरती असते!

आसवांचे जुनेच लोलक, पण-
मी नवी रंगसंगती असते

सांजवेळी तुझा विसावा मी
आणि दिवसा तुझी गती असते

तू करू पाहतोस जे त्याची
फक्त मी मूक संमती असते

- कुमार जावडेकर

कवितागझल