शब्द

राजा सोवनि's picture
राजा सोवनि in जे न देखे रवी...
9 Oct 2020 - 9:58 pm

शब्द.....
शब्द हा शब्द छोटा ,शब्दाला अर्थ मोठा
शब्दच देती आसू, शब्दच देती हासू
शब्दच उडवती खटका, शब्दच करवती सुटका
शब्दाने वाढतो मान,शब्दाने जाते शान
शब्दाने होतो खुलासा, शब्दाने मिळ तो दिलासा
शब्दाने मिळते धैर्य , शब्दाने स्फुरते शौर्य
शब्दाने मिळते भिक्षा, शब्दाने मिळते शिक्षा
शब्दाने फुलते धाम,शब्दाने फुटतो घाम
शब्दाने मिळते माया, शब्दाने प्रफुल्लित काया
शब्दाने येते विरक्ती, शब्दाने होते भक्ती
शब्दाने मिळते ज्ञान , शब्दाचे ठेवावे भान
शब्दात असावी गहराई ,शब्दात आसावी नरमाई
शब्द चांगले ठेवा टिपून ,शब्द वापरा जरा जपून
शब्दावर द्यावे ध्यान, शब्द वापरा छान

डॉ.राजा सोवनी

कविता

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

10 Oct 2020 - 1:04 am | शशिकांत ओक

शब्द वापरा जरा जपून
शब्दावर द्यावे ध्यान, शब्द वापरा छान

वा मजा आ गया... आणखी येऊदेत...