कुणी एक चांदणी नवथर
खाली आली धरणीवर
काय कसले तिला ना ठावे
इकडे तिकडे कोठे जावे
भूकेलेली रडवेली
रडून कोमेजलेली
तशात भेटला तिजला प्रियकर
अशाच चांदणीसाठी होता आतूर
कोण कुठली तू आलीस कशी
आपूलकीने त्याने केली चौकशी
लांब असते दूरदेशी येथे परदेशी
कोण मज पाठवील पुन्हा मजदेशी
प्रियकर उदार उमदा चांदणीस आवडला
परी स्वगृहाच्या ओढीने जीव खंतावला
मी तर तुझा आताचा प्रियकर
घर तुझे कधीचे सुखकर
नको तू गृह विरह सहू
तू अन मी वेगळे होवू
प्रियकर त्वरीत निर्णय घेई
प्रियेस त्याच्या पोहचवून देई
हा राहीला पुन्हा एकला
रोज रात्री पाही तिजला
चांदणीही विरहात तळपे
अंधारअंगणी रात्रीस झळके
दोन जिवांची अशी ताटातुट झाली
प्रियकरास चांदणी कधी न मिळाली
पाभे
१४/१०/२०२१
प्रतिक्रिया
15 Oct 2021 - 1:11 am | रंगीला रतन
कुणी एक चांदणी पोवथर
अस वाचल होतं.
भंकस जाऊनदे, करुण कवीता आवल्डली :=)
पोवथर = ‘कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती’ इती. ह. भ. प. रावले महाराज.