कविता

'विडंबित' अंगाई गीत

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
11 Dec 2018 - 11:30 am

ब्लॉग दुवा https://www.apurvaoka.com/2018/12/blog-post.html

लहान मुलं झोपत नाहीत अशी तक्रार बहुतेक पालकांची असेल कदाचित. अशाच एका पालकाच्या तक्रारीवर चिंतन करताना गमतीत सुचलेलं एक काव्य.

सो गया ये जहाँ च्या चालीवर काही मराठी ओळी. यांनी चार दोन मुलं मुली वेळेवर झोपल्या तर त्यांच्या पालकांनी जरूर अभिप्राय कळवावा☺️

झोपली जंगले
झोपली श्वापदे
झोपले झाड ही
झोपली पाखरे
झोपली धरा अन अंबरे
घरे अन मंदिरे
झोपले चराचर

कविताबालगीतविडंबन

नाना करा व्हाटस ॲप गृप

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
9 Dec 2018 - 10:58 pm

तुमच्या माझ्या दिलाचा करा व्हाटस ॲप गृप
मुक्यामुक्याने करु आपन दोघे चॅटींग ||

नाना हिचं लवकर ऐका अन गृपचं घ्या मनावर
पोर पार सुटली, था-यावर नाही हिचं मन ||को||

गुड मार्निंग करा सकाळी, उठल्यावरून
माझी आटवन काढा, विडीओ कॉल करुन
नका लावू...अहो नका लावू साधा कॉल,
खर्च करा डेटा, टाका सारा रिचार्ज संपवून ||

मी झाली मेंबर त्याचं अन तुमी आडमिन
दोघचं गृपमधी राहू नको तिसरं कोन
शेल्फी बघा तुमी अन तुमीच बघा स्टेट्स
प्रायव्हेट मेसेज टाका मीच ते वाचन ||

- पाभे

कविताप्रेमकाव्यलावणी

उदासी

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जे न देखे रवी...
9 Dec 2018 - 8:32 pm

सभोवताली उदासी साचून राहीली आहे
तीचा परीघ केवढा हे माहीत नाही
माहीती करुन घेण्याची गरजही वाटत नाही
इथे फक्त मी आहे आणि माझ्यामध्येही ती आहे
अगदी तुझ्यासारखीच...

ती सुद्धा हल्ली कधीतरीच येते भेटायला, पण येते...
मग मी सुद्धा तीच्यासोबत काही क्षण घालवतो
ती लवकर जाऊ नये म्हणुन मुद्दाम एकटाच राहतो
आता तर वाटतं तीच मला जास्त जवळची आहे
अगदी तुझ्यापेक्षाही...

कवितामुक्तक

ऐलान

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
9 Dec 2018 - 9:54 am

आयुष्याच्या रणांगणात
होतच राहतील स्वाऱ्या
वाघासारख्या चढाया कर
संकट परतविणाऱ्या

जरी होतील किती वार
तरी हार नकोस मानु
पराभवाचा विचारसुद्धा
तू मनात नकोस आणु

घोंगावणारी वादळेही
शिकवण देतात नवी
नवं त्यातुन शिकण्याची
तुझी दृष्टी मात्र हवी

बेडरपणे तुटुन पड
संकटांवर आता
थांबु नको येईल म्हणत
वाचविण्याला त्राता

झेलत राहा पाऊसवारा
कणखर बनत जाशील
हार मानेल संकटसुद्धा
सक्षम असा होशील

नसेल जरी जगात साऱ्या
आज तुझे काही
तरी नसेल भविष्यातही
असे मुळीच नाही

कविताकविता माझी

जीव झोपला (विडंबन)

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
8 Dec 2018 - 6:03 pm

विडंबनाचे निमित्त: परवा, एका बॅचलर मित्राकडे कामानिमित्त जाणं झालं. कामाचं बघता बघता रात्री उशीर झाल्यावर त्याला म्हटलं, आता घरी जातो, उद्या बघू. तर, पठ्ठ्या आपला, "झालं रे! किती वेळ लागतोय! पाचच मिनिटे अजून." असं म्हणून दुसऱ्याच नवीन कामाला सुरूवात करीत होता. मलाही मग डुलु डुलु डुलक्या सुरू झाल्या. झोप अनावर झाल्यावर मी तिथेच झोपायचं हे दोघानुमतें ठरलं.

