अरून सवास! भाग १

ॐकार's picture
ॐकार in जनातलं, मनातलं
30 May 2008 - 12:12 pm

"अरून सवास!" - थाई भाषेतलं सकाळचं अभिवादन कानी पडलं आणि कुठेतरी शब्दांची जत्रा लागल्याची चाहूल लागली. थायलंडच्या एका महिन्याच्या वास्तव्यात थाई लोक, काही ठिकाणे, थाई खाणे-पिणे, थाई संस्कृती आणि थाई भाषा यांची थोडीशी ओळख झाली आणि भारताबाहेर पहिल्यांदा घरोब्याचा अनुभव आला. थायलंडला जायच्य आधीच काही नेहमीच्या वापरातील शब्दप्रयोग शिकलो होतो आणि भाषासाधर्म्याचे कुतूहल जागे झाले. थायलंडच्या विमानतळाचे नाव - सुवर्णभूमी ! पहिले पाऊल जिथे टाकणार त्या अनोळखी प्रदेशाचे नाव इतके ओळखीचे असेल असा अंदाजच नव्हता. थायलंडला उतरल्यावर मात्र कुतूहल आणि अंदाजाची जागा उत्साह आणि आनंदाने घेतली. थायलंड बद्दल माझे काही अनुभव इथे मांडावेत असे कधीपासून मनात होते , आज योग आला.
ग्रँड पॅलेस

थायलंडमधले पर्यटनासाठी विषेश प्रसिद्ध असलेले हे ठिकाण. बँकॉक - राजधानीपासून जवळ आहे. डोळ्यांसाठी वैभवाची मेजवानीच!

सुवर्णकळस

सोनेरी खांब

गरूड

शेषनाग

भिंतीवर चितारलेला रामायणातील एक प्रसंग

भालदार चोपदार (?)

अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या)
बँकॉकपासून गाडीने तासाभराच्या अंतरावर असलेले हे ऐतिहासिक स्थळ. हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते. इथे ठिकाणी बुद्धाचे अनेक सोनेरी कळसाचे स्तूप, प्रार्थना/निवास स्थळे होती. बर्मातील टोळ्यांनी जेव्हा थायलंडवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी इथले सगळे सोने लुटून नेले.




आज केवळ अवषेश उरले आहेत. तरी त्यांच्यावरून गतकाळातील वैभवाची कल्पना करता येते. त्यानंतर चक्री राजघराण्यातील राजा राम (प्रथम) याने राजधानी बँकॉकला हलवली.

जुने थाई लाकडी घर.


हे घर जमिनीपासून थोडे उंचावर बांधले जाते. यामुळे घरात हवा खेळती राहते. घराची रचना सर्वसाधारणपणे अशी - मध्ये मोकळी जागा, चार बाजूंनी स्वयंपाकघर, पाहुण्यांकरता खोल्या, अभ्यासिका, शयनकक्ष. प्रत्येक बाजूंना उतरती छपरे. मध्ये मोठे छप्पर.

थायलंडमध्ये जिथे जिथे फिरलो तिथे आदरातिथ्याने भारावून गेलो. प्रगतीशील अशा या देशात आधुनिकतेबरोबरच लोकांची आपुलकीही तग धरून आहे. सवात्दी खा /क्रब (खा - स्त्री म्हणते तेव्हा, क्रब - पुरूष म्हणतो तेव्हा) असे म्हणत थाई व्यक्ती तुमचं स्वागत करेल. कॉब खुन् खा/क्रब म्हणून तुम्ही धन्यवाद द्याल आणि ह्यापुढे तुम्हाला थाई येत नसेल तर मात्र पंचाईत! थाई भाषेतील पाली-संस्कृत मधून आलेले शब्द जरी ओळखीचे वाटले तरी आज वापरात असलेले थाई शब्द मात्र तितकेसे पटकन कळतीलच असे नाही. त्यासोबतच ख्मेर मधूनही थाई भाषेत शब्द आले आहेत. थायलंडमध्ये सगळ्यांना इंग्रजी येतेच असं नाही आणि येत असली तरी आपली इंग्रजी आणि थाई इंग्रजी यांतून कोण काय बोलतो ते समजणे आपल्याला आणि थाई माणसालाही कठीणच! थाई टोनल भाषा आहे त्यामुळे शब्दांच्या उच्चारांतील बारकावे शिकायला, समजून घ्यायला मेहनत घ्यावी लागते. पण बरेचदा थाई व्यक्ती स्मितहास्यानेच तुम्हाला अर्धेअधिक जिंकून घेतात.
काही ठिकाणांची नावे पहा -
समुत् संख्रोम (समुद्र संग्राम)
रचतापिसेक (रजताभिषेक)
कांचनबुरी (कांचनपूरी)
राचाबुरी (राजापूरी)
सुवर्नापिसेक (सुवर्णाभिषेक)
अयुत्थया (अयोद्ध्या)
काही साधारण नावे -
तलेय (तळे ) थाई भाषेतला सद्ध्याचा अर्थ डबके , गरूड, शेषनाग

