कामधेनु : गोमय वसते लक्ष्मी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
17 May 2025 - 8:00 am

गाय ही कामधेनु आहे. गायीची उत्तम रीतीने सेवा केली तर गाय आपल्या सेवकाला अन्न, वस्त्र, निवारा प्रदान करते. आपल्या धार्मिक ग्रंथात गायीच्या शरीरात 33 कोटी देवता राहतात असे म्हंटले आहे. कथा आहे, जेंव्हा लक्ष्मी मातेने गायींना विचारले, मी तुमच्या शरीरात कुठे निवास करू, तेंव्हा गायी म्हणल्या माता लक्ष्मी तुम्ही आमच्या पवित्र गोमय अर्थात गायीच्या शेणात आणि गोमूत्रात निवास करा. आपल्या देशात गौ आधारित अर्थव्यवस्था होती. आपल्या संस्कृतीत गौ दान करण्याची परंपरा होती. ऑपरेशन फ्लड काळात लाखो शेतकर्यांना सरकारने गायी प्रदान केल्या. सरकारचा मुख्य उद्देश्य देशात गायीच्या दूधाचे उत्पादन वाढविणे आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे होता. आज ही अनेक राज्यांत गाय पाळण्यासाठी सरकार अनुदान देते. गौ सेवा केल्याने शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारले. दूध आयात कमी झाला. आज आपण दुग्ध जन्य पदार्थांचा निर्यात ही करतो. देशात १९ कोटी गायी आहेत त्यात 5 कोटी विदेशी आणि संकर गायी आहेत. त्यात 13 कोटी गायी दूध देणार्‍या आहेत. दुधाचे उत्पादन 2014-15 मध्ये 146.3 एमटी होते जे वाढून 23-24 मध्ये 239.2 एमटी झाले. दुग्ध जन्य पदार्थांचा निर्यात 2014 मध्ये 141.39 मिलियन युएस डॉलर होता तो 23-24 मध्ये वाढून 272.64 मिलियन डॉलर झाला. देशात अमूल, मदर डेअरी, नंदिनी सारखे मोठे ब्रॅंड तैयार झाले. कोट्यवधी शेतकर्‍यांना त्याच्या लाभ झाला. असो

आजचा लेख गोमय वर आहे. शेतकरी गायीचे शेण खत शेतात टाकतो त्या बदल्यात शेतातून अन्न रूपी लक्ष्मी प्रगट होते. शेतकरी आणि जनतेचे पोषण या अन्नावरच होते. बहुतेक हेच कारण असावे शरद ऋतुत नवीन अन्न आल्यावर गोवर्धन पूजेची परंपरा आपल्या देशात आहे. आज ही आपण यज्ञ हवन आणि धार्मिक समारंभात आपण गायीच्या गोवार्‍यांच्या उपयोग करतो. पूर्वी आणि आज ही गावांत घर शेणाने सावरतात. पावसाळ्यानंतर घराच्या भिंतींचा रखरखाव करण्यासाठी ही शेणाचा उपयोग होतो. गायीच्या शेणापासून, उदबत्ती, धूप, संभ्राणी कप, हवन कप, दिवे इत्यादि पूजा सामग्री बनतात. आता तर भिंती रंगविण्याचे पेंट ही शेणा पासून बनू लागले आहेत.

शंभर वर्षांपूर्वी आणि आज ही भारतात ग्रामीण भागात आणि जगात अनेक भागांत घरांच्या निर्मिती साठी माती आणि शेणाचा वापर होतो. काही वर्षांपूर्वी अशोक नगर जवळ एका मराठी जमींदाराच्या शेताला भेट दिली होती. बाहेर भयंकर गरमी होती पण शेतात असलेल्या मातीच्या (माती आणि बांबू वापरुन पूर्वी घरे बनत होती) आणि वरती मातीची कौलारू छत) घरात वातावरण थंड होते. मातीच्या घरांच्या निर्मिती आणि रखरखावचा खर्च अत्यंत कमी असतो. या शिवाय भूकंप इत्यादि आल्या तरी तुमचे प्राण वाचण्याची शाश्वती. आज गायीच्या शेणापासून वीट,टाईल्स बनतात. शेणापासून बनलेल्या वैदिक प्लास्टरचा आणि पेंटचा उपयोग केला तर घराचे तापमान बाहेरपेक्षा आठ ते दहा डिग्री कमी राहते. घराच्या निर्मितीचा खर्च ही कमी येतो. याशिवाय ज्याच्या कडे गाय आहे. तो गोबर गॅसचा वापर करू शकतो आणि खत तर बाई प्रॉडक्ट म्हणून तैयार होणारच. घरासाठी शेणाचा वापर पर्यावरणाला पोशाक ही आहे आणि खर्च वाचविणारा ही आहे.

आज अधिकान्श शेतकरी जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा जास्त वापर करतात. सरकारी ही रासायनिक खतांवर भारी भरकम अनुदान देते. पण जेवढा शेतकर्‍यांचा खर्च वाढत जातो तेवढे उत्पादन मिळत नाही. या शिवाय कितीही रासायनिक शेती केली तरी दर दोन किंवा तीन वर्षानी प्रति हेक्टर 12 ते 15 टन शेण खत विकत घेऊन शेतात टाकावे लागते. किमान तीस ते 50 हजार खर्च करावा लागतो.

