माझा साक्षात्कारी हृदयरोग
डॉ. अभय बंग
शोधग्राम, गडचिरोली येथील प्रसिद्ध सामाजिक नेते डॉ अभय बंग यांनी त्यांच्या हृदयरोगावर कशाप्रकारे काम करत यशस्वीपणे हा आजार दूर केला याबाबतचे 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' हे पुस्तक आहे, जे अनेकांना प्रेरणा देणारे आहे.
पहिल्या 'आघात' प्रकरणात हृदयरोगाचा झटका (हार्टअॅटक) आल्यानंतर कशाप्रकारे दवाखान्यात पोहचेपर्यंत, पोहचल्यानंतरची धावपळ सांगितली आहे. यामध्ये अनेक वैदयकीय संज्ञा, वैदयकीय उपचारपद्धती या समजतात. शस्त्रक्रियेच्या दरम्यान(angioplasty )जेव्हा खुद्द डॉक्टरांचीच अभय बंग यांची हृदयाची नस फाटते. तेव्हा फारच भीती वाटते, डॉक्टरांना देखील 'अणुविसर्जनाची (मृत्यूची) वेळ आली आहे असे वाटते. मृत्यूबाबत 'अणुविसर्जन हा अनोखा शब्द छानच वाटला. [ पान नं. 32]
पुढच्या 'ऑर्निश'प्रकरणात ऑर्निशच्या शाकाहार, योगासने, शवासन, अध्यात्मिक समाधानावर आधारित उपचार पद्धतीचा अभय बंग यांनी हळूहळू कसा स्वीकार केला हे लिहिले आहे. यामध्ये 'भोजध्यान' जेवणाच्या सवयी, गरज नसताना जास्त खाणे, खाण्याचा खरा अस्वाद 'सुचवला.
याच प्रकरणात व्यायामाबाबत सांगतांना, चालण्याचा व्यायाम करताना हृदयगती कशी महत्त्वाची हे लिहिले आहे. तसेच पुढे ७.७ प्रकरणात चालण्याच्या व्यायामाच्या तीन Strolling, Brisk walking, Aerobic walking विषयी नवी माहिती मिळाली. या चढता क्रम सवय, नियमितपणाने प्राप्त करता येतो.
पुढील 'क्षणस्थ' हे प्रकरण अत्यंत सुंदर आल्हाददाय आहे. अध्यात्म ही या भूमीची/संस्कृतीची मोठी देणगी आहे.
परंतु या गोष्टी सध्याच्या धावपळीत अनेकांना अध्यात्म अगम्य वा वेळेचा अपव्यय वाटतो. परंतू माझ्या वैयक्तिक अनुभवानेही हे मान्य करते की, एकदा यातील साधनेची किल्ली गवसली की आपल्या गतीनुसार ही दिव्य शांती आयुष्य सुकर करते.
अभय बंग यांवर विनोबा भावे, महात्मा गांधी यांचा विशेष प्रभाव आहे. अभय बंग यांना विनोबा भावे यांचा मार्गदर्शक सहवासही आयुष्याचा प्रारंभी मिळाला आहे. त्याचमुळे या प्रकरणात विनोबांच्या लिखाणातील,आचरणातील 'गीतेतील तत्व डॉक्टरांच्या भाषेतून वाचायला मिळते. योगनिद्रा, ध्यान याचे महत्त्व यात अधोरेखित करताना 'स्वधर्म, म्हणजेच कर्म करण्याची चालना हेच निरोगी आयुष्याचे रहस्य अनेक उदाहरणांनी सांगितले आहे. मन एकाग्र करण्यासाठी 'स्वसंवेद्य सत्य' जागृत करणे व अनुभवणे म्हणजे काय याचा उहापोह आहे.
पुढील 'दर्शन' प्रकरणात विपश्यना त्राटक, श्रवण, मन केंद्रित करणे इ. ध्यानावर आधारित पद्धतीवर काम कसे झाले याचे अनुभव कथन आहे. यात अनेकदा भारतीय संत, साहित्यातील अध्यात्म - ध्यान अनुभव का सुंदर वचनांतून मांडला आहे.
स्वधर्म प्रकरणात अर्जुन विषाद या गीतेतील प्रकरणा प्रमाणेच आता काय करावे? युद्ध की निवृत्ती?असा प्रश्न हाताळला आहे.
अध्यात्माची गोडी लागली तरी संन्यास हा मार्ग कसा नाही हे सांगतांना 'स्वधर्म' म्हणजेच 'कर्म' करण्याचे महत्त्व आधुनिक पद्धतीने आहे. कर्म करताना ताण कसा दूर ठेवावा सांगितले आहे ,जो हृदयाला हानीकारक आहे. कर्मक्षेत्र व धर्मक्षेत्र एक झाल्यास ताणरहित, नैसर्गिक, अध्यात्मिक कर्म हे आपसुक प्राप्त होते हे सांगितले आहे.