असेच काही संदर्भ सण, कालगणना याबाबतही मिळतात -
मकबुचा - (मकपूर्निमाबुचा) - माघी पौर्णिमा (बुचा - पूजा )
विसाखाबुचा - वैशाखपूजा - वैशाख पौर्णिमा - बुद्धपौर्णिमा

भाषा, इतिहास आणि संस्कृतीचे काही धागेदोरे जुळतात. पण ह्या फंदात जास्त न पडता तुम्ही जर थायलंडमध्ये लोकांत मिसळलात तर तो आनंद काही निराळाच.

पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच...

वावरसंस्कृतीसमाजजीवनमानतंत्रराहणीप्रवासभूगोलदेशांतरनोकरीमौजमजाविचारप्रतिसादआस्वादमाध्यमवेधअनुभवमतमाहितीसंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

30 May 2008 - 12:47 pm | प्राजु

लेखहि खास आहे. थाई लोकां बद्दल बरिच माहिती सांगितली आहेत आपण.

छायाचित्रेही एकदम छान आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ईश्वरी's picture

30 May 2008 - 1:04 pm | ईश्वरी

वा , फारच छान फोटो आहेत सर्व . थायलंड ट्रिप ची आठवण जागी झाली . (मी ८-९ वर्षापूर्वी थायलंड ला गेले होते. )
बँकॉक मधील वातारूण (Wat Arun) टेम्पल , नदीतले फ्लोटींग मार्केट , पॅलेस, डाऊनटाऊन, हत्ती आणि मगरींचा थरारक शो ..सगळच सही .
पुढचे भाग लवकर टाका. वाचायला उत्सुक.
ईश्वरी

आनंदयात्री's picture

30 May 2008 - 12:57 pm | आनंदयात्री

सुंदर लेख ओंकार अन भरपुर सुरेख छायाचित्रांबद्दल धन्यवाद :)

>>अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या)

'ऍना अँड दी किंग ऑफ सयाम' या पुस्तकात अयोध्येचा असाच उल्लेख होता असे स्मरले.

अन्जलि's picture

30 May 2008 - 1:14 pm | अन्जलि

फोतो खुप छान आले आहेत मस्त वाटले जेथे सोनेरि रन्ग् दिस्तो आहे ते सोने आहे का? शेशनाग, सोनेरि खाम्ब इ.

ऋचा's picture

30 May 2008 - 1:37 pm | ऋचा

सुंदर लेख आणि फोटो.

:)

ध्रुव's picture

30 May 2008 - 1:59 pm | ध्रुव

थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत
--
ध्रुव

आजानुकर्ण's picture

30 May 2008 - 2:08 pm | आजानुकर्ण

वरील सर्वांशी सहमत आहे.

आपला,
(सहमत) आजानुकर्ण

बिपिन कार्यकर्ते's picture

30 May 2008 - 3:24 pm | बिपिन कार्यकर्ते

फोटो छान आहेत. थायलंड बद्दल कुतूहल आहेच. अजून पुढे लवकर लिहा. एक प्रश्न नेहमी पडतो, थाय संस्कृति वर भारताचा एवढा प्रभाव आहे, पण आज तिथे भारता बद्दल किंवा भारतीय संस्कृतिबद्दल एकंदरीत काय मत आहे? ते भारताला कोणत्या नजरेने बघतात? तुम्हाला असे काही माहित असेल तर जरूर लिहा.

बिपिन.

राजे's picture

30 May 2008 - 3:32 pm | राजे (not verified)

थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत

हेच म्हण्तो आहे !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मदनबाण's picture

31 May 2008 - 2:14 pm | मदनबाण

थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत
अगदी असेच म्हणतो.....

