मक्याची पोळी आणि डाळवडे गुंडाळी!
शीर्षक दिलाय मराठी खरं पण हि पाककृती आहे लेबनी / इजिप्त मध्ये मिळणाऱ्या फलाफल रोल ची ... आज थोडी खिचडीच झालीय खर करताना पिझ्झ्यासारखी , वाढताना गुंडाळी केलेली आणि पातळ पोळी
साहित्य
- फलाफल वडे ( छोले आणि तीळ, पार्सली आणि जिरे वैगरे घातलेले मिश्र वडे म्हणा ना ) हे मी तयार आणून त ळून किंवा एअर फ्र्यार मध्ये खरपूस करून घेतले
- काकडी , गाजर, तांबडी आणि पिवळी ढब्बू मिरची, टोमॅटो चिरून
- टेस्टी चीज
- चटण्या: मिळत असेल तर ताहिनी ( तिळाची ) किंवा होमस पण आज लसणाची अयोली ( फेसलेले अंडे आणि ऑलिव्ह तेल ) आणि स्वीट चिली सौस वापरले