मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

कुणीतरी...

Jayagandha Bhatkhande ·
लेखनविषय:
कुणीतरी.. कुणीतरी माझच मला, नव्यानं ओळखायला शिकवलं.. आरशाचं स्थान जनात नसून, मनात असलेलं दाखवलं.. विचारांच्या पसारा-याला, मनातच आवरायला शिकवलं.. बावरलेल्या मनालाही, आशाकिरणांनी सावरलं.. सैरभैर चित्ताला त्यानं, विवेक देऊन स्थिरावलं.. कोमेजलेलं चैतन्य, एका आशीर्वादानं फुलवलं.. बदक नाही, प्रत्येक जीव, राजहंसच आहे हे जाणवलं.. "त्याच्या"कडे बघताना, "त्याची"च हो, हे समजावलं...!! जयगंधा.. ३०-११-२०२०.

'अरूणाचल पंचरत्नम' (भावानुवाद)

मूकवाचक ·
लेखनविषय:
काव्यरस
दि. २९/११/२०२० (कार्तिक पौर्णिमा) प्रस्तावना: भगवान रमण महर्षींचा आश्रम पंचमहाभूतांपैकी अग्निचे स्वरूप, तसेच साक्षात शिवस्वरूप मानल्या गेलेल्या अरूणाचल पर्वताच्या पायथ्याशी आहे हे आता तसे सर्वज्ञात आहे. दर वर्षी तमिळ पंचागाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला अरूणाचलाच्या शिखरावर दीप महोत्सव असतो.

बारमास - हायकू

मी-दिपाली ·
लेखनविषय:
लाॅकडाउनमध्ये लागलेल्या छंदाने आता थोडं बाळसं धरलंय म्हणायला हरकत नाही. काही लेख आणि थोड्याफार कविता एवढी मोजकीच शिदोरी गाठीशी असताना असं म्हणणं धाडसाचंच आहे, पण मूळ मुद्दा हा की नाविन्याची ओढ बऱ्याचदा स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे काव्याचे वेगवेगळे प्रकार करून पाहावेसे वाटले. (नाही, मी बाळबोध, बऱ्या, थोड्या अधिक बऱ्या कवितांबद्दल नाही सांगत, तशाही त्या आपसूकच झाल्या असतील.) अभंग, अष्टाक्षरी, षडाक्षरी, मुक्तछंदातील कविता, सवालजवाब, अगदी गझलेचंही तंत्र शिकून त्याही रचून झाल्या. निसर्ग, प्रेम, विरह, जीवनविषय, सामाजिक आशयही यासारखे विविध विषयही हाताळून झाले.

मजसी भेटवा...

Jayagandha Bhatkhande ·
लेखनविषय:
मजसी भेटवा.... कुणी असो सोवळा, कुणी तो बावळा, विठ्ठल सावळा, सर्वांना प्रिय.. कृपेची साऊली, उभी असे राऊळी, ती विठू माऊली, सर्वांना प्रिय.. क्षण जाई वाया, निरवी "तो" माया, ऐसा विठुराया, सर्वांना प्रिय.. वाजवू मृदुंग, गाउनी अभंग, मनी पांडुरंग, सर्वांना प्रिय.. मकरकुंडलांचा साज, डोळाभर पाहू आज, उभा केशीराज, सर्वांना प्रिय.. धरूनिया हात, करी जो सनाथ, असा पंढरीनाथ, सर्वांना प्रिय.. सोडवी आसक्ती, देई जो विरक्ती, तो रखुमापती, सर्वांना प्रिय... जिथे नामाचा गजर, तिथे जातीने हजर, सखा रखुमावर, मजसी भेटवा...!! जयगंधा.. २६-११-२०२०.

शिक्षणाचे मानसशास्त्र - प्रश्नोपद्व्याप - काव्यत्मक काव काव

राजा वळसंगकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कसा करावा विचार; उपजत असे का हा प्रकार; शिकून प्राप्त होईल ज्ञान अलंकार; विधी सांगोनि करी उपकार ।।1।।

सहजच...