कविताआता मला वाटते भितीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडभूछत्रीहास्यकरुण

पावलांना अंत नाही

आनंदमयी's picture
आनंदमयी in जे न देखे रवी...
28 Nov 2018 - 9:51 pm

पावलांना अंत नाही
वेदनेला गाव नाही
चालते ही व्यर्थ चिंता
थांबण्याचे नाव नाही

दूर काळोखात कोणी
गुंफली माझी कहाणी?
त्या तिथे सूर्यास सुद्धा,
उगवण्याचे ठाव नाही..

लाख स्तोत्रे अर्पुनी मी
मांडले वैफल्य माझे..
टेकला मी जेथ माथा,
मंदिरी त्या देव नाही!

अंतरीच्या शून्यतेला
गीत मी कैसे म्हणावे
गोठलेले शब्द नुसते
छंद नाही, भाव नाही!

अदिती

कविताअभय-गझल

लाड

वन's picture
वन in जे न देखे रवी...
27 Nov 2018 - 9:42 am

गुबगुबीत बाळाचा पहिला वाढदिवस
वाटतोय अगदी प्रदर्शनीय उत्सवच
चिमण्या नजरेने टिपलेली लठ्ठ श्रीमंती
देतीय भविष्यातील ऐश्वर्याची हमी

पुढच्या टप्प्यात दिसतंय सुखासीन बालपण
मागेल ते मिळतंय कारण कमी नाही धन
बागडणाऱ्या गोंडसाचा काढून टाकलेला लगाम
खुणावतोय की व्हायचे नाहीच कधी गुलाम

धोधो ओतलेल्या पैशातून अंकुरलेले शिक्षण
कमीच पडतंय की लावायला चांगले वळण
केलेल्या गुंतवणुकीतून हवी असलेली वसुली
शोधाया लावतेय कोणा सावजाची टुमदार हवेली

कविताकविता माझी

कविते.....!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
23 Nov 2018 - 7:25 am


कविते......!.

तू, तुला हवं तसं जग !!
उमलत राहा, फुलत रहा,
कागदांवरून मनांवर बहरत रहा, नेहमी सारखीच!

पण एक लक्षात ठेव आता ......
तू ना माझी , ना त्याची !

मी लिहिलं तुला म्हणून तो वाचेल तुला,
एवढाच काय तो उरलेला दुआ !

कारण भेटलो तर , स्वप्न वाटेल,
नाही भेटलो तर, विरक्त वाटेल !

नव्याने काही केलं तर पाप वाटेल,
जुन्यातच अडकुन राहीलो तर श्राप वाटेल!

हात दिला तर स्वार्थ वाटेल,
ढळणारा अश्रूच, सार्थ वाटेल!

कविता

तुझ्या माझ्यासवे......(विडंबन)

OBAMA80's picture
OBAMA80 in जे न देखे रवी...
20 Nov 2018 - 8:53 pm

तुझ्या माझ्यासवे....
तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोहोचायचा पाऊसही
पडेना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही
तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही
मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कश्या युक्त्या मला शिकवायचा पाऊसही
कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही
आता शब्दांवरीया फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही
***********************
विडंबन

विडंबनतुझ्यामाझ्यासवेकविताचारोळ्याविडंबन

जाणीव

अबोलघेवडा's picture
अबोलघेवडा in जे न देखे रवी...
19 Nov 2018 - 12:16 pm

जाणवे मज आज जेव्हा
काहीच नसे इथे आपुले,

सांगू कुणा ही व्यथाच माझी
शोधूनी आता मन हे थकले ||१||

अथांग या दुनियेमधला
जणू उपरा मी भाडेकरू,

स्वकेंद्री अशा अवनीवरती
कुणालाच मी माझे म्हणू? ||२||

मी यावे अथवा जावे
लोचनी न कुणाच्या आसवे,

कुणा न वाटे हृदयामधूनी
मन मोकळे करावे मजसवे ||३||

धावतो मी रोज आहे
काहीतरी मिळवावया,

सिनेमाच तो पडदा नुसता
वेळ लागला मज कळावया ||४||

कशापरी तू धाडीलेस मज
सुटेल का कधी कोडे देवा?

गतजन्मींच्या पापांचा वा
पुण्याईचा म्हणू हा ठेवा? ||५||

कविता