शांती प्रकरणात
"मी अजूनही माझ्या मनाचे शेत नांगरत आहे पाऊस अजून पडलेला नाही. पण हे नांगरणच किती सुंदर अनुभव आहे! "
हे वाक्य खुपच आवडले.अनेक मोह,वासना,ताण हे ध्यान, वाचन, योग साधनेने दूर करणे ही खरच शांती मिळवण्याची नांगरणी आहे.
पुढच्या प्रकरणात व्यायामाची आहाराची यथोसांग वैज्ञानिक दृष्टीकोनातून उत्तम माहिती आहे . वजन, कोलेस्टेरॉल कमी करण्याच्या आहाराची माहिती आहे.
पुस्तकातील एक वाक्य खुपच गमतीशीर आहे.
"सर्वांना मी एकच शुभेच्छा देऊ शकतो, प्रत्येकाला एकदा तरी मृत्यूचं दर्शन अवश्य व्हावं."
खरोखर स्वानुभवातून मृत्यूच्या साक्षात्कारी अनुभव अभय बंग यांना आला व ते पूर्ण बदलले.
पण याची आपण वाट न पाहता यावर सदैव हृदयावर, आरोग्यावर काम करीत स्वधर्म पाळायला हवा.
-भक्ती
प्रतिक्रिया
31 May 2025 - 12:28 pm | युयुत्सु
मी वयाच्या 40 व्या वर्षी निवृत्त व्हायचं ठरवलं तेव्हा हे पुस्तक आणि रसेल चा एक निबंध कारणीभूत ठरले होते
31 May 2025 - 12:52 pm | Bhakti
वाह!वाचून छान वाटले _/\_
रसेलचा निबंध
दुवा असेल तर नक्की द्या!
31 May 2025 - 2:55 pm | युयुत्सु
https://www.misalpav.com/node/9007
1 Jun 2025 - 7:52 am | Bhakti
खुप छान भाषांतर आहे.
या दुव्यामुळे मी तिथे दिलेल्या प्रतिक्रियेतील आदिती यांच्या रसेलचा जीवन परीचय आणि धनंजय यांनी दिलेला 'बल' विषयावरील लेखही वाचला.खरोखर हे मिपामुळे घडलं, ह्या गोष्टी मिपावर २००८ मध्ये लिहिल्या गेल्या आहेत आणि मी आता वाचते, खुप उशीरा मिपावर आले याची कायम चुटपुट वाटते ;)
आता रसेल वाचायची खुप खुप उत्सुकता आहे.
खुप खुप धन्यवाद!
1 Jun 2025 - 8:58 am | युयुत्सु
खुप छान भाषांतर आहे.
उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
ना०मू०काकांना आणि त्यांच्या सारख्या समविचारी लोकांना कुणीतरी हा निबंध वाचायला द्यायला हवा.
24 Jun 2025 - 6:37 pm | Bhakti
सध्या हे पुस्तक मिळाले आहे.रसेलची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!!

24 Jun 2025 - 6:50 pm | युयुत्सु
अवश्य वाचा आणि तुमचं चिंतन इथे टाका
24 Jun 2025 - 10:42 pm | Bhakti
निसर्गायण लेखक दिलीप कुलकर्णी हे पुस्तक मी सध्या वाचतेय.बरचसं माझा साक्षात्कारी हृदयरोग सारखं पण निसर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टीने नीती मूल्य कशी जपली.भारतीय विरूद्ध पाश्चात्य यांची निसर्ग विषयक विचारसरणी(पहिले,दुसरे प्रकरण) मांडली आहे.
31 May 2025 - 4:55 pm | रीडर
यावर सविस्तर लेख येऊ दे.
आपली विचार प्रक्रिया, तयारी समजून घ्यायला आवडेल
Financial independence retire early या concept बद्दल मी जाणून घेत आहे सध्या
31 May 2025 - 5:58 pm | कंजूस
?40 व्या वर्षी निवृत्त?
हातापायाने काम करणारे साठाव्या वर्षी निवृत्त केले जातात आणि होतात. डोक्याने काम करणाऱ्यांना ते बंधन नसते. पेपरात ( टाइम्स , इककनॉमिक टाइम्स वगैरे) जे लेख येतात "साठाव्या वर्षी निवृत्त होण्यासाठी किती पैसे जमवायला हवेत" त्यात म्हणतात की महागाई इतकी वेगाने वाढते आहे की आताच्या सुखसोयींनी जगण्यासाठी साठवलेले पैसे पुरणार नाहीत, अर्धवेळ तरी काम पकडायची तयारी ठेवा. किंवा सुखसोयींना कात्री लावायची तयारी ठेवा.
