कागदी गणेशमुर्ती आणि प्रदुषण
गणेश उत्सव म्हटलं की प्लॅस्टरऑफ पॅरिसच्या मुर्ती आणि पाणीप्रदुषणाची चर्चा सुरु होतेच. पर्यावरणवादी प्रदूषणाच्या नावाने बोंब सुरु करतात आणि त्याला तेव्हढेच जोरदार समर्थन उत्सववादी सुरु करतात. मागील कोरोनावर्ष सोडले हा शिमगा दरवर्षी सुरु असतो. काही स्वयंसेवी संघटनांनी मुर्तीदान चळवळ राबवली आणि पाण्याच्या प्रदुषणाचा काही प्रमाणात अटकाव केला. काही लोकांनी शाडूमातीच्या मूर्ती वापर करून पर्यावरणाला आधारच दिला.