यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.
लखनौच्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची मागणी केल्यानंतर समस्त भारतीय जनतेला काही कृती कार्यक्रम देण्याची गांधीजींची योजना होती. पण कोणते आंदोलन करावे ते डोळ्यासमोर नव्हते. संपूर्ण समाज, धर्म-जात विरहित भावनेने उतरू शकेल असे आंदोलन त्यांना सुरू करायचे होते. आणि अचानक त्यांच्या डोळ्यासमोर मीठ आले. त्यावेळी सरकारने मिठावर कर लावला होता. मीठ घरी तयार करायला बंदी घातली होती. वास्तविक मीठ ही निसर्गाची देणगी. त्यावर कसला कर? असा गांधीजींचा सवाल. त्यामुळे या कराला विरोध करण्यातून मिठाचा सत्याग्रह करण्याचे ठरविले.
वास्तविक शेतसार्यासह अनेक विषयांवर आंदोलन करण्याचे प्रस्ताव त्यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी पुढे आणले होते. पण गांधींनीही मीठच निवडले. कारण त्यात असलेली व्यापकता. मीठ हा पदार्थ जेवणात अत्यंत महत्त्वाचा. मीठ वगळता जेवण म्हणजे अळणी. थोडक्यात चवहीन. त्यामुळे कोणत्याही खाद्य पदार्थात मीठ हवेच. शिवाय जाती-धर्मभेदापार मिठाची व्याप्ती आहे. त्यामुळे या आंदोलनाला कोणातीही जातीय, धार्मिक किनारही येणार नाही हेही गांधीजींनी हेरले. पण वल्लभभाई पटेलांपासून मोतीलाल नेहरूंपासून अनेकांना गांधीजींच्या या आंदोलनाच्या यशाबद्दल विश्वास वाटत नव्हता.
पण तराही गांधीजींनी हे आंदोलन सुरू करायेच ठरवले. साबरमतीपासून पायी यात्रा सुरू करून सूरतजवळ असलेल्या दांडी येथे जायचे आणि तिथे जाऊन मीठ उचलून सरकारी कायद्याचा 'सविनय' भंग करायचा एवढे सोपे हे आंदोलन होते. त्यानंतर घरोघर मीठ तयार करायला सुरवात होणार होती. आंदोलनातला हा सोपेपणा फार परिणामकारक होता. सरकारचा निषेध करण्याचा याहून सोपा मार्ग नसेल. गांधीजींचे म्हणणे एकच होते, या आंदोलनात कोणताही हिंसाचार अपेक्षित नव्हता. कारण चौरीचौरा येथील अनुभव ताजा होता. आंदोलनाचे त्यांनी बरेच नियमही दिले होते. अहिंसा हा त्यापैकीच एक. तसाच, ब्रिटिश ध्वजाचाही आदर राखणे हाही एक. कारण उघड आहे. युनियन जॅक जाळण्याचा प्रयत्न झाल्यास चिडलेले ब्रिटिश सोजिर हाणा-मारायला कमी करणार नाहीत आणि आंदोलन उगाचच कार्यकर्त्यांकडूनही हिंसाचाराकडे ढकलले जाईल, अशी भीतीही त्यांना होती.
म्हणूनच या आंदोलनासाठी गांधीजींनी ७८ आंदोलक नीट निवडले. आपल्याला अपेक्षित त्या गोष्टी त्यांना समाजावून सांगितल्या. या आंदोलकांत तरूणांपासून वृद्धांपर्यंत आणि सर्व जाती धर्माचे लोक होते. ही सगळी मंडळी साबरमतीहून दांडीकडे निघाली. जाताना गांधीजींनी आपल्या सामाजिक सुधारणांचाही अवलंब करण्याचा यत्न केला. त्यासाठी हरिजनांच्या घरी जेवणे, सामाजिक अभिसरण व्हावे यासाठी मुद्दाम प्रयत्न करणे हे सगळे प्रकार केले.
अखेरीस दांडी येथे जाऊन या जत्थ्याने मीठ उचलले आणि ब्रिटिश कायदा मोडला. ब्रिटिशांनी हे आंदोलन मोडण्याचा खूप प्रयत्न केला. पण आंदोलन मोडावे कसे हेच त्यांना कळत नव्हते. कारण साबरमतीहून निघाल्यानंतर ते दांडीपर्यंत पोहेचेपर्यंत गांधीजींनी कोणताच कायदा मोडला नव्हता. शिवाय हिंसाचारही होत नव्हता. त्यामुळे कोणत्या कारणाखाली गांधींना रोखावे हेच ब्रिटिशांना कळत नव्हते.
गांधीजींनी प्रत्यक्ष कायदा मोडल्यानंतर त्यांना अटक करून पुण्यात पाठविण्यात आले. त्यानंतर देशभर या आंदोलनाचा भडका उडाला. पेशावरपासून ते पाटण्यापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवघा देश गांधींच्या या आंदोलनात एकवटला. त्याने स्वातंत्र्याचे उद्दिष्ट जरी लगेच साध्य झाले नाही, तरी कॉंग्रेसमध्ये आणि देशभरात गांधीजींचे नेतृत्व सर्वमान्य झाले. पूर्ण स्वराज्याची मागणी ताकदीने इंग्रजांपर्यंत पोहोचवली गेली.
गांधीजींच्या या आंदोलनाला मिळालेल्या यशाचे काही परिणामही पहाण्यासारखे आहेत. अहिंसात्मक आंदोलनामागचा गांधीजींचा विचार फार व्यापक होता. हिंसात्मक आंदोलनात ब्रिटिशांकडून दडपशाही होते. नेते, कार्यकर्त्यांना गुप्त राहून कामे करावी लागतात. त्यात पकडले जाण्याचा धोका असतो. समाजाला विचार देणारा नेता तुरूंगात आणि प्रसंगी जगातूनच नाहिसा होतो. त्यातून कार्यकर्त्यांमध्येच आणि प्रामुख्याने सर्वसामान्य लोकांमध्ये आंदोलानाबद्दल भीतीची भावना निर्माण होते. धाडसाबद्दल आदर असला तरी ते स्वतः दाखविण्याकडे लोकांचा कल नसतो. त्यामुळे आंदोलनाला व्यापकत्व मिळत नाही. या उलट अहिंसात्मक आंदोलनात त्यातही मिठाच्या सत्याग्रहासारख्या कार्यकर्त्यांकडून हिंसा होण्याची शक्यता नव्हती. आणि ब्रिटिशांपुढेही या कार्यकर्त्यांच्या अटकेव्यतिरिक्त फार काही पर्याय नव्हते. तांत्रिकदृष्ट्या अटक झाली तीर सुटका होण्याचेही मार्ग उपलब्ध होते. वैयक्तिक नुकसान फार होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळेच सामान्य माणूस या आंदोलनात सहज सहभागी होऊ शकत होता.