1 Jun 2025 - 11:43 am | कानडाऊ योगेशु
माझ्या मते इथे निवृत्तीचा अर्थ एकाच रहाटगाड्यात अडकुन अर्थार्जनासाठी केलेले काम असे असावे.
निवृत्ती नंतर ते बंधन नसावे.युयुत्सु सर शेअर बाजार सक्रिय असल्याने अर्थप्राप्तीचा भाग सांभाळून असावेत असे वाटते.
31 May 2025 - 1:33 pm | कंजूस
परदेशी तक्ते असतात त्यात वजन, शर्करा, रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांचे कमी अधिक किंवा योग्य अशी आकडेवारी पाहून अभयला वाटत होते की मला कधी अटॅक येणार नाही. तरीही आलाच तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ती परिमाणं भारतात लागू नाहीत.
31 May 2025 - 1:45 pm | Bhakti
हो,त्यांच्या आहारात आधी दुधाचा समावेश खुप होता तो त्यांनी skimmed milk ३०० मिली/दिवस केला.तसेच काही पूर्वीच्या टेस्ट चुकीच्या ठरल्या,जे त्यांना माहीती नव्हते, त्यामुळे गाफील राहिले.
1 Jun 2025 - 8:16 pm | प्रकाश घाटपांडे
हे पुस्तक मी माझ्या साक्षात्कारी हृदयरोगाच्या विश्रांती काळात म्हणजे १९९२ साली वाचले होते. आता त्याला ३३ वर्षे झाली. अंनिसमधीला माझ्या बुद्धीवादी मित्रांच्या दृष्टीने या पुस्तकातील विचार छद्मशास्त्रीय होते. तो काळही अंनिसच्या ऐन बहराचा होता. मला देखील तसेच वाटले होते तेव्हा. तरीही वाचून बरे वाटले
2 Jun 2025 - 9:01 am | युयुत्सु
वैज्ञानिक/अवैज्ञानिक, विवेक/अविवेक इ० ची प्रशस्तीपत्रके वाटायचा मक्ता घेतलेल्या अनिसला जीवशास्त्र किती कळते असा मला प्रश्न पडला आहे. वरील पुस्तकातले कोणते विचार छद्मविज्ञान आहेत हे न सांगता लेबले लावत हिंडणे याला विवेकी कृती म्हणायचे का?
2 Jun 2025 - 10:51 am | गवि
हे पुस्तक खूप गाजले होते. अर्थातच ते वाचले आहे. उपयोगी पुस्तक आहे. मूलभूत विचार त्यात आहेत. फक्त एकच कमी जाणवते, (पुस्तकात नव्हे) तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का? असा फॉलो अप कुठेतरी छापून यायला हवा होता. त्या पुस्तकातले आणि त्यानंतरचे सर्व लिखाण त्या दोन वर्षांतले आहे. बातम्या वाचल्या असता त्यांना पुढेही हृदय विकारासाठी रुग्णालयात दाखल करायला लागले होते असे दिसते (एकाहून अधिक वेळा). अर्थात त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते. पण एखादा बदल घडवला तर त्याचे पुढे काय झाले हे समजल्यास अधिक बरे वाटते.
2 Jun 2025 - 2:52 pm | स्वधर्म
पुस्तक लिहिल्यानंतर काही वर्षांनी मी बंग यांचे भाषण ऐकले होते. पुन्हा हृदयविकाराचा त्रास झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यात ते काय म्हणाले होते ते आता आठवत नाही. पुस्तकात त्याचे सासरे कसे स्वतःची कार असून बसने फिरतात असा उल्लेख होता. त्याचे कारण म्हणजे लोकांशी संपर्क, त्यांच्यात मिसळणे इ. पण पुण्यातील त्या भाषणात त्यांनी मी विमानाने कसा आलो, तरीही सकाळी कसा फिरायला गेलो होतो इ. उल्लेख केले होते. पुढे दिलीप कुलकर्णी यांनी त्यांच्या वातानुकुलित प्रार्थनास्थळाची व संस्थेची माहीती दिली होती. त्यामुळे ते आता मोठे हस्ती झाले आहेत व त्याचा पुस्तकात लिहिल्याप्रमाणे जगण्याशी संबंध कमी झाला असावा असे वाटले होते.