भटक्य आणि उनाड ·
लेखनविषय:
सहज त्या दिवशी तू फोटोसाठी पोज़ काय दिलीस, नकळत माझ्या ह्रदयाची तार छेडुन गेलीस.. कस् सांगू तुला काय झक्कास दिसलीस तेव्हा, असाच मला छळायचा तुझा छद जगावेग.ळा.. काढलेस जरी असले फोटो तर प्लीज़ दाखवू नकोस मला, ते क्षण मिस केल्याचा त्रास होतोय मनाला.. कधी वाटल नव्हत की तू मला अशी भेटशील, भेटली ती भेटलीस पण माझ ह्र्दय घेऊन गेलीस.. बस जरा तिथेच स्टेज वर दिलखुलास आवाजचे सूर छेड, मनासारखे तुझे फोटो काढायचेत हवाय त्यासाठी थोडासा वेळ.. तुझे फोटो ठेवणार मी देणार नाही कुणाकुणाला, किती हटटी आहे तुझ्यासाठी एकदा सांगायचय तुला...

एका सैनिकाची परीक्षा.. मातृभूमीच्या प्रेमासाठी...

भटक्य आणि उनाड ·
लेखनविषय:
तुला कसँ सांगू आई, आज माझी परीक्षा आहे या रणागणावर उरलेला मी शेवटचा सैनिक आहे, खूप दिवस झाले होते इथे येऊन सगळे कनटाळले होते सराव करून करून या असल्या वातावरणात आम्ही काय काय नाही केल ऊन थंडीमुळे आमच्या रक्ताच पाणी झाल सगळ्याना वाटत होत की आता हे संपाव हसत खेळत आपापल्या घरी जाव पण बहुतेक हे आमच्या नशिबात नव्हत दुर्दैवाने कालच रात्री हे रणागण पेटल... अचानक हल्ला झाला, गोळयाचा पाउस पडला, बॉम्ब पडले, धुरात काहीच दिसेनास झाल, सुरुवातीला बरेच पडले पण बाकीच्यानी सांभाळल, पण अपुर्‍या शक्तिवर आम्ही किती सावरायच? शेवटी तेच झाल जे अपेक्षीत नव्हत, एक एक करत सगळ्याच आयुष्य थांबल... आता इथे फक्त एकटा मी

आत्मारामाची दीपावली..!!

Jayagandha Bhatkhande ·
लेखनविषय:
आत्मारामाची दीपावली..!! अंधारातून प्रकाशाकडे, जाणारी ती वाट, जीवनात आली, मंगलमयी पहाट.. किती काळ आसूसून, पाहतेय मी वाट, अंतरीच्या गाभाऱ्यात "त्याला", माझ्या शरणागतीचा पाट.. समर्पणाचा स्नेह, सद् भावनांची उटी.. अभ्यंगसमयी अशी, "त्याच्या" चरणी मिठी.. सोsहं ची सनई, अन् श्वासांचा धूप, भाव,भक्ती, प्रेमाचा, नैवेद्यही खूप.. शेजारी उभा गातसे, नामस्मरणाचा भाट.. "त्याच्या" दीपावलीचा असा मोठा थाट..!! आशा अपेक्षांचे फटाके, अहंकाराचा जळो भुईनळा, पंचप्राणांची पणती, आत्मारामाचा दीपसोहळा.. आत्मारामाचे औक्षणी, मन भारावून जाई, "त्याच्याशी" अद्वैत जाणता, नित्य दीपावली होई... जयगंधा.. १६-११ २०२०

शब्द आणि सूर

श्रिया सामंत ·
लेखनविषय:
कदाचित शब्द निरर्थक ठरले नसतील पण ते पोचले नाहीत त्या अंतापर्यंत काही ओळी ओसाड पडल्या खऱ्या पण त्यांना तर वाटाच नाही सापडल्या म्हणूनच तर मनातल्या पर्णरेखांना डायरी जवळची वाटली कारण त्यांना माहित आहे मनातून उमटलेल्या सुरांचा प्रवास चालू असतो निरंतर .....