कविता

अनामिक

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
18 Jan 2019 - 12:48 am

खरी कविता कधी येते माहितीये का?
जेव्हा ती आतून हाक मारते ना! तेंव्हा!!!
तीच तिची खरी-यायची वेळ..

तिला मग यमकांची, छंदांची, वृत्तांची, कसलीच गरज उरत नाही..

खरोखर अनावृत्त होऊन छंदमुक्तीचा
खरा ध्यास घेऊनच धावत येते ती! .

वेदना जागायची, स्वतःहुन चालत बोलत घडत धडपडत बाहेर यायची खरी वेळ..

काहीही सुचायची, सांगायची, बोध शिकवायची, ओझी डोक्यावर न घेता ती सताड उमटते बाहेर! जशी आत आहे तशीच!!!

हीच तिची खरी सुरवात मानायची का हो!???
असेल, असेल कदाचित..आणि असू दे ..असली तरीही!

कविताकविता माझी

ढग

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
17 Jan 2019 - 10:03 pm

तोच पाऊस जुनासा
गंध हळवा नवासा
भिजू भिजू पदराला
मखमल स्पर्श हवासा

स्पर्श रुते खोल
पापण्याशी ओल
पुन्हा ऊन पदराला
अन एक उसासा

उसासलेलं हसू
मोरपंखी दिसू
काळा करंद ढग
डोळा ये जरासा

सागरलहरी

कविता

स्वात्रंतवीर

mukund sarnaik's picture
mukund sarnaik in जे न देखे रवी...
17 Jan 2019 - 12:08 pm

लाल,बाळ,पाल,बोस आणि गांधी।
देशासाठी लढले हे स्वातंत्रसेनानी।।
पहिला हुतात्मा ठरला मंगल पांडे।
त्याने आपले जीवन देशासाठी पणाला लावले।।
स्वा. सावरकर इंग्रजांना भारी पडले।।
शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मातृभूमीचाच ध्यास मनी घेऊन जगले।।
तरुणांना ऊर्जा देणारे एक नेतृत्व वासुदेव बळवंत फडके।
देशासाठी प्राण पणाला लावून अमर झाले।।
राजगुरू सुखदेव भगतसिंग एकजुटीने लढले।
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी एकत्रच फासावर गेले।।
इंग्रज अधिकार्‍याचा खून चाफेकर बंधूंनी केला।
त्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचा विचारही नाही केला।।

कविता

श्रावण...

bhagwatblog's picture
bhagwatblog in जे न देखे रवी...
14 Jan 2019 - 3:29 pm

सुप्रसन्न वारा आणि धरणीचा सुवास
प्रफुल्लित मन अन सुखाचा सहवास

हिरवागार सडा शिंपडला भुईवरी
नक्षत्राचे चांदणे अंथरले नभावरी

उडणारे तुषार अन मंजुळ कोकिळ स्वर
पक्षाचा आराव अन मन स्वार ढगावर

हळवा श्रावण, महिन्याचा राजा श्रावण
अनंत निसर्गाची रूपे दाखवतो श्रावण

कणा-कणातील संगीताने मेघ व्यापले
प्रकृतीच्या काव्याने मन तृप्त झाले

निसर्गाच्या किमयेने मन गंधाळले
सर्वांना वसुंधरेच्या रूपाने वेडावले

कविताfestivals

किंचित अस्वस्थ वाटते आहे !

फुत्कार's picture
फुत्कार in जे न देखे रवी...
6 Jan 2019 - 12:30 am

उत्स्फूर्तपणे की कोणी घडवून आणते आहे?
याच विचारांनी किंचित अस्वस्थ वाटते आहे !

उगम असो काहीही घटत्या तीव्रधार घटनांचा
वाहवत रहावे की कोरे? कूट ग्रासते आहे

समर्थन विचारांना वा तीव्र निषेध असू शकतो
समाज माध्यम त्यास्तव का वेठीस जुंपते आहे?

