सध्या मी काय पाहतोय ? भाग ८

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
31 Jul 2021 - 7:43 pm

डोर... २ स्त्रियांची कहाणी. दोन वेगळ्या स्त्रिया, वेगळ्या ठिकाणी राहणार्‍या... एकमेकांना भेटतात कारण त्यामागे एक डोर म्हणजे बंध... हा बंध भावनांचा आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गरजेचा.नागेश कुकनुर दिग्दर्शित २००६ सालचा हा चित्रपट असुन यात श्रेयस तळपदे ने सहज आणि सुंदर अभिनय केला असुन ज्या दोन मुख्य स्त्रियांची ही कहाणी आहे, त्या भुमिका आयेशा टाकिया आणि गुल पनाग यांनी साकारल्या आहेत.

कलाचित्रपटप्रकटनअनुभवविरंगुळा

'तबर'चा राजनय

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
31 Jul 2021 - 12:11 pm

भारत आणि रशिया यांच्यातील घनिष्ट संरक्षण संबंधांचे एक प्रतीक असलेली ‘भा. नौ. पो. तबर’ (आयएनएस तबर) ही युद्धनौका नुकतीच रशियन नौदल दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाली होती. त्या सोहळ्याच्या निमित्ताने रशियाच्या सदिच्छा भेटीवर असलेल्या ‘तबर’ने 22-26 जुलैदरम्यान सेंट पीटर्सबर्गमध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर 28-29 जुलैला ‘तबर’ने दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान होणाऱ्या ‘इंद्र’ युद्धसरावातही भाग घेतला.

धोरणवावरराजकारणसमीक्षालेख

स्मरण चांदणे१

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
30 Jul 2021 - 2:58 pm

स्मरण चांदणे १
      दक्षिणेस पसरलेल्या छोट्या माळाच्या आड दडलेले गाव,म्हणून आडगाव.पाचवी पर्यंतचे शिक्षण गावी झाले.
नंतरचे बीडला.त्या काळात,केव्हा सुट्टी मिळेल अन केव्हा गावी जाईन असे व्हायचे.शिक्षण संपून पुढे वकील,सरकारी वकील होतो तेव्हा ही ओढ कायमच होती.आई वडील गावी होते.तिथे आमचे घर होते.एकोणीसशे एकोण्णवदला वडील गेले. तिथले घर बंद झाले.बत्तीस वर्षे झाली.पण अजूनही गाव,तिथली देवळे ,उत्सव,जत्रा,माणसे अन ते दिवस,आठवतात.
तिथल्या देवळांशी जोडलेले सण,उत्सव ,जत्रा आठवतात.

मुक्तकविरंगुळा

क्रेडीट कार्डवरील व्यवहार कँन्सल करण्याबाबत मदत हवी आहे.

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
29 Jul 2021 - 8:14 pm

मी सहसा क्रेडिट कार्ड वापरत नाही. अगदीच अडचणीत हाताशी असावे इतपतच वापर करतो.
कार्ड घेतले त्या वेळेस कार्ड प्रोटेक्षन सर्व्हिस साठी ( सी पी पी आसिस्टन्स) रु.१६९९/- चे एक पॅकेज घेतले होते. यात कार्डचा विमा अपेक्षीत होता.
कालांतराने लक्षात आले की आपला कार्डचा वापर फारच खुपच कमी आहे.
या सर्व्हिस बद्दल मी विसरूनही गेलो होतो. गेल्या वर्षी सी पी पी ची रक्कम कार्डावर डेबीट झाल्यावर ती सर्व्हीस आपण वापरतोय हे लक्षात आले.
यंदा त्या सर्वीसबद्दल मला एक फोन आला.
त्या फोनवरच्या माणसाला मला ही सर्वीस नको आहे असे साम्गितले.

जीवनमानसल्ला

निसर्गाचा न्याय

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जे न देखे रवी...
29 Jul 2021 - 2:30 pm

निसर्गाचा न्याय
हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा,
युगे युगे असे ऋतुचक्र फिरे,
निसर्ग देतो भरभरून सारे
मानवाची हाव तरिही ना सरे !!
मानवाचे अनाचार वाढले,
निसर्गचक्र सारेच बिघडले
अवघी सृष्टी धरूनी वेठीस
स्वार्थासाठी तीला लुबाडले !!
मग प्रलय बनूनी पाऊस आला
झोडपून टाके सर्व जगाला,
नदीच झाला सारा गाव ,
सर्वस्व सवे घेऊन गेला !!
डोंगर कुशीतलं टुमदार गाव
निसर्ग सौंदर्याने डोळे दिपले
पाऊस माराने पडली दरड
उभे गावच गाडले गेले !!
निसर्गाचे नुकसान केले
गोठल्या मानवाच्या संवेदना,

कविता

दूरदर्शन

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in जनातलं, मनातलं
29 Jul 2021 - 5:52 am

मी सध्या काय पाहतोय दूरदर्शन
१) काही वर्षांपूर्वी दूरदर्शन " कोर्ट मार्शल " मुलाखतकार प्रदीप भिडे ( बातम्या)
https://www.youtube.com/watch?v=pUSFBwD2Hx4
२) अलीकडले दूरदर्शन " दुसरी बाजू " मुलाखतकार विक्रम गोखले
https://www.youtube.com/watch?v=OFBEtsv2bm8
३) https://www.youtube.com/watch?v=iiAQAIGp588

नाट्यप्रकटन

प्राचीन ज्ञानाचे पुनरुत्थान (डिजिटलीकरण) आणि प्रकाशन - पतंजलिचे महत्वपूर्ण योगदान

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
28 Jul 2021 - 5:07 pm

भारताची संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे. हजारो वर्षांत इथे निर्मित झालेले ज्ञान मौखिक आणि लिखित परंपरेत सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न विद्वानांनी सतत केले. अधिकांश लिखित ज्ञान ताडपत्र इत्यादीवर पुस्तक स्वरुपात सुरक्षित ठेवले. विदेशी आक्रांतानी आपले ज्ञान नष्ट करण्याचा पुरजोर प्रयत्न केला. लाखो पुस्तके जाळून नष्ट केली. तरीही कालप्रवाहात लाखो ताडपत्री पाण्डूलिपी निश्चित जिवंत राहल्या असतील. देशाला स्वतंत्रता मिळाली. पण आपले दुर्भाग्य गुलामी मानसिकता असलेल्या काळ्या साहेबांचे राज्य भारतात आले. आपल्या प्राचीन ज्ञानाविषयी त्यांच्या मनात आदर कमीच.

संस्कृतीलेख

मदतकार्यातले पर्यटन - गांधारपाले लेणी.

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
28 Jul 2021 - 12:13 am

पुर, वादळ, भूकंप अशा नैसर्गीक आपत्तीच्या प्रसंगी आपण सगळेच मानवधर्माला जागुन यथाशक्ती मदतकार्यात सहभागी होतो त्याप्रमाणे काल दिनांक २६ जुलै २०२१ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड शहर आणि परिसरातील वाड्या, वस्त्यांमधील पुरग्रस्त रहिवाशांना अन्नवाटप करण्यासाठी मित्रांबरोबर जाणे झाले.