रात्री सवास - थायलंड सफर (अंतिम)

ॐकार's picture
ॐकार in जनातलं, मनातलं
21 Jun 2008 - 3:14 pm

सायं सवास पासून पुढे...
थायलंडमध्ये खाओ याई नॅशनल पार्कला गेलो होतो. पावसाळ्यात खरं तर इथे भेट द्यायला हवी पण इतर वेळेसही भेट द्यायला हरकत नाही. इथे रहायचीही व्यवस्था आहे. तंबूंपासून अगदी हवेशीर बंगल्यांची सोय आहे, पण महिन-दोन महिने आधीच नोंदणी करावी लागते. बुकींग फुल्ल असल्याने माझा कार्यक्रम एका दिवसात आटोपता घ्यायला लागला. त्यामुळे नाईट सफारीचा आनंद घेता आला नाही. धबधबे, जंगलवाटा, अगदी रस्त्यांवर फिरणारी हरणंही हमखास भेटतात इथे.
काही चित्रे:

या राष्ट्रीय उद्यानानजीकच जमिनीखाली तयार झालेले एक निसर्गनिर्मित बुद्धाचे देऊळ आहे. चुनखडकावर काही प्रक्रिया होऊन निसर्गतःच तयार झालेली अमूर्त शिल्पकृती इथे पहायला मिळतात-

काहीठिकाणी तर ह्या भिंती अर्धपारदर्शी आहेतः

याचसोबत खरेदीसाठी जतुजा ( थाई उच्चार : जाः तुक् जा:) मार्केटला चक्कर टाकावी. बँकॉकमधला जणू आठवडाबाजार! तब्बल २० हजारच्या आसपास दुकाने असणार्‍या या बाजारात बर्‍याच गोष्टी मिळतात. भाव करायला तुम्हाला थाई अंक, संख्या यांची थोडीफार ओळख असायला हवी. किंवा मग एखादा थाई मित्र अथवा मैत्रिण सोबत असेल तर चांगले.

समिंदरावर जायचे असेल तर चा-आम, फुकेत ला जावे. सोबत नाईट लाईफ अनुभवायची असल्यास पट्टाया! पर्यटकांच्या रेट्यामुळे हल्ली पट्टाया गजबजलेले असते तरी त्याचे आकर्षण परदेशातील लोकांनाच, थाई लोक मात्र त्यापेक्षा निवांत आणि चांगल्या समुद्रकिनारी जाणं पसंत करतात.

थायलंडमधील आणखी काही प्रकाशचित्रे त्यात सहभागी असणार्‍या थाई व्यक्तींची अनुमती नसल्याने देऊ शकलो नसलो तरी या सुस्वभावी लोकांनी केलेलं आदरातिथ्य मात्र कायम लक्षात राहील. भारताबाहेर आपली जमीन, आपलं आकाश आणि आपली माणसं वाटावीत अस थायलंडचं आश्वासक चित्र मनात आहे. जमल्यास थायलंडची सफर नक्की करून या.

या लेखांचा शेवट काही चित्रफितींनी करतो.

रटरटते चिकनः

लोटी तयार करणार्‍या थाई महिलेची हातोटी:

फ्लोटिंग मार्केटमध्ये मिळणारा गोड पदार्थ नावेत बसून बनवताना:

बँकॉकच्या रस्त्यावर नाचणारी पोरं टोरं:

निद्रिस्थ बुद्धराजः

रात्री सवास !(good night!)

वावरसंस्कृतीइतिहाससमाजजीवनमानतंत्रराहणीप्रवासभूगोलदेशांतरमौजमजाप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादमाध्यमवेधअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

पक्या's picture

21 Jun 2008 - 10:47 pm | पक्या

थायलंड ची सचित्र सफर आवडली. धन्यवाद.
राष्ट्रीय उद्यानाचे फोटोज मस्त. फक्त त्या उद्यानाबद्द्ल फोटोंबरोबर अजून माहिती दिली असती तर लेख छान झाला असता.

II राजे II's picture

22 Jun 2008 - 9:03 am | II राजे II (not verified)

१००% सहमत. !!

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

भडकमकर मास्तर's picture

22 Jun 2008 - 12:45 am | भडकमकर मास्तर

उद्यानाचे फोटो मस्त आहेत..
ते डू नॉट स्विम पाटीमध्ये लांब दिसणारा तूच आहेस काय?? :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

नंदन's picture

22 Jun 2008 - 1:37 am | नंदन

आत्ताच तिन्ही भाग वाचून काढले. चित्रे आणि वर्णन, दोन्ही सुरेख. पहिल्या भागांत म्हटल्याप्रमाणे थाई नावांत लपलेली मूळ संस्कृत नावे शोधायचा खेळ रंजक आहे. सोन्गक्रान (संक्रांत - बहुतेक नववर्ष ह्या अर्थाने) आणि सुपारोक (सुप्रहरिक - चांगल्या वेळी जन्मलेला), ही माझ्या दोन मित्रांची नावे अशीच :).

बाकी नावेतला गोड पदार्थ पातोळीची/करंजीची झटपट आवृत्ती वाटला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

22 Jun 2008 - 9:56 am | विसोबा खेचर

सगळी चित्रं आणि व्हिडियो मस्तच आहेत. झकास लेखमाला! :)

सहज's picture

22 Jun 2008 - 10:39 am | सहज

लेखमाला आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2008 - 10:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखमाला आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश's picture

22 Jun 2008 - 12:28 pm | स्वाती दिनेश

थाई सफरीचे ३ही भाग मस्त! फोटो तर सुंदरच आहेत.
स्वाती

ऋषिकेश's picture

22 Jun 2008 - 1:01 pm | ऋषिकेश

थाई सफरीचे ३ही भाग मस्त! फोटो तर सुंदरच आहेत.

+१

-('मिसळ'लेला) ऋषिकेश