गांधीजींच्या या उद्देशांनाही बर्यापैकी यश आल्याचे दिसून येते. आंदोलनाची देशभर व्यापकताच ते दाखवून देते. लॉर्ड आयर्विन या ब्रिटिश व्हॉईसरॉयला गांधीजींशी करार करावा लागला. तिकडे ब्रिटनमध्ये असलेला चर्चिल या 'नंग्या फकिरा'च्या या अफाट ताकदीमुळे खवळला होता. या फकिराने व्हॉईसरॉयसारख्या उच्चपदस्थ अधिकार्यासमोर चर्चेला यावे हेच त्याला सहन होण्यासारखे नव्हते. पण मिठाच्या सत्याग्रहाने ते घडविले.
याच काळात सशस्त्र क्रांतीचे आंदोलन त्या काळात नेताजींच्या मार्फत सुरू असले तरी त्यांच्या प्रयत्नांना दुर्देवाने मर्यादा पडल्या. पुढे तर त्यांना याच आंदोलनासाठी देशाबाहेरही जावे लागले. तिकडे सावरकरांना ब्रिटिश सरकारने जखडून ठेवले होते. भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांनाही व्यापक जनसहानुभूती असली तरीही त्यांना फासावर जावे लागल्याने भारतीय समाज निर्नायकी अवस्थते आला होता. तेच ओळखून गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत गिरवलेला अहिंसात्मक आंदोलनाचा पाठ भारतीय भूमीत गिरवला. गांधींच्या या आंदोलनाने निःशस्त्र आंदोलनाची नवी ज्योत पेटवली. भारतीय जनांच्या सहभागाने त्यामागून हजारो ज्योती पेटत गेल्या
उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?
प्रतिक्रिया
12 Nov 2009 - 5:36 pm | परिकथेतील राजकुमार
अगदी अगदी !
ह्याहुन सार्थ ओळी म्हणजे "दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल."
आहे का आवाज ?
कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ??
बोला राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय !!
©º°¨¨°º© दुरात्मा परादास गांधी ©º°¨¨°º©
आमचे राज्य
12 Nov 2009 - 6:11 pm | विनायक प्रभू
उचलल्याने तब्बेतीचा पाया खचतो असे डॉक्टर म्हणतात हो.
13 Nov 2009 - 6:48 pm | भोचक
खलिल जिब्रानविषयी वाचत होतो नि त्याचे एक वचन सापडले.
निश्चितपणे मिठात एक पावित्र्य आहे, कारण त्याचे अस्तित्व अश्रूतही आहे नि समुद्रातही !
-खलिल जिब्रान
(भोचक)
रविवार पेठ आणि कुठेही भेट !
हा आहे आमचा स्वभाव
12 Nov 2009 - 10:30 pm | एकलव्य
साधारण ३महिन्यांपूर्वी मी दांडीयात्रेच्या दरम्यान त्याकाळी विविध पत्रकारांनी केलेले लिखाण वाचले आणि एका केवढ्या मोठ्या रोमांचकारी (आणि शिकविणार्याही) इतिहासाकडे वरवर पाहिले होते याची जाणीव झाली.
उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?
नक्कीच!
एकलव्य
12 Nov 2009 - 7:55 pm | प्रशान्त पुरकर
~X( तात्या काय वाचतो आहे हे मिपा वर......... ~X(
12 Nov 2009 - 8:09 pm | llपुण्याचे पेशवेll
घाबरू नका. माझा हृदय परीवर्तनावर पूर्ण विश्वास आहे. उदाहरणार्थः ते कलंत्रीकाका बघा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
12 Nov 2009 - 9:13 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री भोचक, एका चांगल्या लेखाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. देशाला स्वातंत्र्य कशामुळे मिळाले यावर विचार होत राहतील पण गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाचा मार्ग त्यानंतर मार्टीन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांनीही यशस्वीपणे अवलंबिला यावरून या आंदोलनाची परिणामकारकता लक्षात यावी.
12 Nov 2009 - 9:22 pm | कलंत्री
या सत्यग्रहाचे वेगळेच असे अंग आहे. गांधींनी महिलाना स्वातंत्र्य लढयात भाग घ्यायला नेहमीच उद्यूक्त केले, पण या आंदोलनासाठी त्यांनी मात्र स्त्रींयाना दुरच ठेवले. तेंव्हा सरोजिनी नायडूंनी असा पवित्रा घेतला की तुम्ही यात भाग घेण्यासाठी जर आम्हाला परवानंगी दिली नाही तर प्रथम तुमच्याविरुद्ध आमचा सत्याग्रह सुरु होईल आणि शेवटी त्यांना परवानंगी मिळाली.
12 Nov 2009 - 9:46 pm | वेताळ
शेवटी स्त्रीहट्ट व नेहरु हट्ट गांधीजी सोडले तर पुरे कोण करणार म्हणा.
वेताळ
12 Nov 2009 - 9:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पत्रकार अंबरीश यांच्या लेखाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यू...!
'मौज'चा अंक अजून नै चाळला राव.. :(
-दिलीप बिरुटे
12 Nov 2009 - 9:36 pm | jaypal
प.रा. जी "कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ?? बोला राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय !!"
ज्ञानदेवा रचीला पाया तुका झालासी कळस. (म्हणुन केवळ तुका स्रेष्ठ ठरत नाही की निव्वळ ज्ञानदेव) सर्वच महान होते.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
12 Nov 2009 - 10:52 pm | विकास
अंबरीश मिश्रांचे "गंगेमधे गगन निवळले" अशा काहीशा नावाचे एक गांधीजींवर चांगले पुस्तक आहे, त्यात हे सर्व तसेच एकंदरीतच गांधीजींचे भारतातील राजकीय जीवन हे "श्रद्धावंता"च्या नजरेतून उर्धृत केलेले आहे. त्यातील एकंदरीत सूर (अथवा पुस्तकाचे/लेखकाचे अनुमान) असे आहे की गांधीजींनी काँग्रेसला आवडो - नआवडो स्वतःच्या विचारांतून चळवळ चालू केली. त्याला येणारी समाजमान्यता लक्षात घेता काँग्रेसला त्यांचे नेतृत्व मान्य करण्याशिवाय पर्याय राहीला नाही.
बाकी वर पराने म्हणल्याशी काही अंशी सहमत. तरी देखील "दे दी हमे आझादी बीना..." पेक्षा गदीमांचे "उचलीलेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया" थोडे अतिशयोक्तीपर असले तरी मीठाच्या सत्याग्रहाचा परीणाम नक्कीच झाला होता, पण त्याच मुळे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणलेले वाटत नाही.
