मर्कट वंश
कपिकुळाला सांगणारा तोच माझा वंश आहे,
माझ्यातही थोडासा त्या मर्कटाचा अंश आहे
संथ पाण्या पाहूनि, मोहुनि जाई कुणी,
खडे त्यात फेकण्याची का मला ही खोड आहे?
विचित्र या शब्दातही , चिवित्र काही शोधतो मी,
शोधल्यावरी सापडे काही , हे मात्र गूढ आहे
माणसे ठेवती जपूनी धीर वा गंभीर चेहरे
मुखवटयांच्या खालती त्या एक मंद स्मित आहे
तेच थोड़े ओठी येण्या, करो वाटे मग खट्याळ चाळा
खोल गेल्या वात्रटाला साद घालता मजा आहे
भली भली माणसे असती आतून व्रात्य मुलांपरी
या मुलांच्या हातावरी टाळी देण्याची खाज आहे