देसी गायीच्या गौ मूत्रात असंख्य सक्रिय संयुगे असतात. मुख्यत: नाइट्रोजन, युरिया आणि खनिज इत्यादि ज्यांचा वापर खत आणि कीटनाशक बनविण्यात वापर होतो. गौ मूत्रात तांबे, लोह आणि जास्त सारखी खनिजे सापडतात जी वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. गायीच्या शेणात ही असंख्य संयुगे असतात. नायट्रोजन, फास्फोरस, पोटाशीयम असतात. असंख्य सूक्ष्मजीव असतात जे मातीच्या आरोग्यासाठी आणि वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. शेतीत गौ मूत्र आणि शेणाच्या वापराने शेत जमीन सुपीक आणि समृद्ध होते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाढते. एखाद वर्षी पाऊस कमी झाला तरी शेती होऊ शकते. पण यांच्या जास्त वापराने जमिनीचा पोत बिघडतो. कालांतरात जमीन नापीक होते. जमिनीतील पानी ही प्रदूषित होते. कृषि वैज्ञानिकांच्या मते विशेषकरून रासायनिक खतांचा वापर कमी झाला नाही तर भविष्यात जमिनीतील पानी पिण्याचे सोडा ओंघोळीच्या लायकीचे राहणार नाही. आज रासायनिक खतांचा आणि किट नाशकांचा परिणाम शेतकर्‍यांना भोगावा लागतो आहे. एक तर शेतीचा खर्च वाढला दूसरा लाखो शेतकरी कॅन्सर ग्रस्त होतात. पंजाबातून बिकानेरला जाणार्‍या गाडीचे नावच कॅन्सर ट्रेन पडले आहे. रासायनिक खत आणि किटनाशक वापरुन पिकावलेले अन्न ही विषाक्त असते. अश्या अन्नाचे सेवन करून कोट्यवधी लोक दरवर्षी रोगग्रस्त होतात. हजारो कोटी उपचारावर खर्च होतात. आज हजारो शेतकरी पुन्हा गोमय आधारित शेतीकडे वळत आहे किंवा स्वत:च्या वापरासाठी उपयोग करत आहे.

आयुर्वेदात रूग्णांच्या उपचारासाठी पंचगव्याचा वापर होतो. गौ मूत्राचा उपयोग शरीरातील प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी, कॅन्सर, मधुमेह आणि अनेक आजारांवर होतो. आज मोठ्या प्रमाणात गौ मूत्रावर संशोधन सुरू आहे. फिनायाल एवजी घरात गोनायलने (डिस्टील गो मूत्र आणि पाणी, कडू लिंब, निलगिरी, वज आणि पाईन तेल पासून) फरशी पुसली तर किटाणू आणि जिवाणू पासून सुरक्षा ही मिळते आणि अपायकरक ही नसते. आज हजारो गोशाला गोनायल, आंघोळीचे साबण आणि गो अर्क बनवितात. एका स्वदेशी कंपनी ने 100 कोटीहून जास्त रुपयांचे गो अर्क आणि गोनायल गेल्या वर्षी विकले. शेतकर्यांना ही गोमूत्र विकून एका लीटरचे पाच ते दहा रुपये सहज मिळतात. गेल्यावर्षी गोमय निर्मित वस्तूंचा 400 कोटींचा निर्यात आपण केला.

जर गोपालक आणि शेतकर्‍याने गोमयचा आर्थिक दृष्टीकोणातून उपयोग केला तर गौ मूत्र आणि शेण यातून विभिन्न जीवनावश्यक उपयोगी पदार्थांची निर्मिती करून गायीच्या दुधापेक्षा जास्त कमाई करू शकतो. शेतकरी एक गाय पाळून किमान एक हेक्टर शेतीत गौ मूत्र आधारित किटनाशकांचा आणि शेण आधारित खतांचा उपयोग करून खर्च वाचवू शकतो. जास्त उत्पन्न घेऊ शकतो. जमिनीची सुपीकता आणि पाणी धरण करण्याची क्षमता वाढवू शकतो. जास्त नफा मिळवू शकतो.

गायीच्या गौ मूत्र आणि शेणाचे आर्थिक महत्व आपल्या ऋषींना माहीत होते म्हणून ते म्हणाले "गोमय वसते लक्ष्मी"

जीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

18 May 2025 - 8:07 pm | कपिलमुनी

एवढ्या बहुगुणी गायी यू पी , एम पी , गुजरात मध्ये रस्त्यावर सोडून दिलेल्या असतात.. कोणी पाळत नाही..
राष्ट्रीय गो धोरण अवलंबून गो मूत्र गोबर यांची निर्यांत करायला हवी.. गेला बाजार सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना रोज पाजून देश आणि पक्ष अधिक बलवान करायला हवा

युयुत्सु's picture

20 May 2025 - 11:06 am | युयुत्सु

<गेला बाजार सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना रोज पाजून देश आणि पक्ष अधिक बलवान करायला हवा>

हा हा हा हा

<गौ मूत्राचा उपयोग शरीरातील प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी, कॅन्सर, मधुमेह आणि अनेक आजारांवर होतो.>

धादांत खोटं आणि कसलाही वैज्ञानिक आधार नसलेले, तसेच आधुनिक वैद्यकाचा अपमान करणारे विधान. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय जगत (लॅनसेट, नेचर किंवा बिएमजे यासारखी जर्नल्स) दखल घेत नाही तोपर्यंत अशा प्रचाराला फाट्यावर मारावे