ब्रेथलेस
रस्त्यात अचानक खड्डा आल्यामुळे समजा आपण करकचून ब्रेक मारल्यानंतर पाठीमागचा एखादा आपल्यासारखाच मध्यमवर्गीय गाडीवाला आपल्यावर येऊन चढला असता सदर घटनेमध्ये नेमकी चूक कुणाची हे निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नसतो ह्याचं साधं कारण असं आहे की आपल्याकडे कोणत्याही रस्त्यावर गाडी चालवताना फूटभर खोल खड्डा अकस्मातपणे समोर येतच असतो, हे जनरल नॉलेज अगदी लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडत असल्याने ते एव्हाना आपल्या एकूणच जगण्याचा भाग झालेलं असतं तरीही यामागचं खरं कारण म्हणजे जनतेचं ध्यान चालू क्षणावर तल्लखपणे टिकून रहावं ह्या उदात्त भूमिकेतून मायबाप सरकार, प्रशासन आणि कंत्राटदार वग