वजिर सुळका ट्रेक.

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in भटकंती
27 Aug 2021 - 3:27 pm

ठाणे जिल्ह्यातील 'माहुली' हा किल्ला ट्रेकर्ससाठी एक आवडता ट्रेक आहे. त्यातही तो मुंबईकरांना जवळ. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेला हा गड त्याच्या सुळक्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातीलच एक सुळका म्हणजे 'वजीर' सुळका. माहुली गडाचा पसारा हा दक्षिण उत्तर असा पसरला असून त्याच्या दक्षिणेला अनेक सुळके आहेत. यातील सगळ्यात शेवटचा सुळका म्हणजे वजीर. माहुली किल्ल्याचाच भाग असला तरी वजीर सुळक्याचा ट्रेक हा माहुली किल्लयाच्या ट्रेकपासून पूर्ण वेगळा आहे. तसेच, वजीर ट्रेक हा तुलनेने खूप सोपा ट्रेक आहे.
मुंबईपासून पन्नास किमीवर असलेला हा ट्रेक पटकन करण्यासारखा तसेच नव्या ट्रेकर्ससाठी एक चांगली सुरुवात आहे. तसेच छोटा असला तरी तो सुंदर मात्र नक्की आहे. ट्रेकची सुरुवात नंदिलकेश्वर या मंदिरापासून होते. तिथे पिण्याचे पाणी तसेच निवार्याची सोय होऊ शकते.
अलीकडेच मी दोनदा या ट्रेकला जाऊन आलो. पहिल्या फेरीला खूप पाऊस होता आणि दुसऱ्या फेरीला उन्हाने भाजून काढले. या दोन्ही ट्रेकचा व्हिडीओ क्लिप्स मिळून एक व्हिडीओ तयार केला आहे. मी पहिल्यांदाच ट्रेकिंग व्हिडीओ बनवला असून व्हॉईसओव्हर एडिटिंग करताना स्टुडिओत दिला आहे.

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

27 Aug 2021 - 3:59 pm | शानबा५१२

माझा एक मित्र खुप ट्रेकींग करतो, तो सारखा म्हणतो : "ट्रेकींग करायला फक्त पाऊसातच जावं, बिल्कुल पाय घसरत नाही, आणि घसरलाच तर काय होतंय?"

mayu4u's picture

27 Aug 2021 - 4:37 pm | mayu4u

आवाडला.

वजीर सुळक्याच्या पायथ्याला सायकल ठेवायची सोय होऊ शकते का?

इरसाल कार्टं's picture

27 Aug 2021 - 8:14 pm | इरसाल कार्टं

नंदिकेश्वर मंदिरात भरपूर जागा आहे.

कंजूस's picture

27 Aug 2021 - 5:47 pm | कंजूस

धुमतारा येऊ द्या.

इरसाल कार्टं's picture

27 Aug 2021 - 8:16 pm | इरसाल कार्टं

लवकरच व्हिडीओ येईल

प्रसाद_१९८२'s picture

27 Aug 2021 - 8:40 pm | प्रसाद_१९८२

'वजिर' पर्यंत चढाई करावी ती त्याला गवसणी (कातळ चढाई) घालण्याकरता, हे ट्रेक वगैरे सर्व फालतू गोष्टी आहेत. ज्याला ट्रेक करायचाच आहे त्याने श्रावणात छिडीघाट मार्गे भिमाशंकराला जावे. (आपआपल्या जबाबदारीवर)

शानबा५१२'s picture

27 Aug 2021 - 8:50 pm | शानबा५१२

हे ट्रेक वगैरे सर्व फालतू गोष्टी आहेत.

- आणि ते "फ्री क्लाईंब" की काय बोलतात ते करणारे लोक तर काही सुरक्षा म्हणजे दोरी वगैरे न वापरता खडकी पर्वत चढत जातात. काय फा......ना? नायतर काय!

शानबा५१२'s picture

27 Aug 2021 - 8:52 pm | शानबा५१२

तुमच्या म्हणण्यानुसार गृहीत धरले तर वजीर सुळक्याची कातळ चढाई हि इतर ठिकाणांच्या मानाने 'फालतू' ठरेल.

