अबाबा!!!:
नवर्यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !
यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल(च्च!) तर(च्च!) क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे...(एतदर्थ:- स्पष्ट व्हावे.)
स्वयंपाक चौथर्यावर नवर्यांना जाण्याची गरज नेमकी का भासली ?
त्याज्ज्य्य नवर्याने यावर काय भुमीका घ्यावी ?
आपल्याला याबद्दल काय वाटते ?
मला असे वाटते की - मी जर गृहस्थ असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर गृहस्थ नसलो तर घरच्याच काय तर कुठल्याच स्वयंपाकचौथर्यावर जाण्याचे कारणंच काय ?????????????????????????????
(असतील तर..) सुज्ञ नवर्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....
====================================================
स्वयंपाकघरात मदतीसाठी घुसणार्या..परंतू ("तुम्हाला या विषयातले काय कळते???" "व्हा तिकडे!!! ..चा प्या आनी गप पडा!" .. "मेलं मटार नै सोलता येत ..आणे चाल्ले पावभाजी करायला!" )
इत्यादी (दुत्त दुत्त !)बायकूचे तेव्हढेच दू दू दू बोल ऐकून वतागलेला :- ताजा नवरा:- आत्मू स्वयंबंद!
प्रतिक्रिया
1 Feb 2016 - 6:46 am | कंजूस
नवरोबा आत येऊन सारख्या सूचना करतात स्वच्छतेच्या त्यामुळे ती आत असताना प्रवेश नाकारला जातो.तोंड फक्त चव घेऊन फक्त तिचीच आणि तिच्या पदार्थांची स्तुती करण्यासाठी उघडायचे असते.
१) पाकातल्या पुय्रा/अळूवडी/-/-/-वग्रै आई फार छान करायची असलं काही चुकूनही बोलू नका.
२) तुम्हाला अजून बरंच काही शिकायचं आहे.
३) तुमचे लग्नाअगोदरचे /पाक कौशल्याचे गोडवे गाऊ नका -कसंतरी उरकायचो हेच म्हणायचं.
४)तुमच्या चुकीच्या वागण्याने( जे तुम्हाला आतापर्यंत बरोबर वाटत होतं) प्रवेश नाकारला जात असावा.
2 Feb 2016 - 10:11 am | अत्रुप्त आत्मा
@४)तुमच्या चुकीच्या वागण्याने ( जे तुम्हाला आतापर्यंत बरोबर वाटत होतं) >> अत्यन्त बरुब्बर!
1 Feb 2016 - 7:29 am | अत्रुप्त आत्मा
ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे सर..
आपण आलात पण ते तुमच्या वरचे सर नै आले. :-/ ते कंदी येनार??? :-/ दुत्त दुत्त!
1 Feb 2016 - 9:27 am | प्रचेतस
कोण हो ते?
1 Feb 2016 - 7:36 am | श्रीरंग_जोशी
रोचक विडंबन अन एकाहून एक प्रतिसाद.
आता मूळ प्रेरणा वाचणे आले.
1 Feb 2016 - 9:49 am | पगला गजोधर
स्वयंपाक चौथर्यावर, पाव-भाजीची भाजी रांधणारे, एक लोकप्रिय ''क्ष'' गुर्जी…….
1 Feb 2016 - 12:05 pm | पैसा
परवाचं आंतरजालावर कोणीतरी रिकामटेकड्यानेचं मांडलेला हा विचार.
स्वयंपाक चौथर्यावर पुरुषांना प्रवेश देउन अन्नपूर्णा कोपली नाही तरं "पाक"स्थानाचा महिमा कमी होणार. आणि कोपली तर अजुन दुसरं नुकसान एवढं साधं गणित आहे ते.
-Johnny Depp-
1 Feb 2016 - 12:42 pm | संदीप डांगे
अगदी अचूक... हॅट्स ऑफ!
