तंबिटाचे लाडू
खरं तर हा कर्नाटकातील पदार्थ. रोटी-बेटी व्यवहाराने कित्येकदा सीमा धूसर होतात. आमच्याकडे माझी आई माहेरची कानडी आणि मोठी बहीण लग्नानंतर कानडी. पण सीमाभागातील त्यांची गावं. त्यामुळे कित्येक कर्नाटकी पदार्थ माहितीतील आणि आवडीचे. मागच्या महिन्यात मोठ्या बहिणीकडे गेले तेव्हा तंबिटाच्या लाडूचं प्रमाणा आणि पद्धत विचारली. त्यांच्याकडे हा लाडू नागपंचमीच्या वेळी करतात. नागपंचमीला हे लाडू करायचा माझाही बेत होता पण तेव्हा जमले नाही. मग बाप्पाला नैवेद्य म्हणून हे लाडू केले. ह्या लाडवांचा आकारही विशिष्ट असतो - पेढ्यांसारखा दोन्ही बाजूंनी चपटा. मला काही तो आकार जमला नाही. पण चव मात्र जमली.