धत् तेरे की...
तसं म्हटलं तर त्यांची ती होती खरीखुरी डेट
पण तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..
सुट्टीचा दिवस होता,
Backdrop ला पाऊस होता.
Romantic होतं weather,
एकांताची हलकी चादर.
ती म्हणाली, खरंच येऊ? तो म्हणाला, yes plz, I'll wait....
पण... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..
खरंतर त्याच्याचसाठी नेसली ती नव्वीन साडी
ह्रदयात तिच्या धडधडणारी सुप्परफास्ट होती गाडी.
तरी बरं तोंडावरती लावला होता मोठ्ठा मास्क
नाही तर hiding feelings is not a simple task!
चेहरा कोरडा करून म्हणे, "Soooo sorry for the late"
पण.... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..
जिन्स आणि झब्ब्यामधे तो दिसत होता सुप्पर cool.
कसं काय सांगणार ती, शब्दच तिचे झाले गुल..
मग काय, जगातले सगळे विषय झाले चावून,
पण त्यात मुद्याची गोष्ट तेवढी गेली राहून.
वेळ गेला वाहून, पण कोरी राहिली त्यांची slate...
अन् तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..
पैंजणांना हात जेव्हा लावला त्याने झुकून
डोळे मिटून त्याचा गंध घेतला तिने माखून..
गजरा होता समोर पण केसात नाही माळला..
एक इंच अंतर; स्पर्श कटाक्षाने टाळला..
To be or not to be चं सालं अडकवणार net.
अन् तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..
पाणी सगळं संपलं, तहानेलं करून.
अधुरीशी सल त्यांच्या मनामध्ये भरून.
दोघं आता एकमेकांच्या टाळतात नजरा
पण अजूनही तिच्या घरी सुकलेला गजरा..
खरंच असं घडलं, सांगतं टेबलावरचं paperweight..
....तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही त्यांची भेट..
लॉकडाउन डेट मधे दुसरे काय होणार?
हो खरं. अर्र.. आता नाही बदल
अर्थ बदलून जाईल
चालवायला जुनी आठवण हवीच असं
एकदम मस्त
धन्यवाद.:)
मस्त!
अहाहा मस्त.
धन्यवाद. :) तुम्हा सर्वांची
मला ही कविता समजुन घ्यायची
जोडवी ही विवाहित स्त्री घालते
मर्म राघवाने सांगितलंयच.
मलाही
प्रयत्न करते उलगडायचा..
:)
हेच म्हणाणार होतो…
:)
जोडवं म्हटलं तर जास्त
सुंदर लिहिलंय, नेहमीप्रमाणेच!
:):)धन्यवाद.
भेट
धत् तेरे की...
करेक्ट. तेच गाणं डोक्यात होतं
मस्त लिहिलंय
:) धन्यवाद!
पैंजणांना हात जेव्हा लावला
=))
=))=))
कविता खूप आवडली प्राची mam
:):) हे जाम भारी आहे. आता
छान कविता, आवडली
व्वा!
वाह! फार सुंदर!