गुपित- एक गुढ रहस्यमय रुपक कथा -एकाच भागात संपुर्ण

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
26 Jan 2015 - 4:24 pm

"कस होणार या पोराच !." पार्थचे बाबा ,पार्थाच्या आईकडे पहात म्हणाले.
"जाऊ द्या हो, अजुन लहान आहे आणी काही वाईट तर करत नाही ना!." पार्थची आई.

पार्थ मात्र स्वतः मध्येच मग्न होता.पार्थ लहान असताना हातात उदबत्ती घेऊन बोबड्या भाषेत देवापुढे..जय..जय..करायचा
तेंव्हा सगळ्यांना त्याचे कौतुक वाटायच, पण पार्थ आता आठ वर्षाचा झालता.सुट्टीच्या दिवशी त्याच आवडत काम
म्हणजे,देवाची पुजा करणे..देवपुजे मध्ये तो तास-दोन तास सहज रमुन जायचा.देवांना स्नान घालणे,वस्त्रानीं पुसणे.
त्यांना गंध लावुन जागे वर ठेवणे हे मन लावुन करायचा.नंतर पाच-दहा मिनीट हात जोडुन प्रार्थना करायचा.

पार्थ लहानपणापासुन आपल्या आजोबांना पुजा करताना पहात असे.त्याचे आजोबा मोठे कर्मठ होते.पुजा-जप यामधे त्यांचा
अर्धा दिवस जायचा.पार्थला हे खुप आवडायच,आजोबा पुजा करताना पार्थ तिथेच बसुन त्यांना मदत करायचा.
तुळशीपत्र,फुल आणुन द्यायचा,त्याबदल्यात आजोबा त्याला देवांच्या गोष्टी सांगायचे.देवा कडे काही मागीतले की नक्की मिळते
हे त्याच्या मनावर ठसल होत.

पण एक वर्षापुर्वी पार्थच्या आजोबाचे निधन झाले.त्यानंतर घरची देवपुजा विस्कळीत झाली.बाबा लवकर कामाला जायचे आणी आई घरकामामध्ये व्यस्त असायची.एकेदिवशी पार्थने आईला मी पुजा करतो म्हणला,आईला कोतुक वाटले.तीनेही
परवानगी दिली.पार्थने मन लावुन पुजा केली.सगळ्यांना त्याच कोतुक वाटले,'अगदी आजोबाच्या हातावर हात मारलाय' बाबा म्हणाले.

पण पार्थला हे सगळ आईबाबाला न कळण्यासारख आहे अस वाटायच. सगळच एक रहस्य,एक गुपीत होत.
पार्थने कुण्णा-कुणाला सांगितले नाही की देव त्याच्याशी बोलायचे,त्याचे ऐकायचे,त्याची मदत करायचे.

पितळी डब्ब्यातील देव ताम्हणात घेऊन पार्थ त्यांना स्नान घालायचा तेंव्हा,बालगोपाळ पाणी थंड आहे म्हणुन तक्रार करायचा,हनुमान मात्र हुप्प म्हणुन मुटका मारायचा.आंघोळ झाली की अंग पुसुन एक-एक देव डब्यात जायचे.
आधी गणपती जायचा विष्णुच्या बाजुला जाऊन बसायचा.नंतर लक्ष्मी,गरुड,अन्नपुर्णा,हनुमान,विठ्ठल-रुक्मिणी,शालीग्राम..
डब्यात आपआपली जागा पकडुन बसायचे.बालगोपाळ रांगता म्हणुन डब्याच्या मध्यभागी मोकळी जागा त्याला.
शेवटी विष्णु येऊन आपल्या आसनावर बसायचा.पार्थच्या नजरेत सगळे हजर झालेले असायचे.

आता गंधाच वाटप व्हायच, आणी देवांच्या गप्पा चालु व्हायच्या. पार्थने लावलेल गंध गणपतीच्या डोळ्यात जात म्हणुन
तो तक्रार कारायचा,तर शालीग्राम इकडुन-तिकडे गडगडत राहायचा.बालगोपाळ गरुडाचे पंख ओढायचा.विठ्ठल-रु़क्मिणी
कमरेवर हात ठेवुन शांत उभे राहायचे.तर लक्ष्मीच्या धाकाने विष्णु काही बोलायचा नाही.
मग पार्थ हात जोडुन काही तक्रार असेल तर देवाला सांगायचा.बाबांची तक्रार विष्णु कडे,आईची लक्ष्मी कडे तर रिक्षावाल्याकाकांची तक्रार गरुडाकडे.मग देव आपसात काथ्थ्याकुटुन उपाय सुचवत असत.

