(कळेना मला)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
16 Aug 2021 - 12:34 pm

पेरणा संदीपभाउंची ही कविता http://misalpav.com/node/49141

(कळेना मला)

डोळ्या समोर तारे कसे चमकतात
हे तुमच्या तासाला पहिल्यांदा बसल्यावर...
...मला कळालं!

जीभ कशी अडखळते
हे तुम्ही पहिल्यांदा प्रश्र्न विचारल्यावर...
...मला कळालं!

हृदय कसे धडधडते
हे तुमच्या समोर पहिल्यांदा हात पुढे करताना...
...मला कळालं!

आता पुन्हा पुन्हा मार खायचा आहे हे माहीत असूनही
घरी जाताना, दरवेळी
गालावर उठलेली तुमची बोटं कशी लपवावी
हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही!

पैजारबुवा

काणकोणकैच्याकैकविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालकथाइंदुरीकृष्णमुर्ती

कळेना मला

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
16 Aug 2021 - 11:57 am

मनात मोर कसे नाचतात
हे तुला पहिल्यांदा पाहिल्यावर...
...मला कळालं!

जीभ कशी अडखळते
हे तुझ्याशी पहिल्यांदा बोलताना...
...मला कळालं!

हृदय कसे धडधडते
हे तुझा हात पहिल्यांदा हातात घेताना...
...मला कळालं!

पुन्हा भेटायचयं हे माहीत असूनही
तुझा निरोप घेताना, दरवेळी
डोळ्यातलं पाणी कस अडवावं
हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही!

- संदीप चांदणे

माझी कविताकविताप्रेमकाव्य

वर्तन विपर्यास

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
15 Aug 2021 - 10:43 pm

विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. अर्थात, तुम्ही म्हणाल या विधानात नावीन्य ते काय? प्रश्न माणसांसोबत कधी नव्हते? अगदी खरंय, ते आहेतच आणि असतीलही. समजा, तसे ते नसते तर प्रगतीच्या परिभाषा ना त्याने शोधल्या असत्या, ना परिमाणे वापरून परिणाम तपासले असते. एक मात्र खरंय की, काळाच्या ओघात अन् आयुष्याच्या प्रवासात पुढ्यात पडलेल्या प्रश्नांच्या व्याख्या बदलत असतात. कुणी म्हणेल की, बदल नावाचा प्रकार न बदलणारं वास्तव आहे. बदल हीच एक गोष्ट अशी असावी की, जी बदलता नाही येत कुणाला. बदलांना वेग असतो. चेहरा नसतो. तो द्यावा लागतो.

समाजलेख

तुटक तुटक..

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
15 Aug 2021 - 7:27 pm

१. रस्त्यावर वाढलेलं कुत्रं चुटकी वाजवून बोलावलं की लगेच शेपूट हलवत पायाशी येतं.. झोंबाळतं.. त्याच्या उचंबळून येण्याचा प्रवाह चहुदिशांना मुक्त असतो..
पण पाळलेल्या कुत्र्यांच्या प्रेमाचा ओघ त्यांच्या मालकांपुरताच वाहतो..

२. आकाशाने भुरकट ढग धरून ठेवले आहेत..
समोर स्तब्ध पाण्याच्या पृष्ठभाग.. तलम पापुद्र्यासारखा.. थरथरतोय अधूनमधून.. बहुतेक वाऱ्याच्या झुळकीचा हलका स्पर्श होतोय तिथे..
झाडाला विचारलं की हे खरंय का? तर त्यानंही होकारार्थी फांदी डोलावली...

मुक्तकप्रकटनविरंगुळा

सरगोंड्यांची झिंग

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Aug 2021 - 1:51 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

विरगावला पद्मनाभ स्वामींची समाधी आहे. ह्या समाधीकडे जाण्याचा रस्ता अतिशय छान उतारवळणाचा आहे. दर वर्षी आषाढी आमावस्येला वा दीपअमावस्येला (जिला आपल्या भागात गटार अमावशा म्हणतात) तिथं यात्रा भरते. म्हणजे मी लहान होतो तेव्हा भरत असे. यात्रेच्या दिवशी तिथं लळितही साजरं होत असे. ‘लळित’ म्हणजे एक प्रकारचं नाटक असतं. भारूड सादर करायची कला म्हणजे ‘लळित’. आता ते होणं बंद झालं. त्यात भाग घेणारे कलावंतही एकेक करत वारले.

वाङ्मयलेख

६० वर्षांपूर्वी...

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
14 Aug 2021 - 8:25 am

बर्लिनच्या भिंतीने शीतयुद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणावर मोठा प्रभाव टाकला होता.

इतिहासराजकारणसमीक्षालेख

विपरीत

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in जे न देखे रवी...
13 Aug 2021 - 10:38 am

1

चित्रसौजन्य- शलाका देगवेकर

विपरीत

दरवळे धुंद केवडा, न हो उलगडा, सुगंधी सडा कोण हा घाली?
केसांत खोवुनी पात, नार झोकात, चालते वाट जणू मखमाली।
भर दुपारचा तो प्रहर, उन्हाचा कहर, सावरी पदर, चिंब भिजलेला,
डौलात पडे पाऊल, नसे चाहूल, उडे का धूळ अशी बाजूला।

कविता

मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in जनातलं, मनातलं
12 Aug 2021 - 4:22 am

मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे

नमस्ते
२००० मध्ये डॉट कॉम बूम झाल्यापासून बरीच संकेतस्थळे सुरु झाली , त्यात ब्लॉग फोरम्स आणि इकडचे तिकडचे उचलले होते

बरेच ,९९% बंद पडले
त्यातले चालू असलेले आणि बंद पडलेले ह्यांची यादी बनवूया कारण विकिपीडिया एवढा अद्ययावयात नाही

बर्याच वर्षांपासून चालू असलेली संकेतस्थळ
मनोगत
मायबोली
मिसळपाव
इसाहित्य
मराठीमाती
ऐसी अक्षरे
मागे वळून पाहताना

बंद पडलेली

मीमराठी
भुंगा
मराठीप्रेमी
मराठीकिडे
काय वाटेलते

इतिहासप्रकटन

आठवणीतील श्रावण - कहाणी

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
12 Aug 2021 - 12:37 am

आता सगळं खुप जुनं झालंय , अन आपण आपल्या विकतच्या व्यापात इतके व्यग्र झालो आहोत की सगळ्या आठवणी कशा , दाट ढगांच्या आड अजिंक्यतारा धुसर होत जावा , तशा धुसर अस्पष्ट होत चालल्यात . पण असाच कधीमधी , कधी चांगल्या निमित्ताने तर कधी वाईट निमित्ताने , निवांत वेळ मिळतो , पुन्हा एकदा आठवणींच्या पेन्सिव्ह मध्ये डोकावुन पहायला उसंत मिळते तेव्हा अगदी आपल्या मनात बसलेल्या आपल्याच निरागस बाळस्वरुपाला गुदगुल्या केल्या सारखं वाटतं !

इतिहासअनुभव