-------------------------------------------
बाकी टिळकांच्या दिशेने चालू झालेली स्वदेशी जीचा वापर सावरकरांनी विद्यार्थी दशेत केला ज्याचा परीणाम पण विसरता कामा नये. टिळक पर्भृतींनी चालू केलेल्या फर्ग्यूसन मधून त्यामुळे सावरकरांना निलंबीत व्हावे लागले, ते केले कोणी तर रँग्लर परांजप्यांनी! असो. हे सांगण्याचा उद्देश इतकाच की त्यातूनच पुढे गांधीजींच्या खादीस स्वदेशी म्हणून मान्यता मिळवणे सोपे झाले.
स्वदेशीच्या माध्यमातून टिळकांनी चालू केलेली चळवळ हे केवळ ज्यांना जमू शकेल अशांच्याच हातातील स्वातंत्र्ययुद्ध म्हणूनही राहीले नाही आणि त्यात असलेली गर्भित/प्रकट आर्थिक नाकेबंदी हा ब्रिटीशांच्या धंदेवाईक वृत्तीस आणि पर्यायाने साम्राज्यास दिलेले पहीले उत्तर होते. टिळकांना यामुळे स्वातंत्र्य तात्काळ मिळेल असे वाटले नव्हते, किंबहूना स्वतःच्या जिवंतपणी स्वातंत्र्य मिळेल असे त्यांना कधीच वाटत नव्हते. ते फक्त स्वातंत्र्यचळवळीसाठी पुढील सर्व सामाजीक पिढीस तयार करायचा त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करत होते. (त्यांच्या भाषेत ते फक्त चळवळीचा श्रीगणेशा करत होते). या स्वदेशीचाच पुढचा भाग, मीठ सत्याग्रह होता. पैशावरून पुन्हा एकदा नाकेबंदी करून, गांधीजींनी योग्य अशीच आर्थिक कारणावरून दांडी यात्रेत नाकेबंदी घडवून आणली...१९२० सालला म्हणूनच टिळकयुगाचा अस्त आणि गांधी युगाची सुरवात असे म्हणले जाते.
आर्थिक कारणांप्रमाणेच, १९४६ साली प्रत्यक्षात झालेले नावीक दलाचे बंड जे आता कधीपण होऊ शकेल अशी भिती ब्रिटीशांमधे उत्पन्न झाली ते म्हणजे मुख्य सावरकर आणि तसेच त्या विचारांच्या इतर नेतृत्वाचा असलेला सैनिकीकरणास पाठींबा हे पण कारण होते.
असे सर्व म्हणण्यात गांधीजींचे महत्व आणि नेतॄत्व गूण कमी होत नाहीत पण त्यावर दाखवली जाणारी एकांगी श्रद्धामात्र रहात नाही आणि योग्य त्या ठिकाणी आदर आणि "क्रेडीट" पण दाखवले जाते.
13 Nov 2009 - 12:27 am | निमीत्त मात्र
असे कुणीही म्हंटलेले नाही. खुद्द गांधींनी देखिल कधी असे म्हंटले नसावे.
बाकी गांधींचे नाव आले की 'नेमेची येतो मग पावसाळा' प्रमाणे झोंबलेल्या मिरच्या पोहोचल्या.
13 Nov 2009 - 10:32 am | विशाल कुलकर्णी
<<बाकी गांधींचे नाव आले की 'नेमेची येतो मग पावसाळा' प्रमाणे झोंबलेल्या मिरच्या पोहोचल्या.>>>
प्रत्येक गोष्टीतुन स्वतःला सोयिस्कर तो अर्थ काढणे कुणी तुमच्याकडुन शिकावे.
<<<असे कुणीही म्हंटलेले नाही. खुद्द गांधींनी देखिल कधी असे म्हंटले नसावे. >>>
बापुंचे ठिक आहे, पण मग "दे दी हमे आझादी....." सारखी गाणी काय दर्शवतात?
गांधीजींना कमी लेखण्याचा मुळीच हेतु नाही. त्यांचं महत्व शिरसावंद्यच आहे, पण गांधीजींचा महिमा गाताना इतरांच्या देशभक्तीकडे, त्यांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष होवू नये एवढीच अपेक्षा. भगतसिंग प्रभुतींचे प्राणार्पण, सावरकरांनी अंदमानात भोगलेल्या हाल अपेष्टा, सुभाषबाबूंनी केलेले महत्प्रयास, टिळक, चाफेकरादी देशभक्तांचे कार्य, बंगालमधील अनेक क्रांतिकारकांनी देशासाठी अर्पण केलेले प्राण हे सगळे व्यर्थ आहे का?
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
13 Nov 2009 - 9:23 pm | llपुण्याचे पेशवेll
बाकी गांधीजींचे नाव ऐकताच त्यांना झोंबलेल्या मिरच्या पाहून तुम्हाला मीरच्या झोंबल्या हे पाहून मौज वाटली.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
13 Nov 2009 - 11:29 am | भोचक
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
विकासजी, अंबरिश मिश्र यांचे जे पुस्तक आहे, ते 'गंगेत गगन वितळले' या नावाचे आहे. त्यात गांधीजींनी भारतात जे काही कार्य केले, त्याचा पाय दक्षिण आफ्रिकेत कसा रचला गेला. त्यांनी काय काय 'प्रयोग' केले ते त्यात दिले आहेत. गांधीजींची जडणघडण त्यातून कळते. अर्थात, हे लिहिताना गांधींकडे फार खालून पाहिल्याने ते उंच दिसतात, यात काही वाद नाही. पण गांधींची ही जडणघडणही सोपी नाही. त्यातल्या अनेक प्रयोगांसाठी त्यांनी इतरांनाही भरडले आहे, स्वतःला तर आहेच आहे. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती आणि परंपरांचा फार अभ्यास त्यांनी केल्याचेही लक्षात येते.
बाकी. गांधींच्या या एका सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले हे म्हणण्याचे धाडस मी तरी कधीच करणार नाही. कारण बाकीच्या सशस्त्र क्रांतिकारकांबद्दलही मला तितकीच आस्था आहे.
थोडं वैयक्तिक- माझ्यापुढे गांधी म्हणजे 'खिलाफत चळवळीला पाठिंबा देणारे, चौरीचौराच्या आंदोलनानंतर आंदोलकांचा हिरमोड करणारे, चले जावमधील हिंसेबद्दल काही न बोलणारे, फाळणीच्या योजनेला मान्यता देणारे, प्रसंगी जिनांकडे या देशाची धुरा द्या, पण फाळणी होऊ देऊ नका असे म्हणणारे, पाकिस्तानी टोळीवाल्यानी घुसखोरी केल्यानंतरही पाकिस्तानला त्यांच्या वाट्याचे ५५ कोटी द्या असा आग्रह धरणारे असेच गांधी होती. गांधींविषयी नकारात्मक मते बनविण्यासाठी एवढी उदाहरणे पुरेशी होती. यालाच मग नेहरूंना पुढे आणणे, पटेलांना मागे सारणे, सुभाषबाबूंना कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून काम करू न देण्यासारखी परिस्थिती निर्माण करणारे, भगतसिंगांच्या फाशीविषयी स्वतःचा शब्द खर्ची न पाडणारे इत्यादी उपप्रकरणेही गांधींची 'खलनायक' म्हणून प्रतिमा करायला पुरेशी होती. ओशोंचे गांधीवादाची खिल्ली उडवणारे पुस्तक वाचल्यानंतर या 'महात्म्या'ची किवही आली.