पण मला वाटते पुस्तकातील उपायांचा काही प्रमाणात उपयोग होत असावा, पण आधुनिक विज्ञानाप्रमाणे ते सिध्द करणे अवघड आहे. बंग हे उत्तम लेखक आहेत. परंतु वाचकाला खिळवून ठेवणारे पुस्तक लिहिणे वेगळे व विज्ञानाच्या कसोटीवर काही सिध्द करणे वेगळे. परंतु वाचकांना जीवनशैली बदलण्याची प्रेरणा मिळते हेही नसे थोडके.
2 Jun 2025 - 3:23 pm | Bhakti
+१
बरोबर,change is only constant thing.
जाणकार वाचक वा थेट जाणकार लेखकही हे मान्य करतात की, सद्यस्थितीला लिहिलेले काळानुरूप सर्वोपरी लागू होणार नाही.पण प्रत्येक पुस्तकाचे एक सत्व अबाधित राहते.या पुस्तकासाठी आहार,व्यायामाची योग्य सांगड, मन शुद्धी आणि ताण कमी करणारे भारतीय दर्शनाचे अवलंब आहे,जे नेहमी लागू होईल,प्रेरणा देत राहील.
2 Jun 2025 - 10:53 am | युयुत्सु
<तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का?>
भरपूर संशोधन झाले आहे. हवे असेल तर माहिती मिळवून देऊ शकेन.
2 Jun 2025 - 10:58 am | युयुत्सु
### Key Points
- Research suggests lifestyle modifications can reduce the risk of recurrent coronary events.
- It seems likely that changes like diet, exercise, and smoking cessation are effective, based on multiple studies.
- The evidence leans toward cardiac rehabilitation programs also lowering recurrence rates, though participation rates vary.
### Introduction
Coronary events, such as heart attacks, can recur, and lifestyle modifications are often recommended to prevent this. Research has explored how changes in diet, physical activity, and other habits impact these recurrence rates. Below, we break down the findings for a clearer understanding.
### Research Overview
Studies show that adopting a healthy lifestyle can significantly lower the chances of another coronary event. For instance, the Mediterranean diet has been linked to reduced risks, and quitting smoking post-heart attack can improve long-term outcomes. However, the effectiveness can vary based on individual factors and how well these changes are maintained.
### Cardiac Rehabilitation and Participation
Cardiac rehabilitation, which includes lifestyle changes, has been shown to reduce mortality rates by up to 21% over five years. Yet, participation remains low, with rates around 10–20% in earlier years and under 30% more recently, highlighting a need for better access and awareness.
---
### Detailed Survey Note
Coronary artery disease remains a leading cause of death globally, with approximately 805,000 individuals in the US experiencing a myocardial infarction (MI) each year, nearly 25% of which are reinfarctions. Given the significant burden, follow-up research on preventing recurrence through lifestyle modification is crucial. This note synthesizes findings from recent studies, emphasizing the role of lifestyle changes in reducing recurrent coronary events and improving patient outcomes.
#### Background and Prevalence
Coronary events, including MIs and subsequent reinfarctions, pose a persistent threat, particularly post-intervention like percutaneous coronary intervention (PCI). Advances in medical therapy, such as dual antiplatelet therapy (DAPT) and statins, have improved survival rates, but recurrent events remain a concern. Research suggests that lifestyle modifications can complement pharmacotherapy to further mitigate this risk.
#### Impact of Lifestyle Modifications
Numerous studies have investigated the efficacy of lifestyle changes in secondary prevention. Key areas include:
- **Smoking Cessation**: Post-MI, quitting smoking reduces mortality risk by 37% over 13 years compared to continuing, with a 18% risk reduction for those reducing cigarette intake by 5 daily. Combination therapy (pharmacotherapy and behavioral support) improves cessation success by 70–100% compared to minimal intervention, as supported by studies like [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) and [Combination Therapy Effectiveness](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3).
- **Dietary Changes**: The Mediterranean diet, rich in fruits, vegetables, whole grains, and olive oil, showed a 72% reduction in recurrent nonfatal MI and 56% mortality reduction over 4 years in the Lyon Diet Heart Study. The PREDIMED study found a 30% reduction in cardiovascular events with Mediterranean diet supplemented by extra-virgin olive oil or nuts. The DASH diet, reducing systolic blood pressure by 5.5 mmHg and diastolic by 3.0 mmHg, also showed benefits, particularly in hypertensive patients, with effects comparable to one antihypertensive medication (DASH-Sodium Trial). Vegetarian diets were associated with 30% lower ischemic heart disease mortality compared to non-vegetarian diets, while ketogenic diets, despite weight loss benefits, showed increased post-MI mortality with higher animal fat intake.
