मागील भाग -
भाग - ११
भग - १०
भाग - ९
भाग - ८
भाग - ७
भाग - ६
भाग - ५
भाग - ४
भाग - ३
भाग - २
भाग - १
मागून पुढे चालू................
भाग १२ – शेवटचा !
रिहाला हे खरंतर एक हाज यात्रेचे वर्णन आहे. आपण मागे बघितलेच आहे की मदीना आणि मक्केचे वर्णन हे रिहालामधे इब्न जुब्यारच्या रिहालातून उचललेले आहे. या प्रकाराचे चौर्यकर्म त्या काळातील संस्कृतीत बसणारे नव्हते. पण ते तसे झाले होते हे इब्न बतूतला माहिती होते का नाही हे समजायला अवघड आहे. पण इब्न जुझ्झीने ते त्यात घातले असण्याची शक्यता जास्त वाटते कारण तो एक दरबारचा कवी होता आणि त्याला ते पुस्तक सुलतानासाठी लिहायचे होते आणि त्यात काय काय लिहायचे हे त्याला चांगलेच माहीत होते. आणि हे पुस्तक दुसरे कोणी वाचेल असे त्याला अजिबात वाटले असण्याची शक्यता नाही. थोडक्यात काय सुलतानाला या लिखाणाने माहिती मिळाली पाहिजे आणि तो खूषपण व्हायला पाहिजे या पध्दतीने हे लिखाण व्हायला पाहिजे याची पूर्ण जाणीव इब्न जुझ्झीला होती आणि त्याने त्याच प्रकारचे वर्णन लिहिले असणार.
हे सगळे लक्षात घेतले तरी दुर्दैव म्हणजे, इब्न बतूतला त्याच्या मृत्यूनंतरच जगात मान्यता मिळाली. मोरोक्कोमधील तथकथित विद्वानांना त्याच्या वर्णनांवर विश्र्वास ठेवणे शक्य झाले नाही. काहींनी तर त्याला ढोंगी आणि फायद्यासाठी काहीही लिहिणारा म्हणून त्याची हेटाळणी केली. त्यावेळचा राज्यशास्त्राचा थोर अभ्यासक इब्न खाल्दूनने तर त्याच्या विरुध्द फारच टीका केली. ग्रानाडाच्या अबू अल् बरकत अल् बलाफ्कीने तर त्याला अव्वल खोटारडा म्हटले.
१५व्या शतकात मात्र मुहम्मद इब्न मर्झुकने म्हटले आहे “मला तरी एवढे देश विदेश पाहिलेला माणूस माहीत नाही.” त्यानंतर रिहालाबद्दल फारच कमी ऐकू आले. पण माघरिबमधे त्याच्या बर्याच नकललेल्या प्रती वाचल्या जात होत्या. पण त्याला खरी प्रसिध्दी मिळाली ती सर हॅमिल्टन गिब यांनी त्याचे भाषांतर युरोपमधे प्रसिध्द केले तेव्हा ते १९५८ साल होते. इब्न बतूत १३६९ साली वयाच्या ६५ व्या वर्षी हे जग सोडून गेला. त्याचा मृत्यू रिहाला लिहिल्यानंतर ११/१२ वर्षाने झाला. इब्न जुझ्झी जेव्हा रिहाला पूर्ण झाले, त्याच वर्षी निवर्तला. इब्न बतूतच्या बाकी आयुष्याबद्दल आज जगाला काहीच माहीत नाही. त्याचे मोरोक्कोमधे कोणी वारसदार असल्याची नोंद नाही. रिहालाचे काम इतके मोठे आहे की प्रत्येकाला त्यात त्याच्या आवडीचा विषय सापडणारच ! उदा. त्याने वर्णन केलेल्या अनेक स्थनिक बाजारांची वर्णने ! त्या वर्णनांमधे काय नाही आहे ? रिहाला आपल्याला बॅकिंगपासून आत्ताच्या अनेक व्यवस्थांच्या मुळाशी घेऊन जाते.
काहीही असले तरी जगाला इब्न बतूतने “रिहाला” ही फारच सुंदर भेट दिली आहे, असेच म्हणावे लागेल !
मित्रहो, आपल्या मित्राचा या जगातला प्रवास आणि या पृथ्वीवरचा मुक्काम हा असा संपला आणि आपली त्याच्या बरोबरची ही सफरही !
ज्या वाचकांनी हे वाचले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि हो सगळ्या लेखांच्या लिंक्स टाकलेल्या आहेत. :-)
जयंत कुलकर्णी
लेखमाला समाप्त.
प्रतिक्रिया
20 Oct 2010 - 2:01 pm | यशोधरा
सगळ्या लिंक्स दिल्याबद्दल धन्यवाद, आता एकदा सगळे एकत्र वाचून काढता येईल.
20 Oct 2010 - 2:01 pm | रन्गराव
खर तर, मराठीत ही लेखमाला अजून प्रकाशित झाली नसेल तर ह्याचा एक पुस्तक बनवायला हव. मुलांसाठी उपयोगी आणि मोठ्यांसाठी मनोरंजक होईल ते :)
20 Oct 2010 - 2:29 pm | सुनील
संपूर्ण लेखमाला आवडली.
4 Jan 2018 - 10:48 pm | मंदार कात्रे
खूप छान . धन्यवाद
5 Jan 2018 - 8:16 am | प्राची अश्विनी
बरं झालं ही लेखमाला पुन्हा वर आली.
5 Jan 2018 - 12:18 pm | विनिता००२
फारच सुरेख लेखमाला!!
10 Jan 2018 - 9:44 pm | पैसा
खूप छान मालिका होती ही.
11 Oct 2023 - 4:11 pm | diggi12
फारच सुरेख लेखमाला
11 Oct 2023 - 4:30 pm | अमरेंद्र बाहुबली
मस्त.