सावरकर आणि टिळकांबद्दल आस्था असल्याने गांधींविषयीचे हे नकारात्मक मुद्दे फार प्रकर्षाने दिसून यायचे. त्यात एका मोठ्या माणसांविषयी त्याच्या चुका दर्शविणारी पुस्तके बरीच असल्याने आणि चर्चा त्याचीच होत असल्याने ही मतेही ठाम बनली होती. पण पुढे गांधी वाचायला सुरवात केली आणि काही धुके निवळले. त्यांचे इतरही गुण पैलू दिसून आले. याचा अर्थ गांधी पूर्णांशाने चांगले होते असे नाही, पण त्या कालखंडावर अफाट असा प्रभाव त्यांनी कसा निर्माण केला याविषयी काही हाती लागले.
मुळात गांधी अखिल भारताला व्यापून कसे उरले होते, याचे आश्चर्य वाटायचे. लोकांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता का होती? ब्रिटिशांनाही भारताविषयी बोलण्यांसाठी हा नंगा फकिरच का सापडायचा? आणि परदेशातही त्यांनी अनेकांना प्रेरणा कशी दिली असावी? असे अनेक प्रश्न पडायचे. माझ्या पणजे सासूबाईंनी एकदा सांगितले, की त्या बंगालमध्ये असताना गांधीजी त्यांच्या गावी आले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या पाया पडलो, त्यासाठी कशी झटापट चालली होती याचं रसभरीत वर्णन त्यांनी केलं होतं. अनेक स्त्रियांना त्यावेळी त्यांच्यासमोर आंदोलनासाठी स्वतःचे दागिने काढून दिल्याचे त्यांनी सांगितले. हा किस्सा ऐकल्यानंतर तर अजूनच आश्चर्य वाटले. असे किस्से पुस्तकातून वाचणे वेगळे नि प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार असलेल्या व्यक्तीकडून ऐकणे वेगळे. त्यांच्या या किश्श्यामुळे थरारून जाऊन मी गांधी वाचायला सुरवात केली. त्यात काही चांगल्या गोष्टी सापडत गेल्या. त्यांची जडणघडण कळली. स्वतःवर केलेले प्रयोगही समजले. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती याचा अभ्यास त्यांच्याइतका दुसर्या कोणत्याही भारतीय नेत्याने क्वचित केला असावा असे वाटले. भारतीय मानसिकताही त्यांनी बरोबर ओळखली म्हणूनच त्यांना झेपेल, पचेल रूचेल असेच आंदोलन त्यांनी चालवले.
पण त्याचवेळी त्यांचे इतरही 'गुण' जाणवले. संयमनाचा अतिरेक. नैतिक मुल्यांमध्ये त्यांच्या मुलांची झालेली फरफट. खादीचा अट्टाहास. वगैरे वगैरे.
दुसर्यांना स्वतःच्या नियमांमध्ये बसविण्याचा अट्टाहास करणारा हटवादी 'महात्मा'ही यातूनच कळला. (प्रभा नारायण आणि जयप्रकाश नारायण यांना म्हणे त्यांनी 'आत्मसंयमन' पाळायला सांगितले होते! )
या देशाला फक्त गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले यावर माझाही विश्वास नाही. पण त्यांचे योगदान मोठे होते, हेही टाळून चालणार नाही. त्याचवेळी गांधींचा कॉंग्रेसमध्ये झालेला उदय तोपर्यंत कॉंग्रेसमध्येच सक्रिय असलेल्या जिनांना वळचणीला टाकणारा ठरला आणि त्यातच फुटीरतेची बिजे पेरली गेली हेही तितकेच सत्य आहे. कॉंग्रेसचे सर्वमान्य नेते म्हणून गांधींनी एस्टाब्लिश होताना जिनांना अलगद दूर सारले नि कॉंग्रेसवर वर्चस्व मिळवले हे सत्य आहे. पण हे करताना त्यांनी सर्वांना बरोबर घेतले (जिना वगळता) हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
जिना आणि गांधी यांच्यातील 'लव्ह अँड हेट' रिलेशनशिपही पहाण्यासारखी आहे. गांधीजींच्या हत्येनंतर जिनांनी पाकिस्तानातील शोकसभेत त्यांचा उल्लेख म्हणे 'मि. गांधी' असाच केला होता.
(भोचक)
रविवार पेठ आणि कुठेही भेट !
हा आहे आमचा स्वभाव
13 Nov 2009 - 12:18 pm | चिरोटा
आईनस्टाईनने एका पत्रात म्हंटले आहे-
Mahatma Gandhi's life achievement stands unique in political history. He has invented a completely new and humane means for the liberation war of an oppressed country, and practised it with greatest energy and devotion.We may all be happy and grateful that destiny gifted us with such an enlightened contemporary, a role model for the generations to come.
गांधी हत्येनंतर आईन्स्टाईन यानी म्हंटले होते-
Generations to come, it may be, will scarce believe that such a one as this, ever in flesh and blood walked upon this earth.
भेंडी
P = NP
13 Nov 2009 - 1:00 pm | गणपा
भोचक राव तुमच्या लेखा सारखाच हा प्रतिसादही उत्तम.
14 Nov 2009 - 12:14 am | भडकमकर मास्तर
प्रतिसाद भयंकर आवडला...
माझ्याच मनातलं बोललात....
त्यांच्या सर्व चुकाबिका आणि राजकारण मान्य करूनही प्रभावी व्यक्तिमत्त्वाबद्दल कुतुहल वाटतेच...
13 Nov 2009 - 1:24 pm | यशोधरा
भोचक, आपला लेख उत्तम आहे, तसाच, तुम्ही लिहिलेला प्रतिसादही.
फक्त, "पण हे करताना त्यांनी सर्वांना बरोबर घेतले.. " ह्या ऐवजी, ज्यांनी गांधींची तत्वे मान्य केली, त्यांना बरोबर घेतले, असे वाटते. नाहीतर सुभाषबाबू, स्वा. सावरकर यासारख्या व्यक्तींना जर का आपल्या लोकप्रियतेचा फायदा जर त्यांनी करुन दिला असता, तर कदाचित आज भारताचे चित्र वेगळे असू शकले असते...