- **Exercise and Physical Activity**: Post-MI, remaining active or increasing activity reduces mortality by 71% and 59% at 1 year compared to remaining inactive. Guidelines recommend 150–300 minutes of moderate or 75–150 minutes of vigorous weekly activity to maintain cardiovascular health.
- **Weight Management**: A 5% weight reduction improves blood pressure, cholesterol, and glycemic control. Bariatric surgery in obese patients reduced all-cause mortality by 45% and cardiovascular mortality by 41%. The SELECT trial with semaglutide showed 10% weight loss and a 20% reduction in cardiovascular outcomes, highlighting the role of weight management.
- **Stress Management and Psychological Health**: Cardiac rehabilitation (CR) programs, which often include stress management, reduced 5-year mortality by 21% in Medicare cohorts, with dose-dependent benefits. Participants attending more sessions showed improved MI and death outcomes, with a 63% decrease in depressive symptoms and 73% mortality reduction in depressed CR participants.
#### Cardiac Rehabilitation and Participation Challenges
CR is a cornerstone of secondary prevention, integrating lifestyle modifications with supervised exercise and education. It reduces 5-year mortality by 21%, with greater session attendance linked to better outcomes. However, participation rates are low, historically at 10–20% in 2005 and under 30% by 2014, due to barriers like low referral rates (men 1.5 times more likely referred than women), age over 60, and socioeconomic factors. Alternatives like home-based CR (HBCR) showed better 6-minute walk test results, quality of life, and completion rates (>85%) compared to facility-based programs, with hybrid models being non-inferior at 1 year.
#### Long-Term Observational Insights
Long-term studies like the Nurses' Health Study and Health Professionals Follow-up Study provide insights into lifestyle impacts on CVD risk, including coronary events. These observational data underscore the sustained benefits of lifestyle modifications, with higher quality diets associated with lower all-cause mortality post-MI, as seen in recent cohort analyses.
#### Comparative Analysis
The following table summarizes key lifestyle interventions and their impact on recurrent coronary events:
| **Intervention** | **Impact on Recurrence** | **Supporting Evidence** |
|--------------------------|-------------------------------------------------------|-----------------------------------------------------|
| Smoking Cessation | 37% mortality risk reduction over 13 years post-MI | [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) |
| Mediterranean Diet | 72% reduction in nonfatal MI, 56% mortality reduction | Lyon Diet Heart Study, PREDIMED Study |
| DASH Diet | Reduces blood pressure, comparable to one drug | DASH-Sodium Trial |
| Exercise (150+ min/week) | 71–59% mortality reduction at 1 year post-MI | Guidelines and observational data |
| Weight Loss (5%) | Improves BP, cholesterol, glycemic control | SELECT Trial, bariatric surgery outcomes |
| Cardiac Rehabilitation | 21% reduction in 5-year mortality | Medicare cohort, dose-dependent benefits |
#### Conclusion
Follow-up research clearly supports the role of lifestyle modifications in reducing the recurrence of coronary events. From dietary shifts like the Mediterranean and DASH diets to smoking cessation and increased physical activity, these changes offer significant benefits, often enhanced by CR programs. However, challenges in participation and implementation highlight the need for improved access and tailored interventions, particularly for underserved populations.
### Key Citations
- [Smoking Cessation Outcomes in Post-MI Patients](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020)
- [Combination Therapy Effectiveness for Smoking Cessation](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3)
2 Jun 2025 - 11:57 am | विवेकपटाईत
हृदयाघाताचा मला ही भरपूर अनुभव आहे. आमच्या कार्यालयातील जोतिषाचा शौक असलेल्या एक बाबू मला एकदा म्हणाला होता पटाईतजी आपके कुंडली में राहू बहुत स्ट्रॉंग है, यमराज बेचेरा हार के लौट जाता है. पाच वेळा हृदयाघाता , पाच वेगळे हॉस्पिटल्स, तीनदा अंजीओ, एकदा स्टेन्ट, एकदा बायपास. मजेदार प्रत्येक वेळी हृदयाची गती 110/70 होती. वजन ही जास्त नव्हते. बाहेरचे खाणे ही नाही (आता वाढले आहे), पान सिगरेट तंबाकू दारू ही नाही. कारण कार्यालयात जास्त वेळ काम करणे आणि स्ट्रैस असावा.
24 Jun 2025 - 7:13 pm | मारवा
तुमचे fighting spirit आवडले.
24 Jun 2025 - 10:15 pm | Bhakti
_/\_
2 Jun 2025 - 11:58 am | विवेकपटाईत
बेचेरा नाही बेचारा वाचावे.