प्रसिद्ध झाले आहे!

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
14 Nov 2024 - 6:59 am

प्रसिद्ध झाले आहे! प्रसिद्ध झाले आहे! प्रसिद्ध झाले आहे!

https://www.amazon.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A...

प्राणायाम म्हणजे नक्की काय? त्याचे फायदे नेमके कोणते आणि ते कसे होतात, या प्रश्नांची विज्ञानसिद्ध उत्तरे आपल्याला न मिळाल्याने काहीजण एकतर त्याकडे पूर्ण कानाडोळा करतात किंवा फाजील प्रचारामुळे अतिप्रभावित होतात. प्राणायामाकडे संतुलित दृष्टिकोन ठेवून बघता यावे यासाठी आधुनिक संशोधनाचा परामर्ष या लेखनात घेतलेला आहे.

प्राणायामाबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. प्राणायामाने कर्करोग बरा होतो का? रक्तदाब कमी करण्यासाठी किंवा प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्राणायाम उपयोगी पडेल का? नैराश्य दूर होऊन जीवनविषयक दृष्टिकोन बदलण्यासाठी प्राणायाम मदत करेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे, प्राणायामाविषयी उत्सुकता असलेल्यांसाठी, या लेखनात आधुनिक संशोधनाच्या आधारे नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे.

टीप- या पुस्तिकेच्या विक्रीतून मिळणारे सर्व उत्पन्न लेखकद्वयांकडून आय० आय० टी० मुंबई या संस्थेला (भारत सरकारच्या ८० जी या नियमाला अनुसरून) देणगी दिले जाणार आहे.या पुस्तिकेच्या विक्रीतून मिळणारे सर्व उत्पन्न लेखकद्वयांकडून आय० आय० टी० मुंबई या संस्थेला (भारत सरकारच्या ८० जी या नियमाला अनुसरून) देणगी दिले जाणार आहे.

जीवनमानशिफारस

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2024 - 9:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन आणि शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

गवि's picture

14 Nov 2024 - 9:24 am | गवि

उत्तम. अभिनंदन.

जाता जाता..

पुस्तकाबद्दल थोडी माहिती, परिचय इथे लिहीला असता तर बरे झाले असते. अजूनही विचार करावा. नुसती अमेझॉन लिंक दिलेली दिसत आहे.

दहा पंधरा मिनिटे श्वास रोखून ठेवता येतो का मनुष्याला?

<दहा पंधरा मिनिटे श्वास रोखून ठेवता येतो का मनुष्याला?>

https://www.guinnessworldrecords.com/news/2021/5/freediver-holds-breath-...

चौथा कोनाडा's picture

16 Nov 2024 - 8:36 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद. उत्तम उपक्रम.
शुभेच्छा

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Nov 2024 - 9:43 pm | अमरेंद्र बाहुबली

शुभेच्छा.

युयुत्सु's picture

18 Nov 2024 - 9:03 am | युयुत्सु

धन्यवाद!

सोत्रि's picture

18 Nov 2024 - 10:38 am | सोत्रि

किंडल व्हर्जन उपलब्ध आहे, डाउनलोड करायाला ठेवले आहे. वाचून झल्यावर अभिप्राय कळवतो किंवा काही शंका असल्यास त्याही कळवतो.

- (इ-रीडरींगला सरावलेला) सोकाजी

युयुत्सु's picture

18 Nov 2024 - 10:39 am | युयुत्सु

अवश्य!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2024 - 12:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्लॉक केले असते तर, कोणताच प्रतिसाद लेखन प्रतिसाद करता येत नाही, मिपावर अधुन मधून असे तांत्रिक एरर वगैरे येत असतात. पुन्हा प्रयत्न करुन बघा.

-दिलीप बिरुटे

युयुत्सु's picture

18 Nov 2024 - 3:40 pm | युयुत्सु

ओके. धन्यवाद

प्रशांत's picture

18 Nov 2024 - 12:31 pm | प्रशांत

नवीन लेख टाकण्यापासून ब्लॉक केले आहे

,
नाहि.
लॉगिन करता येते /प्रतिसाद देता येतात म्हणजेच ब्लॉक केलेले नाहि.
emoji काढुन लेख प्रकाशित करायचा प्रयत्न करा.

इमोजी आणि टोकेरी कंस पण काढून मग प्रकाशित करा. टोकेरी कंस HTML टॅग समजले जाऊ शकतात.

युयुत्सु's picture

18 Nov 2024 - 3:43 pm | युयुत्सु

धन्यवाद

प्राणायाम म्हणजे अल्पकाळ केलेले जाणीवपूर्ण संथ श्वसन!

ही व्याख्या परिपूर्ण वाटून प्रचंड आवडली आहे.

पुस्तक त्यातल्या न रूळलेल्या मराठी शब्दांमुळे जरा क्लिष्ट झाले आहे असं मला वाटलं.

एकंदरीत स्तुत्य उपक्रम आहे!

- (प्राणायामी) सोकाजी

पुस्तक त्यातल्या न रूळलेल्या मराठी शब्दांमुळे जरा क्लिष्ट झाले आहे असं मला वाटलं.

पुस्तक लिहीताना शास्त्रीय संकल्पनांसाठी योग्य परिभाषेचे आह्वान खूप मोठे होते. फिजिओलॉजीवरील आयुर्वेदाची मराठी पुस्तके जर बघितलीत तर तुम्हाला या भाषेला मराठी का म्हणायचे असा प्रश्न पडेल.

तरीही आम्ही इंग्रजीत सारांश दिला आहे, त्याचा लाभ घ्यावा. शंका असतील तर अवश्य विचाराव्यात...