13 Nov 2009 - 8:41 pm | विकास
भोचकराव,
पुस्तकाचे नाव दुरूस्ती केल्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम कुठल्याही ऐतिहासीक नेतृत्वाबद्दल मला आदरच आहे, त्याचे विचार पटोत अथवा न पटोत. विचार करा नुसत्या एका संकेतस्थळावर स्वतःचे विचार इतरांपर्यंत पोचवायला अवघड जाते, पटवणे तर फारच लांब! तिथे स्वतःच्या बाजूने लोकांना वळवून समाजमन बदलण्याची ताकद असते आणि ती देखील स्वतःच्यापश्चात टिकते तिथे तुम्ही-आम्ही कोण! :)
थोडं वैयक्तिक- माझ्यापुढे गांधी म्हणजे 'खिलाफत चळवळीला पाठिंबा देणारे, ...ओशोंचे गांधीवादाची खिल्ली उडवणारे पुस्तक वाचल्यानंतर या 'महात्म्या'ची किवही आली.
प्रामाणिकपणे, माझ्या नजरेतील, वरील सर्व मान्य असूनही यातील कुठल्याही गोष्टींमुळे गांधीजींबद्दलचा आदर कमी होत नाही फक्त तो डोळस राहतो. केवळ निष्क्रीय माणूसच बिनचूक असू शकतो असे वाटते... वास्तवीक पहाता हे माझेच नाही तर इतर अनेकांचे, जे स्वतःला गांधी-विरोधक समजतात, त्यांचे त्यांच्या नकळत असेच म्हणणे असू शकते असे वाटते. थोडक्यात गांधीजींना होणारा विरोध हा त्या व्यक्तीपेक्षा गांधीवादाला आहे, ज्यात स्वतःला गांधीजींचे अनुयायी म्हणणार्यांनी निव्वळ ढोंगबाजी आणि स्वाध्यायशून्यता आणत जनसामान्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कधी कधी वाटते की स्वातंत्र्योत्तर नेहरूंनंतर जर शास्त्री अधिक काळासाठी पंतप्रधान म्हणून राहून देशास नेतृत्व देऊ शकले असते तर कदाचीत गांधीजींची इतकी टवाळी झाली नसती....अर्थात तीच अवस्था हिंदूत्ववाद्यांची आणि तशाच इतर चांगल्या विचारधारांची आहे.
सावरकर आणि टिळकांबद्दल आस्था असल्याने गांधींविषयीचे हे नकारात्मक मुद्दे फार प्रकर्षाने दिसून यायचे.
या बाबतीतपण माझे त्याच पद्धतीत म्हणणे मात्र उलट स्वरूपातही आहे. म्हणजे, गांधीवादाला उदात्त करण्यासाठी सावरकर आणि हिंदूत्ववादास झोडपले जाते. बरं गांधीवादाचा वापर तरी समाज घडवायला झाला आहे का? तर तसेही दिसत नाही तो निव्वळ त्याची समाजमनासाठी अफूची गोळी करून स्वतःच्या स्वार्थाचे घोडे पुढे दामटवायला झाला आहे.
आपल्या वरील लेखात देखील (आपण, अथवा अंबरीश मिश्रांनी) जरी नेताजी, सावरकर, भगतसिंग आदींना नावे ठेवली नसली तरी त्यांचा उल्लेख करत नकळत गांधीजींची थोरवी वाढवायचा प्रयत्न झाला आहे आणि लगेच शेवट येतो की, "उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?" जर दांडीयात्रेबद्दल आणि त्याच्या झालेल्या चांगल्या परीणामांबद्दल लिहायचेच होते तर ते तेव्हढ्याबद्दलच का लिहीले जात नाही? तसे झाले असते तर माझा प्रतिसादही तितकाच (+१) करणारा आणि केवळ गांधीजींपुरताच मर्यादीत राहीला असता.
मला खात्री आहे की आपण हे मुद्दामून केले नाहीत, पण ती आपल्याला (म्हणजे तुम्हा-आम्हाला-समाजाला) सवयच लागलेली आहे. इथे सर्व खटकते आणि म्हणूनच पुढचे उत्तर हे गांधेतर नेत्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी नाही तर मूळ लेखातील खटकलेली बाब आणि त्यातील अर्धाच दिसणारा इतिहास पूर्ण दाखवण्यासाठी देणे भाग पडते. जर लेखात गांधीजीच असते तर माझ्या उत्तरातही केवळ गांधीजीच दिसले असते.
कृपया यातील काही व्यक्तिगत नाही अथवा मूळ लेखावर वरचा मुद्दा सोडल्यास टिका अथवा आक्षेपही नाही ह्याची खात्री असावी.
धन्यवाद
14 Nov 2009 - 11:43 am | भोचक
विकासजी, मुळ अंबरिश्र मिश्र यांच्या लेखातही या ओळी नाहीत. त्या लेखाविषयी लिहावे असे वाटत असताना अचानक त्या आठवल्या नि लिहिल्या गेल्या. हे लिहिण्यातून स्वातंत्र्य मिळविण्याचे पूर्ण श्रेय गांधींच्या पदरी जाईल, असे वाटलेही नव्हते. (सुरवातीला मी म्हटल्याप्रमाणे याच ओळीतल्या उत्तरार्थाची खिल्ली मी स्वतःच पूर्वी उडवत होतोच.) पण दुर्देवाने त्या ओळीतून नको तोच संदेश गेला. मला गांधींशी असलेले मतभेद राखून त्यांचे व्यापकत्व मांडायचे होते. गांधींवर टीका करणारी कडवी मंडळी असतानाही आणि त्यांच्या टीकेतही नक्कीच काही तथ्य असतानाही, (त्यांचे आकर्षण वाटण्याची तीव्र शक्यता असतानाही) गांधींचा जनमानसावर इतका प्रभाव का आणि कसा 'होता', याविषयी मला पडलेले कुतूहल आहे. केवळ कॉंग्रेसचे प्रमुख नेते असे गांधींचे स्थान कधीच नव्हते. (ते स्वतःही कॉंग्रेसचे एका आण्याचेही सदस्य नव्हते.) मग एका भल्या मोठ्या समाजाला गांधी इतके स्वीकारावे का वाटले असतील हे समजत नाही. तेच शोधून काढण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे.
बाकी तुमचा असाच अभ्यासपूर्ण प्रतिसाद अपेक्षित होता हे सांगणे न लगे.
(भोचक)
रविवार पेठ आणि कुठेही भेट !
हा आहे आमचा स्वभाव
13 Nov 2009 - 6:06 am | फारएन्ड
चांगला लेख आहे. आवडला.
त्या 'उचललेस तू..' या ओळी कोठेतरी वाचल्यासारख्या वाटतात. कदाचित शाळेच्या पुस्तकात. त्या गदिमांच्या आहेत हे वरती वाचले. मूळ कविता/गाणे कोणते आहे?
13 Nov 2009 - 8:51 am | विकास
त्या गदिमांच्या आहेत हे वरती वाचले. मूळ कविता/गाणे कोणते आहे?