1 Feb 2016 - 2:34 pm | पैसा
तुला कळलंय ना? जास्त फोड करून सांगू नको! =))
1 Feb 2016 - 6:03 pm | संदीप डांगे
;-) अळीमिळी गुपचिळी. पायावर कोण धोंडा पाडून घेणार?
1 Feb 2016 - 2:16 pm | सूड
महिलाही चौथा-यावर जाऊन सैंपाक करत नैत आता. लांबूनच हाटेलाचा फोन फिरवतात आणि दुरुनच खाऊन घ्यावं लागतं. मी खुप वर्षापूर्वी ट्रिप घेऊन गेलो होतो तेव्हा सर्रास चौथा-यावर जाऊन सैंपाकघरात जाता येत होतं. एकदा महिलांना चौथा-यावर जाऊ द्या मग पुर्षान्ला घेऊन जाऊ. (वाक्यात घोळ होतोय काहीतरी) सैंपाकाघरातल्या अन्पुर्णेचा त्रास पुर्षान्ला जास्त होतो विशेषत: असो, असे म्हणतात. माझा काही अन्पुर्णेवर विश्वास नाही. पण मी रिस्क घेत नै. ;)
संजीव कपूर आणि विष्णू मनोहर यांनी सैंपाकघराच्या या चौथर्याचं महत्व वाढवलं. नसता तिथे अजिबात गर्दी नसायची.
-(खवट चिरोटे)
1 Feb 2016 - 2:41 pm | पैसा
चिरोटे सर, आन्पुर्णेचा त्रास पुर्शांना जादा होतो ही फार फार फार चुकीची इन्फो आहे...
कुठल्याच रेशिपी बुकात असा रेफरन्स मला तर मिळाला नाहिये...
आन्पुर्णा फक्त व्यक्तीने केलेल्या हावरटपणाबद्दल त्याला इक्व्हीव्हॅलंट पीडा करून ते कर्म नलीफाय करतात...
आन्पुर्णा कुणालाच मुद्दामहून त्रास देत नाहीत. त्यांचा हेतु फक्त आपला वाईट्ट फसलेला सैपाक 'बाकी शून्य' करणे हाच्च असतो आणि जेव्हां तसं होतं तेव्हा त्यांच्यासारख्या देणार्या त्याच...
अगदी छप्पर फाडके देतात...
- जेवाय हाणा हितं -
1 Feb 2016 - 4:03 pm | विजय पुरोहित
:)
विडंबनाचा पाऊस पडलाय या धाग्यात!
1 Feb 2016 - 4:33 pm | सूड
ओह आय सी!!
-ह्वा
1 Feb 2016 - 5:11 pm | अन्नू
हमें तो मार दिया इन 'विडंब' वालों ने..
1 Feb 2016 - 3:51 pm | बॅटमॅन
रच्याकने: "पाकिस्तानास जाऊन आलो/ले" हा उल्लेख इथे बहुतेकांस परिचित असेलच. त्यातल्या त्या चिरपरिचित अर्थामुळे कुणा एका हिंदी साहित्यिकाची "कितने पाकिस्तान" नामक कथा सार्वजनिक स्वच्छतेशी संबंधित आहे असा आमचा समज झाला होता.
1 Feb 2016 - 5:55 pm | उगा काहितरीच
सेंचुरी बद्दल अभिनंदन ...
1 Feb 2016 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा
एका सहज विडंबनात, प्रतिसादंही विडंबले
दिले होते श्रीखंड,त्याचे केले यांनी पिठले. || धृ ||
सहज ताज्या अणु'भवांना,मी थोडे दही घातले
पण काही (ह्ही ह्ही!) दुत्त अणाहितांनी त्याला बेसन लावले
आता करू मी नक्की काय? कोणते धरू पातेले?
दिले होते श्रीखंड,त्याचे केले यांनी पिठले.||1||
णवा णवा चक्का त्यात थोडी साखर "मी" घातली
मूळ पेरणेची इलायची गमतीत मधे घोटली!
गोड त्यातले डावलून यांनी पीठ बदलले
दिले होते श्रीखंड,त्याचे केले यांनी पिठले.||2||
....
