"कस होणार या पोराच !." पार्थचे बाबा ,पार्थाच्या आईकडे पहात म्हणाले.
"जाऊ द्या हो, अजुन लहान आहे आणी काही वाईट तर करत नाही ना!." पार्थची आई.
पार्थ मात्र स्वतः मध्येच मग्न होता.पार्थ लहान असताना हातात उदबत्ती घेऊन बोबड्या भाषेत देवापुढे..जय..जय..करायचा
तेंव्हा सगळ्यांना त्याचे कौतुक वाटायच, पण पार्थ आता आठ वर्षाचा झालता.सुट्टीच्या दिवशी त्याच आवडत काम
म्हणजे,देवाची पुजा करणे..देवपुजे मध्ये तो तास-दोन तास सहज रमुन जायचा.देवांना स्नान घालणे,वस्त्रानीं पुसणे.
त्यांना गंध लावुन जागे वर ठेवणे हे मन लावुन करायचा.नंतर पाच-दहा मिनीट हात जोडुन प्रार्थना करायचा.