मला वाटते ती कविता वगैरे नाही आहे, केवळ त्या एका घटनेवरून सुचलेल्या त्या ओळी आहेत. त्या पाठ्यपुस्तकात आपल्याला होत्या.
13 Nov 2009 - 10:22 am | सुनील
ह्या ऐतिहासिक घटनेचे विविध पैलू उलगडून दाखवणारा उत्तम लेख.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Nov 2009 - 12:33 pm | हर्षद आनंदी
ही राष्ट्रभक्ती अफ्रीकेत बॅरीस्टर म्हणुन जगताना कुठे गेली होती?
देवभोळ्या, सहिष्णु भारतीयाला अहिंसेचे नपुंसक धडे देऊन नेभळट बनविल्याबद्दल महात्म्याचे आभार!!
अहिंसा बलवानाला शोभते, मात्र महात्म्याला अहिंसा कळली होती का, हाच प्रश्न उपस्थित होतो जेव्हा जालियनवाला बागेतील अत्याचाराचा बदला घेतल्यावर महात्मा निषेध करतो किंवा सैनिकीबळावर भारतीयांना प्रबल बनवुन देश जिंकुन घेण्याचा प्रयत्न करणार्या बोस, सावरकरांना पध्दतशीरपणे राजकारण करुन वाळीत टाकले जाते तेव्हा!!!
जेव्हा ईंग्रजांचे कंबरडे हिटलरने मोडले, तेव्हा भीक घातल्यासारखे देशाचे २ तुकडे करुन स्वातंत्र्य पदरात पाडुन घेणार्या, त्या स्वातंत्र्यापोटी इंग्रजांनी रुजविलेल्या धार्मिक द्वेषाच्या झाडाला खतपाणी घालुन असंख्य भारतीयांच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या महात्म्यास कोटी कोटी प्रणाम!
कदाचित हिटलर नसता तर महात्मा कधीच महात्मा बनु शकला नसता, दाचित हा लेखनप्रपंच ही नसता.. कदाचित... कदाचित कदाचित... रक्ताची किंमत मोजुन मिळालेले स्वातंत्र्य आज एवढे भ्रष्ट झाले नसते.
गांधीवधानंतर एक थोर समाजसुधारक, राजकारणी म्हणाला होता
"it is best news ever I heard" असे त्यांच्या पी.ए. ने लिहुन ठेवले आहे.
वा काय महात्मा आहे?
13 Nov 2009 - 3:30 pm | परिकथेतील राजकुमार
हर्षद शेठ मस्त हो !!
शब्दा शब्दाशी सहमत.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
13 Nov 2009 - 12:59 pm | प्रशान्त पुरकर
हर्शल यान्च्याशी सहमत्....कदाचित दुसर्या महायुधात एन्ग्रजान्चे कम्बरडे मोडले नसते तर त्यनि अपल्याला एवढे सहजासहजि स्वन्त्रत्र केले नसते....फक्त गन्धिन्मुळे मि़ळाले हे खरच पट्त नाहि...
13 Nov 2009 - 1:46 pm | ऋषिकेश
लेख उत्तम आहे.. खूप आवडला
काहि प्रतिसादांमधे अपेक्षेप्रमाणे (प्रथेप्रमाणे) काहिहि संबंध नसताना इतर महापूरुषांना मधे ओढलेले बघुन मौज वाटली :)
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
13 Nov 2009 - 3:34 pm | विशाल कुलकर्णी
<<काहिहि संबंध नसताना इतर महापूरुषांना मधे ओढलेले बघुन मौज वाटल<<>>>
गांधीजीबरोबर ही नावे येणे अपरिहार्यच असते भाऊ. कारण गांधीजींना त्यांच्या चुका उघडपणे दाखवुन देणारे आणि गांधीजींमुळेच भारतीय राजकारणातुन वाळीत टाकले गेलेले असे हे महापुरुष आहेत
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
13 Nov 2009 - 6:19 pm | ऋषिकेश
हे माझ्यासाठी नवीन आहे. असो.
माझ्या मते इतर महापुरूषांचे कर्तृत्त्व इतके मोठे आहे की त्याला सिद्ध करायला गांधीद्वेषाच्या कुबड्यांची गरज नाहि.
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
13 Nov 2009 - 4:11 pm | विशाल कुलकर्णी
:-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
13 Nov 2009 - 3:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
भोचकभाऊ, लेख आणि प्रतिसाद तुमच्या किर्तीला जागणारे, माहीतीपूर्ण आणि अभ्यासू! मी गांधींचं, त्यांच्याबद्दल साहित्य वाचलं तर त्याचा दोष तुम्हालाही! :-)
अदिती
13 Nov 2009 - 3:47 pm | भोचक
अदिती ,
या दोषाचा धनी व्हायला नक्की आवडेल. समंजसरावांचा प्रतिसादही त्यांच्या नावाला साजेसा.
(भोचक)
रविवार पेठ आणि कुठेही भेट !
हा आहे आमचा स्वभाव
13 Nov 2009 - 3:17 pm | समंजस
गांधींजींना आणि त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या मागे जाउन, मिठ सत्याग्रह यशस्वी केल्या बद्दल गांधींजी आणि त्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या सगळ्यांना विनम्र अभिवादन.
ती एक मोठी आणि फार महत्त्वाची घटना होती.
देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात करोडो लोकांचा सहभाग होता. जेव्हढ्यांनी नेत्रुत्व केले, ते सर्वच महान होते.
त्या सर्वच लोकांनी आपले वैयक्तीक आयुष्य ह्या कार्यात घालवलं (आजचे करोडपती नेते सत्ते करता भांडताना बघून वाटतं की बरं झालं, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्यांना भविष्य माहित नव्हतं)
सर्वांचा मार्ग एकच नव्हता, मात्र उद्देश एकच होता, स्वातंत्र्य मिळवीणे. आणि तेच जास्त महत्वाचे होते.
गांधीजींचे सर्वच विचार हे पटो ना पटो, त्यांचे स्वातंत्र्य चळवळतील योगदान महत्त्वाचे होते. स्वातंत्र्य चळवळ ही क्रिकेट च्या सामन्या सारखी नव्हती की, त्यात कोणाचे योगदान किती हे मोजता येईल किंवा कोण सामनावीर हे ठरवता येईल तसेच लढाईत कोण मृत्युमुखी पडला, कोण वाचला या वरून, शुरपणा ठरत नसतो तर जिंकलो की हरलो हे महत्त्वाचे (व्यक्तीगत मत)
करोडो लोकांना जागे करणे, घराबाहेर काढणे, मागे यायला लावणे, प्रंसगी लाठ्या खायला लावणे(ते सुद्धा भारता सारख्या देशात जिथे कृतीशून्य, संवेदना बोथट झालेल्या, आपला स्वार्थ आधी बघण्यार्या लोकांचा भरणा जास्त आहे) त्यांना विश्वास देणे की स्वातंत्र्य हे मिळणारच. ही माझ्या दृष्टीने एक अशक्यप्राय गोष्ट जी गांधीजींनी प्रत्यक्ष केली. त्यांच्या ह्या नेत्रुत्व गुणाला माझा सलाम (ह्याच बाबतीत मनावर प्रभाव टाकणारा दुसरा नेता म्हणजे हिटलर. त्याचे एकूण कार्य मला न पटो, पण त्याच्या ह्या लोकांना प्रभावीत करण्यार्या गुणा मुळे तरी मी त्याला सलाम करतो.)
