सन्मान
लोक विचारती आम्हा, का दर्द आमच्या शायरीत आहे
अहो व्यथांना सन्मानिण्याची, हीच आमची रीत आहे
वाटते दु:खासही कधी,दिसावे सुंदर आपणही
लेखणीत म्हणून ते आमच्या, यथेच्छ शृंगार करीत आहे
ये फुलवितो तुलाही, सांगतो दु:खास आम्ही
ऐकतो ते ही स्वतःला, आताशा सावरीत आहे
कधी करतो सलगी, बोचर्या जुन्या क्षणांशी
वागणे जरासे आमचे, आमच्याच विपरीत आहे
घेतला दगाही काही, ऐश्या सफाईने आम्ही
दगाबाज अजून आमची, वाहवा करीत आहे