होवो थोडा वा जबरदस्त परिणाम प्रतिक्रियांचा
खारीचा वाटा देता, मन का सुखावते आहे?

काय महत्वाचे, कशास प्राधान्य योग्य द्यावे?
राष्ट्राचे व नागरिकांचे निधान कोणते आहे?

इतके सारे पडले का हो प्रश्न मूढ कोणा? अन्
उत्तर त्यांना का उलटे माझ्याहून मिळते आहे?

कवितासमाज

वेदना जहरी

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
30 Dec 2018 - 10:55 am

अनोळखी गंध कुणाचा आला दारी
अंगणातल्या मोगऱ्याची गेला करुन चोरी

वाट कुणाला पुसू त्याच्या गावाची
सांगेल कुणी कहानी त्याच्या नावाची
होऊन शहाऱ्यांचे भाले रुतले माझ्या उरी

पाचोळ्यांच्या रानात फुलली ठिणगी
पेटू लागल्या ज्वाला साऱ्या अंगी
डोळ्यांत उगवली माझ्या प्रीत प्यारी

आठवणींची भरुन येते रात
सूर कुणी पेरले या ओठांत
सोसते मी एकांताची वेदना जहरी

कविता

कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
29 Dec 2018 - 7:13 pm

कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
सखे काय सांगू.
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
घेता मिठीत त्याने,आग अंगास लावली
अधराने अधरावर प्रेम कविता कोरली
सुटले भान पदराचे, गळून पडली चोळी
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
स्पर्शिता उरोज त्याने,श्वास माझे थांबले,
धुंद मिटल्या नयनी,कामस्वप्ने तरळले
गात्र गोजिरी स्वप्ने फुलली,ग्लानी आली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*

कविताशृंगार

वृक्षवल्ली आम्हा सोयरी

नायकुडे महेश's picture
नायकुडे महेश in जे न देखे रवी...
29 Dec 2018 - 12:38 pm

जसे वाळवंटी असे निर्जरा,
जसे सागराच्या तळाशी धरा,
तसा एक तू जीव या भूवरी,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।।

कुणी वृक्षप्रेमी पुकारी तुला,
तया जीवनी एक आधार तू,
कुणी वृक्षवैरी न ठावे तुला,
करी स्वप्न साऱ्यांचे साकार तू,
जसा देव नांदे सदा अंतरी ...
वृक्षवल्ली आम्हा सोयरी,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।।

मांडणीसंगीतकवितामाझी कविता

तू काळजाला भिडावे

परशुराम सोंडगे's picture
परशुराम सोंडगे in जे न देखे रवी...
28 Dec 2018 - 10:49 pm

देहास माझ्या स्पर्शताना
तू काळजाला ही भिडावे

श्वासात श्वास गुंतताना रे
उरातले चांदणे धन्य व्हावे

बहर माझा नि कहर तुझा
क्षणांनी जराशी धुंद व्हावे

तू बेभान मी व्याकूळ तरी
देहानी जरा किनारा व्हावे

पाकळया तू उलगडताना
तुझा गंध जरा कुंद व्हावा

तू रिक्त कधी, विरक्त कधी
मलाही सृजनाचा पूर यावा

. . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा
. . . . 9527460358

कविताkelkar

तू काळजाला भिडावे

परशुराम सोंडगे's picture
परशुराम सोंडगे in जे न देखे रवी...
28 Dec 2018 - 10:49 pm

देहास माझ्या स्पर्शताना
तू काळजाला ही भिडावे

श्वासात श्वास गुंतताना रे
उरातले चांदणे धन्य व्हावे

बहर माझा नि कहर तुझा
क्षणांनी जराशी धुंद व्हावे

तू बेभान मी व्याकूळ तरी
देहानी जरा किनारा व्हावे

पाकळया तू उलगडताना
तुझा गंध जरा कुंद व्हावा

तू रिक्त कधी, विरक्त कधी
मलाही सृजनाचा पूर यावा

. . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा
. . . . 9527460358

कविताkelkar