13 Nov 2009 - 4:07 pm | सुवर्णा
गांधीजीकडे असलेले नेतॄत्वगुण आणि त्यांना मिळालेला भारतीय जनतेचा पाठिंबा हे खरेच कौतुकास्पद आहे, आणि त्यांनी अध्यात्म, भारतीय संस्कॄती-परंपरा वगैरे यांचा केलेला अभ्यास हेसुध्दा.. पण त्यांनी कितीही प्रयत्न केला असला तरी त्यांना त्यांच्यातल्या षडरिपूंवर त्यांना पूर्णपणे मात नाही करता आली आणि इथेच त्यांच्यातला महात्मा हरला..
असो..
शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं..
सुवर्णा
http://www.suvarnam.blogspot.com/
13 Nov 2009 - 4:16 pm | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
कसला जबरदस्त विचार आहे !! शिवाजी महाराज हातात एक काठी आणि दोन बायका पुढे :) असं करून औरंग्या समोर उपोषणाला बसलेत .. आणि बाकी मावळेही त्यांच्यामागे भजनं गात बसलेत !! वा वा वा !! औरंग्या आणि मुघल साम्राज्य पळूनच गेलं असतं घाबरून =))
आणि गांधीजींना घोड्यावर पसून तलवार घेऊन "जय भवानी... जय शिवाजी" "हरहर महादेव" च्या घोषणा देताना इमॅजिन केलं .. आणि आपल्या भावना पोचल्या !!
(आज हसून हसून विचारवंत होणार कदाचीत)
13 Nov 2009 - 4:32 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =)) =))
=)) =))
आवरा रे ह्याला !! टार्या लेका तु आजकाल अनआवरेबल झाला आहेस बघ.
तुझा रतिसाद... आपल प्रतिसाद वाचुन गलित गात्र झालो एकदम.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
13 Nov 2009 - 4:55 pm | सुवर्णा
मी तर फक्त तुलना केली होती.. तुमचा प्रतिसाद बघितला..
आता काय बोलनार!! =))
सुवर्णा
http://www.suvarnam.blogspot.com/
13 Nov 2009 - 9:29 pm | llपुण्याचे पेशवेll
अरे याला आवरा रे!!
पुण्याचे पेशव
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
13 Nov 2009 - 4:10 pm | टारझन
भोचक आणि प्रतिसादकर्ते (खासकरून पर्या आणि हर्षद) ,
खुलाश्याबद्दल धन्यवाद !!!
-- टोचक
13 Nov 2009 - 4:56 pm | नितीनमहाजन
ब्रिटिशांच्या जुलुमामुळे व त्रासामुळे सर्वच भारतीय जनता त्रासलेली होती. सामान्य जनता मनातून याचा विरोध कसा करावा याचा विचार करीत होती. सामान्य माणसाला सशत्र क्रांतीचा पर्याय नक्कीच आकर्षक वाटत होता कारण त्यातून ब्रिटिश सत्तेविरुध्द ताबडतोब व थेट हल्ला करता येतो हे दिसत होते. पण त्यासाठी आवश्यक असणारी मानसिकता, धैर्य व शारिरीक तयारी सर्वांजवळ नव्हती.
मला काहिही करून या जुलुमाचा विरोध करायचा आहे, पण तो कसा करायचा हे समजत नाही अशा द्विधा मनस्थितीत ही पारतंत्र्यातील जनता वावरत होती. या सर्वांना गांधीजींनी योग्य मार्ग दाखविला तो म्हणजे अहिंसेने व सविनय कायदेभंग. सामान्य माणसाच्या हातात फक्त त्याचा देह आणी त्याचे मन असले तरी तो या अहिंसात्मक प्रतिकाराद्वारे आपला विरोध दाखवू शकतो हे गांधीजींनी जाणले. या अतीशय परिणामकारक अशा शस्त्राने सारा भारत देश नक्की पेटून उठेल याची त्यांना खात्री होती. जेव्हा सामान्य माणसाचा सहभाग एखाद्या चळवळीत होतो तेव्हा ती फोफावायला वेळ लागत नाही. प्रत्येक सामान्य माणूस विचार करायला लागतो की अरे माझ्या शेजार्याला जर हे जमते जर मला का नाही जमणार? मग प्रत्यक्ष सहभागानंतर तो सामान्य माणूसही अभिमानाने म्हणू शकला की मी ब्रिटिश सत्तेला विरोध केला, माझाही या स्वातंत्रलढ्यात खारीचा का होईना पण वाटा आहे.
आणि येथेच गांधीजी व सशस्त्र क्रांतीकारक यांच्यात फरक होतो. सशस्त्र क्रांतीकारकांनी कितीही प्रयत्न केले तरीही सामान्य माणसामध्ये स्फुल्लिंग जागवण्याचे काम करणे फार अवघड होते.
मला येथे गांधीजी, सावरकर व सुभाषचंद्र बोस यांची तुलना करायची नाही पण स्वातंत्रलढ्यामध्ये सामान्य जनतेला सहभागी करुन घेण्यामध्ये गांधीजी यशस्वी झाले हे मात्र नक्की. मला स्वतःला सावरकर व सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यांनी ब्रिटिश सत्तेला दिलेले आव्हान याला जगात तोड नाही. सावरकरांची बोटीतील उडी, अंदमानमधील काळेपाणी यासारखे दुसरे उदाहरण जगात नाही. तसेच सुभाषचंद्र बोस यांनी प्रत्य्क्ष ब्रिटिश सेनेलाच आपल्याबाजूला वळवले हेही उदाहरण जगात एकमेवाद्वितीयच. पण एक सामान्य माणूस यापैकी काय करू शकतो. तुम्ही स्वतःला विचारून पहा की यापैकी आपण कशात सामिल झालो असतो. ज्याप्रमाणे आपल्या संतांनी संसारात राहून देवभक्ती करायला शिकवले ससेच गांधीजींनी पारतंत्र्यातील गांजलेल्या सामान्य माणसाला देशभक्ती करायला शिकवली असे मी म्हणतो.
