पर्वतावरचा पाषाण - बालकथा

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
20 Mar 2023 - 3:00 pm

फार फार वर्षांपूर्वी एका पर्वताच्या माथ्यावर एक भलाथोरला पाषाण राहत होता. त्याच्या आजूबाजूला खूप हिरवळ, झाडे आणि वेली असल्यामुळे तिथले वातावरण नेहमीच प्रफुल्लित असायचे. वसंत ऋतूत तर तिथे कोवळ्या रानफुलांच्या ताटव्यांनी बहार यायची. तो पाषाण तिथल्या सर्व झाडवेली आणि फुलांशी मनमोकळ्या गप्पा मारायचा. त्या सर्वांची एकच भाषा होती, स्पर्शाची. असेच दिवस मजेत चालले होते. सर्वजण सुखाने आजूबाजूला नांदत होते.

बालकथालेख

महिलादिन-एक चितंन

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
18 Mar 2023 - 7:12 pm

अस्वीकरण-सदर विडंबन केवळ मनोरंजना साठी लिहीले आहे. वाचल्यानंतर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्यासाठी आगोदरच क्षमा मागतो.

बोले तो आज जागतीक महिला दिन है l

क्या बात करते हो! मै तो हर रोज महिला दिन मनाता हूँ l

सुबह उठते ही उसके लिये एक कप चाय बनाता हूँ l

सच कहता हूँ...

सुबह शाम हर कोई मुझे आयना दिखाती है l

फिर भी,

हर महिला मेरे लिये मायनारखती है l

कविवर्य बा.भ. बोरकर,संदीप खरे या दिग्गज कविनीं, "नसतेस घरी तू जेंव्हा" सारख्या कविता करून महिलांची महती गायली आहे.थोडा हातभार आमचा पण लागलायं.

मुक्तकविडंबनविचारचौकशीमदतविरंगुळा

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ८: कलबुर्गी- मन्नेखेली (९६ किमी)

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
16 Mar 2023 - 2:02 pm
प्रवासक्रीडालेखअनुभव

मुगाच्या डाळीचे इन्स्टेंट सूप

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
15 Mar 2023 - 10:45 am

एकदा एका मित्राच्या घरी मुगाच्या डाळीचे सूप प्यायला मिळाले. पातळ घोटलेली मुगाची डाळ त्यावर तूप आणि जिर्‍याची फोडणी. स्वाद चांगला होता. मुगाच्या डाळीत उत्तम प्रथिने असतात. पचायला ही हलकी असते. पण हॉस्पिटलवाल्या डाळीचा ठपका मुगाच्या डाळीवर लागलेला आहे. घरी कमीच बनते. मनात विचार आला आजकाल इन्स्टेंटचा जमाना आहे. पाच मिनिटांच्या आत आपण मुगाच्या डाळीचे सूप बनवू शकतो का? काल सकाळी सौ. ने उपमा केला होता. त्याच वेळी डोक्यातली ट्यूब लाईट पेटली. भाजलेला रवा उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर दोन मिनिटात उपमा शिजतो.

तू जाताना...

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
15 Mar 2023 - 9:59 am

अश्रू जरा ओघळले तू जाताना
ना शब्द ओठी फुटले तू जाताना...

जलप्रलय यावा तैसा पूर नदीला
आभाळ ही कोसळले तू जाताना...

ती रात होती पुनवेची तेव्हा ही
का चांदणे ना पडले तू जाताना...?

हे वेदनेचे काटे रस्त्यातूनी
ना फूल कोठे फुलले तू जाताना...

उधळून जीवन गेले तेव्हा माझे
वादळ जरासे उठले तू जाताना...

ही वेस ओलांडूनी गेलीस तसे
आधार सारे तुटले तू जाताना...

दीपक पवार.

कविता माझीकविता

शशक | नैवेद्यम

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in जनातलं, मनातलं
14 Mar 2023 - 3:00 pm

“व्हॉट आर दे डुईंग नाऊ मामा?”
“टोल्ड यु विहान, डिन्ट आय? कॉल मी आई, ओके? नाऊ दे आर ऑफेरिंग नैवेद्यम”
“व्हॉट आर दे ऑफरिंग मा..आई?”
“आय गेस भाजी-भाकरीए. भाजी इज ऑफ लिफी व्हेजी मे बी फेनुग्रीक, अँड भाकरी इज अ फ्लॅट ब्रेड मेड अप ऑफ मे बी बाजरा ऑर जोवार. सी, सी विठोबा लाईक्स ऑरगॅनिक फूड! या?”
“शिल्पा, नॉट विठोबा, विठेश्वर!”
“पापा, सॉरी, बाबा, माला आयडिया आली. मास्टरशेफ ज्यु फर्स्ट राऊंड साठी जोवार भाकरी बेस पिझ्झा विथ लिफी, अललॉट ऑफ व्हेजी टॉपिंग्स बनाउ?”

भाषाअनुभव

हळीवचे लाडू

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
13 Mar 2023 - 8:25 pm

पहिलाच प्रयत्न आहे,योग आला म्हणून बनवले :).थंडीमध्ये हे मुख्यतः हे लाडू खाल्ले जातात.हळीव हे पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवात तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न असते. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बीटाकॅरोटिन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळिवांत आहेत.

माझी आवडती पुस्तके भाग: २

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
13 Mar 2023 - 7:24 pm

माझ्या सर्वात आवडत्या पाच पुस्तकांबद्दलचा हा माझा दुसरा लेख आहे.. पहिल्या भागात मी दोन पुस्तकांबद्दल लिहिलंय, या भागात उरलेल्या तीन पुस्तकांबद्दल लीहतोय.

पहिल्या भागाचा दुवा:
माझी आवडती पुस्तके भाग: १

३. एक होता कार्व्हर:

कलालेखअनुभव