इलेक्शनी चारोळ्या

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
25 Nov 2024 - 8:55 am

(१)
समुंदर हूं मैं
लौटकर आऊंगा.
त्सुनामी आली
वाहून गेले त्यांचे
स्वप्नांचे मनोरे.

(२)
चित भी मेरी
पट भी मेरी
सरडे माझे
सारे जिंकले.

(३)
शेअर बाजाराचा फंडा
त्याला कळलाच नाही.
शॉर्ट टर्म गेन साठी
लाँग टर्म तोटा केला.

कैच्याकैकविताचारोळ्या

माझे काय चुकले? २.०

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
24 Nov 2024 - 12:22 am

• घरी सत्यनारायण पूजेच्या प्रसादाला आलेल्या शेजारच्या काकूंना मी सांगितले, “सत्यपीर ही बंगालातील मुसलमानांची पूजा आपण कॉपी केली आहे.” घरचे भडकले आणि पूजा संपेपर्यंत मला घराबाहेर काढले. सांगा, माझे काय चुकले?

हे ठिकाणप्रकटन

तुमचा एक्सिट पोल अंदाज सांगा

स्वरुपसुमित's picture
स्वरुपसुमित in राजकारण
21 Nov 2024 - 12:37 am

माझा अंदाज

महायुती अस्पष्ट बहुमत

मुंबई पुरते ठाकरे सेने ला यश मिळेल ( ११ पैकी ६-७ जागा शिंदे सेने विरुद्ध )
राज्यात ५१ लढती पैकी २०-२५
अजित पवार ह्यांची दाणादाण होणार व परत जाणार

दोन्ही राष्ट्रवादी एक होणार व कोणत्या तरी दुसऱ्या पार्टी ला बाहेरून सपोर्ट देणार

तुमचा अंदाज सांगा

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in जनातलं, मनातलं
17 Nov 2024 - 5:46 pm

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो.

फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

हे ठिकाणवावरसंस्कृतीकथामुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीभूगोलअर्थकारणमौजमजाप्रकटनविचारअनुभव

लाडका नातू..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
13 Nov 2024 - 12:37 pm

मी आज तुम्हाला माझ्या आईने मला माझ्या लहानपणी सांगितलेली एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे मला ती अचानक आठवली. ती का आठवली यावर अजून माझा विचार आणि मौन चालू आहे.

ही कथा म्हणजे काहीशी प्रचलित बोधकथाच आहे. त्यामुळे नवीन कथा म्हणून त्यात किती मूल्य आहे कोण जाणे. पण "मूल्य" या गोष्टीबद्दल मात्र ही कथा नक्की बोलते.

कथामुक्तकप्रकटनविचार

महाराष्ट्र माझा

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
13 Nov 2024 - 10:00 am

महाराष्ट्र माझा..'
आहाहा!ज्या दिवसांची या महान राकट कणखर महाराष्ट्र देशातील कमीजास्त अंदाजे नवू कोटी जनता (सगळे लाडके लहान थोर धरुन) आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस आता उजाडला च नाही तर चक्क भरदुपार झाली आहे.आता भर दुपार म्हणलं की चटके बसणारच! आणखीही बसतील,पण फिकीर कुणाला अन् कशाला?आता एवढे सगळे छान छान होत आहे,होणार आहे तर अशा किरकोळ गोष्टींकडे लक्ष या राकट कणखर महाराष्ट्रातील न.को.ज.(स.ला.ल.थो.ध.)कशाला देईल?

विनोदलेख

इकडचं-तिकडचं

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
12 Nov 2024 - 11:43 am

इकडचं-तिकडचं

भारतात गोरक्षण हा सध्या कळीचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताच माझ्या आवडत्या DW-TV
वर एक बातमी येऊन थडकली आहे.

डेन्मार्क या छोट्या देशातील शेतकर्‍यानी गाईंच्या ढेकरातून होणार्‍या मिथेन वायूच्या प्रदूषणासाठी कर देणे मान्य केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=_s0dBrXJXuo

भारतामध्ये ही कल्पना रूजेल का?

जीवनमानविचार