To be continued... Llllllluuuu
1 Feb 2016 - 6:20 pm | उगा काहितरीच
स्मायली बघून आनंद झाला ! :-)
1 Feb 2016 - 6:21 pm | उगा काहितरीच
अरेच्या ! मस्त स्मायलीवाल्या बाबांपुरतीच मर्यादित आहेत काय ?
1 Feb 2016 - 6:25 pm | अन्नू
घ्या आमच्याकडून ही जीलेबी!
1 Feb 2016 - 6:37 pm | सूड
कसं जमतं हो तुम्हाला?
-अचेतस टल्ली
1 Feb 2016 - 6:49 pm | प्रचेतस
टाकला होता डोसा, आमलेट कस्सं बाहेर आलं ह्या सुप्रसिद्ध काव्यपंक्ती असलेल्या एका गाजलेल्या कवितेची अठवण आली.
1 Feb 2016 - 10:17 pm | अत्रुप्त आत्मा
नीच आगोबा!
1 Feb 2016 - 6:35 pm | जेपी
गुरुजी अता बॅचलर मुलांस्नी घाबरावयाचे काम करतात..
बाकी विडंबन ग्रेट आहे
2 Feb 2016 - 8:43 am | नाखु
त्यांच्या आगामी कवीता संग्रहाचं नावच आहे "सावध एक पुढच्या हाका अर्थात पुढच्यास ठेच मागचा शहाणा"
आगावू (अग्रीम या अर्थाने) नोंदणी चालू आहे स्वागत मुल्य १५१ रुपये. सवलतीत १०१ रुपये + बुवांसोबत सेल्फी
आधीक तपशील चिमणकडे आहे.
आपालप्ल्या भागातील संपर्क केंद्रे :
प्रचेतस (पिंची साठी)
टक्या (ठाणे- डोंबवली वगळून)
अभ्या (सोलापुर)
प्रा.डॉ. (औरंगाबाद)
मुवि ( डोंबवली+अंबरनाथ ठाणेवगळून)
अन्या दातार (कोल्हापुर व रत्नागिरी)
कॅप्टन जॅक (झुमरीतलय्या आणि भाटा पारा)
बॅट्टमण :मिरज सांगली.
जेपी : लातुर सह उस्मानाबाद
नाखु चि(क्)टवणीस
प्रसीद्धी प्रमुख
अखिल मिपा भावविश्व चाहता संघ आणि समग्र बुवा काव्य प्रतिभा प्रकाशन समीती
2 Feb 2016 - 8:49 am | प्रचेतस
गावडे सर (अखिल सिंहगड रोड) यांचे नाव नसलेने निषेध.
2 Feb 2016 - 8:54 am | नाखु
प्रकाशक असेलेने शेपरेट नाव नाही लिहिले.
खुलासादार नाखु
2 Feb 2016 - 8:55 am | सतिश गावडे
आता खुद्द कवीच शिव्वगड रस्त्यावर राहत असतील तर ते दुसर्या कुणाला फ्रेण्ची अशी का ब्रे देतील?
2 Feb 2016 - 8:57 am | प्रचेतस
फ्रेण्ची शब्द काळजाला भिडला. व्हिआयपी अठवून ड्वाळे पाणावले.
बाकी त्यांची वडगाव बुद्रुकची स्वतंत्र अस्मिता आहे म्हणे.
2 Feb 2016 - 10:13 am | अत्रुप्त आत्मा
@
>>
2 Feb 2016 - 2:05 pm | अभ्या..
ज्या असाइनमेंटस आमच्याकडे छपाईला येतात त्याच आम्ही विकतो. दुसर्याची फ्रॅन्चायसी घेत नाही.
2 Feb 2016 - 2:41 pm | नाखु
गावडे सर असले तरी मुद्रक आणि आतील (अतरंगी) बहुरंगी चित्रे तुझीच असतील याची खात्री बाळगणे.
धाग्यावरचा दुसरा खुलासा.