अजिंक्य's picture

30 May 2008 - 6:18 pm | अजिंक्य

आपल्याकडे "अरुणोदय" असं म्हणतात, त्याचप्रमाणे हे अरुन सवास आहे काय? (माझी आपली शंका!)
बाकी लेख मात्र अतिशय उत्तम. छायाचित्रे तर अप्रतिम!
असेच लेख अजूनही लिहावेत. चालू दे!

शितल's picture

30 May 2008 - 6:30 pm | शितल

फोटो पाहुन एकदम छान वाटले तो देश पाहण्याची इच्छा निमार्ण झाली.
आणि भारतीय स॑स्कृतीशी जवळीक असल्याचे वर्णन ही छान केले आहे.

यशोधरा's picture

30 May 2008 - 8:18 pm | यशोधरा

अतिशय सुंदर फोटो आणि छान माहिती. आवडले, लिहा पुढे अजून.

मन's picture

30 May 2008 - 10:36 pm | मन

सुरेख वर्णन.
सुरुवात तर झकास झालिये.
आता पुढले ही भाग द्या टाकुन पटापट.

आपलाच,
मनोबा

बेसनलाडू's picture

30 May 2008 - 10:50 pm | बेसनलाडू

(प्रेक्षक)बेसनलाडू

पक्या's picture

30 May 2008 - 11:49 pm | पक्या

एकसे एक प्रकाशचित्रे. थायलंड च्या सफरीची सुरवात झकास झाली आहे . येऊ द्यात अजून.
-- पक्या

प्रियाली's picture

31 May 2008 - 12:54 am | प्रियाली

थायलंडची प्रकाशचित्रे सुरेखच आहेत.

रामायणातील प्रसंग बहुधा कुंभकर्णाचा असावा का काय असे वाटून गेले.

हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते.

अयुथ्थ्याबद्दल हा उल्लेख कुठे सापडला? कारण अयुथ्थ्याचे राजे हिंदू/बौद्ध असले तरी ख्मेर नसावेत आणि अयुथ्थ्याचा उदय ख्मेर घराण्याच्या पडत्या काळात झाला, शहरही तेव्हाच वसवले असावे असे वाटते. अयुथ्थ्याच्या एका राजाने सुमारे १४व्या शतकात (चू. भू. दे. घे.) ख्मेर घराणे खिळखिळे झाल्यावर त्यावर स्वारी केली होती असे वाटते.

ॐकार's picture

3 Jun 2008 - 12:10 am | ॐकार

ख्मेर राजवटीत वसवल्याचा उल्लेख चुकला. ख्मेर राजवटीच्या अस्तकाळात वसवले गेले असे वाक्य असावयास हवे होते. ख्मेर शिल्पकलेच्या प्रभावाबद्दल लिहायचे होते. ते राहून गेले. संदर्भ - http://www.tourismthailand.org/destination-guide/phranakhonsiayutthaya-1...

प्रियाली's picture

3 Jun 2008 - 12:25 am | प्रियाली

खुलाशाबद्दल आणि दुव्याबद्दल धन्यवाद.

चित्रा's picture

31 May 2008 - 5:56 am | चित्रा

सर्वच छायाचित्रे आवडली आणि वर्णनावरून देश बघण्याची इच्छा झालेली आहे.

सोनेरी रंग थायलंडमध्ये कुठच्यातरी एका काळात प्रिय झालेला दिसतो आहे. दुसरीकडे अयुथ्थ्यास मात्र इमारतींची नैसर्गिक रंगसंगती दिसते आहे.

मस्त चित्रे.

प्रियाली's picture

31 May 2008 - 6:36 am | प्रियाली

पुराणे, जातककथा इ. मध्ये वर्णन केलेली सुवर्णभूमी ही थायलंड आहे असे मानले गेल्याने बहुधा येथे सोनेरी रंग प्रिय होता आणि असावा.

विसोबा खेचर's picture

31 May 2008 - 8:31 am | विसोबा खेचर

ओंकारा,

सर्व फोटू व वर्णन क्लासच आहे!

मला जुन्या थाई लाकडी घराचा फोटू सर्वाधिक आवडला! :)

पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच...

अरे वाट पाहतो आहे रे! तुझ्या हा लेख म्हणजे मेजवानीच आहे. आम्हाला घरबसल्या थायलंडची चित्रदर्शी सफर घडली. आता थाई खादाडीचं सचित्र वर्णन येऊ द्यात!

तात्या.

स्वाती दिनेश's picture

3 Jun 2008 - 1:11 pm | स्वाती दिनेश

चित्रे आणि वर्णन झक्कास!
पुढच्या भागाची वाट पाहत आहे.
स्वाती