राम प्रहरीची भटकंती - स्वैर चिंतन २
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे.
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे.
हे एक स्वानंदासाठी केलेले स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे.
हल्ली (गेल्या काही महिन्यांपासून) ब्रह्म मुहुर्तावर उठणे होते. खरे सांगायचे तर जाग तशीही येत होती पण झोप पूर्ण होत नव्हती तर होणार्या झोप मोडीशी झगडा करण्यापेक्षा संध्याकाळचे जेवण आणि रात्री झोपण्याचीच वेळ बरीच अलिकडे घेतली. ज्या दिवशी लवकर झोप येणार नाही त्या दिवशी मेडीटेशन केले आणि झोपीचा पॅटर्न यशस्वीपणे बदलला. झोपही पूर्ण होऊ लागली आणि ब्रह्ममुहुर्तावर शुचिर्भूत होऊन शारिरीक कसरतींना आणि नाचण्यालाही (शारिरीक कसरतीचे नाचणे) वेळ मिळू लागला आहे.
हे ताडपत्रीवाल्या,
गतसाली न खपलेल्या मालावरची धूळ झटक
हे पाणीपुरवठा खात्यातल्या टेंडर बाबू,
फिल्टर सफाईच्या निविदांच्या नैवेद्यांची ताटे सजव
हे वृक्षसंवर्धन खात्यातील खात्यापित्या लोकसेवका,
ट्री ट्रिमिंग च्या निमित्ताने कोणते वृक्ष भुईसपाट करायचे ते बिल्डरांबरोबर ठरव
हे नगर सेवका,
नालेसफाईच्या हातसफाईवरच्या श्वेतपत्रिकेचा कच्चा खर्डा बनवायला घे
हे पालक मंत्र्या,
महापुरोत्तर अन् भूस्खलनोत्तर सहसंवेदनांचे वार्षिक भावविभोर सांत्वनसंदेश बनवायला घे
ग्रोकबद्दलची किरकिर आणि तरूणांमधील कॅन्सर
=========================
भारतीय समाजात अजुनही ए०आय० बद्दल जी किरकिर चालू आहे, त्यामुळे मी खूप व्यथित झालो आहे. त्यात "ग्रोक" या ए०आय० वर बरेच जण चिखलफेक करत असल्याने मला ग्रोक बद्दल उत्सूकता निर्माण झाली आणि तथ्य शोधायला सुरुवात केली.
बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा
====================
मंडळी,
नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
या खेपेला युयुत्सुनेट चुकलं की बरोबर ठरलं हे ठरवणं मला अवघड जातंय. कारण मला ज्या पातळीपासून बाजार उलट फिरेल असं वाटत होते, ती पातळी झुगारून २३८६९ ला जाऊन उलट फिरलं (हा उलट फिरण्याचा भाग खरा ठरला कारण युयुत्सुनेटला तेव्हढेच म्ह० पुढची दिशा ओळखायला शिकवले आहे). पण रेंजच्या बाबतीत हुलकावणी दिली. आठवडा अखेरीस बंद होताना आठवड्याच्या ओपन जवळच बाजार बंद झाला आहे.
बाजाराचा कल: २४ मार्चचा आठवडा
====================
मंडळी,
युयुत्सुनेटच्या भाकीतानुसार मार्केटने दमदार रिकव्हरी केली आहे. आता पुढे काय?
मार्केट सध्या प्रतिरोध क्षेत्राजवळ असल्याने तेथपर्यंत (२३५५०) जायचा प्रयत्न करेल असा १ अंदाज आहे. पण दुसरा अंदाज आहे युयुत्सुनेटचा - आहे त्या पातळीपासून थोडे मागे फिरेल (महिना अखेर असल्याने) आणि परत २३५५० पर्यंत वर जाईल.
निघा निघा चिऊताई
सारीकडे काँक्रीटले
दाणा पाणी हरवले
शहरी ह्या
विषारी धुरके आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावर झोप कशी
अजूनही
उरलेली पाखरे ही
भयसूचनांचे गाणे
गाऊनी टिपती दाणे
अखेरचे
झोपू नका अशा तुम्ही
वाचविण्या मृत्युक्षणी
येईल का मग कोणी
बाळाला ह्या
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
बाळासकट ती जाई
कायमची!
बाजाराचा कल :१७ मार्चचा आठवडा
====================
मंडळी,
मी स्वत:ला चिमटे काढून कंटाळलो!
मागील पोस्टमध्ये केलेले "युयुत्सुनेट मात्र पुढच्या आठवड्यात नकारात्मक अनिश्चितता दाखवते आहे." हे भाकीत परत एकदा खरे ठरले आहे! हे कसे ते समजाऊन घ्यायचे असेल तर निफ्टीचा साप्ताहिक कालचौकटीवरील आलेख पाहणे योग्य ठरेल.
मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते. माझा मुलगा, सून, नातू हेही त्यांना ताई किंवा बाई, काकू, मावशी अशी त्यांच्या वयाकडे बघून हाक मारतात. त्यांना अहो जाहो करतात.
साधारण पस्तीस वर्षे झाली असतील या गोष्टीला
विजा लग्न ठरल्याची बातमी घेऊन आला. आमच्या मित्रपरिवारामध्ये सर्वात लहान. गेल्या पाचेक वर्षात एकेक करून जवळपास सगळ्यांची लग्न होऊन गेली होती. नेहमी प्रमाणे सर्वांनी मुलगी कोण कुठली काय करते अशी सरबत्ती केली. वर पार्टीची मागणी होतीच.