मिठाच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजांवर बोट ठेवले व दाखवून दिले की पहा हे ब्रिटिश राज्यकर्ते आपल्या जमिनीवर तयार केलेले मीठ आपल्यालाच अधिक रक्क्म देऊन खरेदी करायला लावत आहेत. तुम्हीच विचार करा हे योग्य आहे का? जर अयोग्य वाटत असेल तर चला माझ्याबरोबर विरोध करायला. का नाही सामान्य माणूस पेटून उठणार सांगा?
बाकी चर्चा उत्तम चालली आहे.
नितीन
15 Nov 2009 - 11:05 am | मनीषा
गांधीजी .. म्हणलं की मला पु.लं च्या अंतु बर्व्याचे तत्वज्ञान आठवते ...
" --- माणूस असेल मोठा , पण आम्ही त्यांचा मोठेपणा कुठ्ल्या खाती नोंदवावा ? ---- रोज तुपाशी खाणर्या उपाशी माणसाचे कौतुक .. इथे निम्मे कोकण उपाशी "
आणि " ---इंग्रज गेला तो कंटाळून , लुटण्यासारखे काही शिल्लक राहिले नाही म्हणुन फुंकले दिवाळे "
गांधीजींच्या आंदोलनाचे महत्व म्हणजे अगदी तळागळातील लोकांना आपल्या पारतंत्र्याची जाणिव झाली . तोपर्यंत मुठभर विचारवंतच फक्त ब्रिटीश सत्तेशी झगडत होते . पण 'गांधींजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले-----' हे विधान अतिशय विपरर्यस्त आहे .
15 Nov 2009 - 11:20 am | टारझन
अच्छा , म्हणजे गांधीजींनी आंदोलन करण्याआगोदर "तळागाळातली लोकांना" अगदी स्वातंत्र्य असल्याची अनुभुती मिळत होती काय?
15 Nov 2009 - 12:30 pm | मनीषा
अनुभूती कसली? त्यांना स्वतंत्र्य म्हणजे काय हेच माहित नव्हते ...
भारतातील ६०% ते ७०% जनता शेती आणि शेती संबधीत व्यवसाय करणारी ... ब्रिटीशांच्या आधी जमिनदार , वतनदार त्यांना लुटत होते. आपले हक्क काय आहेत, आपल्यावर अन्याय होतो आहे त्याचा प्रतिकार करायला हवा आणि तो आपण करु शकतो ह्याची जाणिव नक्कीच गांधीजींच्या आंदोलनामुळे झाली
15 Nov 2009 - 12:47 pm | टारझन
इंग्रजांनी एवढं गुपचूप राज्य केलं आपल्यावर ? तरीच ते एवढे दिवस राज्य करू शकले.. थँक्स टू गांधी !! ते नसते तर आजही आपल्याला कळले नसते की आपल्यावर नक्की कोण राज्य करतोय ते !!
मला उगाच वाटायचं, एवढे षंढ (बनवले गेलेले) लोक जर नुसता आंदोलनं करून मार खाऊन येत असतील त्यापेक्षा प्रत्येकी एक इंग्रज खपवला असता तर इंग्रज लै आधी पळून गेला असता ..
15 Nov 2009 - 1:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
श्री. टारझन, सुधा मूर्ती यांनी 'वाईज अँड अदरवाईज'मधे लिहिलं आहे की उदीशा*च्या जंगलांमधे त्यांना असेही म्हातारे भेटले होते ज्यांना राणीचंच राज्य सुरू आहे असं वाटत होतं.
अदिती
*उदीशा किंवा उडीसा किंवा ओरिसा, माझा प्रचंड गोंधळ झाला आहे या नावाबद्दल!
15 Nov 2009 - 1:43 pm | मिसळभोक्ता
श्रीमती अदिती,
श्री टारझन, हे कुमार टारझन आहेत. त्यामुळे त्यांना सदर संदर्भ देऊन उगाच त्यांच्या डोक्यात कीडे करण्यापेक्षा, आपले संदर्भासहित स्पष्टिकरण एक वेगळा लेख म्हणून प्रकाशित करावे ही विनंती.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Nov 2009 - 11:01 pm | आळश्यांचा राजा
ते नाव आहे, ओडिशा. (ओड्र विशय - ओडिविशा - ओडिशा). ओडिया लोकांना`श' नीट म्हणता येत नाही. ते "स'" म्हणतात. आणि इथे ड ला र करतात. म्हणून ओरिसा.
सुधा मूर्तींचा अनुभव खराच. मला २००९ मध्ये असे तरूण लोक (म्हातारे सोडा) ओरिसामध्ये भेटले आहेत ज्यांना खरंच माहीत नाही राज्य कोण करतं. असो. विषयांतर नको. पण कमालीचे दारिद्र्य आणि घोर अज्ञान जो कुणी जवळून पाहील त्याला गांधीजी आपोआप नीट समजतील. कसलेही वाद घालण्याची त्याची इच्छा होणार नाही.
आळश्यांचा राजा
15 Nov 2009 - 1:35 pm | मनीषा
---
15 Nov 2009 - 1:32 pm | मनीषा
समजुतीचा घोटाळा दिसतो आहे ...
ब्रिटीशांनी गुपचुप राज्य केलं नाही तर त्यांनी केलेल्या अन्यायाचा जनतेने प्रतिकार केला नाही असं मला म्हणायचं होतं .
(तुम्ही नीळ आणि कापूस शेती करणार्यांवर ब्रिटीशांनी लादलेले नियम आणि कायदे इ. बद्दल वाचले असेल. )
मला उगाच वाटायचं, एवढे षंढ (बनवले गेलेले) लोक जर नुसता आंदोलनं करून मार खाऊन येत असतील त्यापेक्षा प्रत्येकी एक इंग्रज खपवला असता तर इंग्रज लै आधी पळून गेला असता ..
आपल्याला जे वाटतं ते नेहमी बरोबरच असतं असं नाही ..
15 Nov 2009 - 11:59 am | विसोबा खेचर
मोहनदास गांधींची नसती कवतिकं चालू द्या भोचकराव!
सह्ही बोल्लात पराशेठ! मिपावर गांधींवर कवतिकपर लेख येतात हे मिपाचं नसलं तरी मालक म्हणून माझं वैयक्तिक दुर्दैव! चालू द्या...!
सुवर्णातै,
आपण काय बोलतो आहोत, काय लिहितो आहोत याचं कृपया भान ठेवा. ज्या वाक्यात सशस्त्र क्रांन्तीच्या उग्र दैवताचं -शिवछत्रपतींचं नांव आहे त्या वाक्यात कुणाही सोम्यागोम्याचं नाव नका घेऊ हो प्लीज!
असो..
आता माझी दोन आयटम बायकांच्या खांद्यावर हात टाकून शेळीला दूध पाजायला जायची वेळ झाली आहे! :)
धन्यवाद..
तात्या.
16 Nov 2009 - 11:18 am | सुवर्णा
(कधी कधी भान हरपणारी) सुवर्णा