गोरगावलेकर's picture

8 Sep 2021 - 11:29 am | गोरगावलेकर

माहुलीचा उल्लेख वाचून तीन वर्षांपूर्वीची भटकंती आठवली. टिटवाळ्याचा महागणपती, आटगांव/आसनगाव जवळचे "मानस" जैन मंदिर पाहून आम्ही माहुली सुळक्यांच्या पायथ्याशी असलेल्या निसर्ग केंद्रात पोहचलो होतो.

सुळक्यांना नवरा, नवरी, भटोबा, करवली अशी मजेशीर नावे स्थानिकांनी दिली आहेत.
या फोटोत वजीर सुळका आहे का कुठे?

येथील एक आठवण.
येथे महिला बचत गटातर्फे जेवणाची सुविधा पुरवली जाते. आम्ही गेलो तो दिवस रक्षाबंधनाचा असल्याने बचत गटाच्या बहुतेक सर्व महिलांनी सुटी घेतली होती. हजर असलेल्या एकट्या महिलेने जेवण बनवून देण्यास होकार दिला पण वेळ लागणार होता. म्हणून मदतीसाठी मी चुलीचा ताबा घेतला. तासाभरात ग्रुपच्या पंधरा जणांचा स्वयंपाक आटोपला होता.

गोरगावलेकर's picture

8 Sep 2021 - 11:32 am | गोरगावलेकर

माहुलीचा उल्लेख वाचून तीन वर्षांपूर्वीची भटकंती आठवली. टिटवाळ्याचा महागणपती, आटगांव/आसनगाव जवळचे "मानस" जैन मंदिर पाहून आम्ही माहुली सुळक्यांच्या पायथ्याशी असलेल्या निसर्ग केंद्रात पोहचलो होतो.

सुळक्यांना नवरा, नवरी, भटोबा, करवली अशी मजेशीर नावे स्थानिकांनी दिली आहेत.
या फोटोत वजीर सुळका आहे का कुठे?

येथील एक आठवण.
येथे महिला बचत गटातर्फे जेवणाची सुविधा पुरवली जाते. आम्ही गेलो तो दिवस रक्षाबंधनाचा असल्याने बचत गटाच्या बहुतेक सर्व महिलांनी सुटी घेतली होती. हजर असलेल्या एकट्या महिलेने जेवण बनवून देण्यास होकार दिला पण वेळ लागणार होता. म्हणून मदतीसाठी मी चुलीचा ताबा घेतला. तासाभरात ग्रुपच्या पंधरा जणांचा स्वयंपाक आटोपला होता.

माहुलीचे मिपावरचे लेख.

भालदार फेस (माहुली )

https://www.misalpav.com/node/20402

_________________________

किल्ले माहुली (कल्याण दरवाजाच्या खडतर वाटेने)
https://www.misalpav.com/node/21990
या लेखात आहे वजीर सुळका.
_______________________
माहुली गड |
https://www.misalpav.com/node/23981
आणि ब्लॉग फोटोसाठी.
http://mahuligad.blogspot.com/?m=1
_______________________
पुनःश्च किल्ले माहुली (Fort Mahuli Trek)
https://www.misalpav.com/node/24082
_______________________

रंगभूत सुळका (माहुली किल्ला) आणि ५२ वर्षांचा तरुण
https://www.misalpav.com/node/30433
_______________________

वजिर सुळका ट्रेक.
https://www.misalpav.com/node/49185

चौथा कोनाडा's picture

8 Sep 2021 - 1:08 pm | चौथा कोनाडा

भन्नाट आहे व्हिडो, बघून जावेसेच वाटायला लागले !
+१
इरसालजी कार्टो _/\_

इरसाल कार्टं's picture

9 Sep 2021 - 10:47 am | इरसाल कार्टं

खरेतर मीही पहिल्यांदाच ट्रेकचा व्हिडीओ बनवलाय.

इथे विडीओ पहिला तर तु-नळी नंबर वाढतो का?

इरसाल कार्टं's picture

8 Sep 2021 - 7:38 pm | इरसाल कार्टं

माहित नाहि

गॉडजिला's picture

8 Sep 2021 - 11:36 pm | गॉडजिला

.