साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट
निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट!
पोळीत लपला आलूवडा, चहा कपभर खास
बजेटची चर्चा झाली, आता सगळं झालं बास
खिशात राहतं थोडं, केला सगळ्यांनी नवस
निर्मला ताईंनी बनवला सगळ्यांचा हसरा दिवस
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट
निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट!
सायकल चालवली जरा, फिटनेसची शान
बजेट ऐकत बसलो, झाला गोड ताण
टॅक्सचा जुगाड संपला, हसू फुटलं मुक्त
निर्मला ताईंनी दिली सूट, मिळालं आयुष्याचं गिफ्ट!
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट
निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट
शेअर्स घेतले थोडे, पण मार्केट होतं थंड
निर्धार केला पक्का — “बजेटमध्ये मिळेल फंड!”
खिचडीच्या घमघमीत, विचार आला मोठा
निर्मला ताई म्हणल्या, "वाढवू पैसा छोटा!"
सायकल फिरवताना गाणं मनात झुळझुळलं
बजेटचं गोड वाऱ्यावर गुपित कुठं उलगडलं
फिटनेसची कूटनीती आणि सूटची बातमी
खिचडीबरोबर टॅक्स फायदे झाले फक्कड चवदार नाती!
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट
निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट
प्रतिक्रिया
3 Feb 2025 - 8:45 am | कर्नलतपस्वी
आवडली.
देता किती घेशील दो करांने
भरघोस सुट दिली निर्मलाने
3 Feb 2025 - 9:36 pm | चौथा कोनाडा
छान !
ही रचना वाचुन झाला गोड ताण आमचाही !
5 Feb 2025 - 2:46 am | मुक्त विहारि
आता चिंता एकच, महिन्याला एक लाख रुपये देणारी नौकरी शोधली पाहिजे...