आजची तक्रार जरा वेगळी होती,ईथे फक्त हनुमानाचे काम होते.
पार्थ",हनुमाना,आमच्या शाळेतील शुभम नावाचा मुलगा आहे ना! तो रोज मला पाठीत गुद्दे मारतो,तु त्याला गदेचा एक फटका मार म्हणजे पुन्हा कुणाला त्रास देणार नाही."
हनुमान",तु काही त्याची खोडी काढलीस का ?"
पार्थ;"नाही हनुमाना तो शुभम आहेच गुंड,सगळ्यांना मारतो."
हनुमान;" ओके,पण या आठवड्यात मी जरा बिझी आहे.गावाकडे शक्ती चा कार्यक्रम ठेवलाय,तिकडे जायच आहे.तु एक काम
कर त्या शुभमने तुला मारल की त्याच्या नाकावर एक ठोसा मार्,बाकीच मी पाहुन घेईन.यासाठी मी तुला माझी एका बोटाची शक्ती देतो."
"ओके हनुमान,जय श्रीराम."पार्थ
"जय श्रीराम." हनुमान

"अरे पार्थ्,झाली का देवपुजा ?, चल नेवेद्य तयार आहे.तो दाखव आणी आटप आता."पार्थची आई.
पार्थ भानावर आला.नेवेद्याच ताट देवापुढे ठेवुन पाणी फिरवल.
" अरे देवा ! आज पण शिराच !!" विष्णु कुरकरला.
तस लक्ष्मीने त्याला कोपर्‍याने ढोसल," अहो!! काय तोंड वेंगाडताय,आयत मिळतय तर गिळा की.!! पार्थच्या आईला आज शेजारी पापड करायला जायच आहे,तिच्याकडे वेळ नाही,घ्या आज सांभाळुन. काय पार्थ !."
पार्थ" *wink* ."

(समाप्त)
११-१२-२०१३

कथाबालकथाविनोदमौजमजालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

वा! एकाच स्क्रोलमध्ये संपूर्ण वाचून झाली.

आनन्दा's picture

26 Jan 2015 - 4:30 pm | आनन्दा

भलतीच गूढ आहे हो..

स्पंदना's picture

26 Jan 2015 - 5:29 pm | स्पंदना

गूढ ??
पण गुड नक्की आहे.

हाहाहाहा.. गूढकथा आहेच एका लहानग्या पार्थची.

दिपक.कुवेत's picture

26 Jan 2015 - 5:34 pm | दिपक.कुवेत

पार्थला सांगतोच तुझं नाव बाप्पाला सांगायला....तोच तूला शीक्षा करेल अशी गुढ कथा टाकल्याबद्दल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Jan 2015 - 6:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

मुन्ना भाई ला बापू दिसत तसेच काहीसे प्रकरण दिसते आहे!!! कृ ह घे

आतिवास's picture

26 Jan 2015 - 6:49 pm | आतिवास

:-)

अबलख वारू's picture

26 Jan 2015 - 8:49 pm | अबलख वारू

जबरा....
पार्थची आई पापड लाटायला का जाते ?? ह्यातच गुढ उकलले...........

किशोर७०'s picture

26 Jan 2015 - 9:53 pm | किशोर७०

काही कूट प्रश्न काथ्याकुट करण्यासाठी या कथेत उपस्थित झालेले आहेत-
१. देवाची पूजा लाभ मिळवण्यासाठी करायची असते, असे मुलांच्या मनावर ठसवायचे का?
२. कथेतले देव पार्थला शिकवण देतात. जसे हनुमान म्हणतो, जशास तसे उत्तर दे. विष्णू म्हणतो, एकच गोष्ट रोज रोज खाऊ नये. बालमनावर असे संस्कार योग्य आहेत का?

मुक्त विहारि's picture

27 Jan 2015 - 12:18 am | मुक्त विहारि

पण जीमोंची सर नाही...

त्यामुळे ही कूट-कथा काही उलगडली नाही.

असो,

लातूरला आलो की कथा समजावून सांगालच.

काय जबरदस्त लीवलीय गुढ कथा.. :)

ट्का कुठेय ?? खाद्य आलं रे.... पाड काय पाडायची ती जिलबी आता. कच्चा माल आपलाच हाय.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2015 - 7:31 am | मुक्त विहारि

पॉपकॉर्न घेवून बसलो आहे...

श्रीरंग_जोशी's picture

27 Jan 2015 - 9:10 am | श्रीरंग_जोशी

जेपीकथा आवडली.

नाखु's picture

27 Jan 2015 - 11:33 am | नाखु

मस्त रे ! जे तुला तरास देतील त्यांच नाव मी "गरूडाला" सांगणार आहे. (नेईल अलगद हिमालयात तेव्हा कळल सगळे)

आजचा सुविचार ..
मिपावर आपणच शहाणे आहेत हा जसा भ्रम आहे तसाच मिपा वाचून शहाणेच होता येते हाही भ्रमच आहे.
(बाबांच्या " सूचक मौनाची भोचक भाषांतरे" या पुस्तकातून साभार)

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2015 - 12:30 am | टवाळ कार्टा

बाबांच्या " सूचक मौनाची भोचक भाषांतरे" या पुस्तकातून साभार >> =))

अरेच्चा तुम्ही पण बाबांचे शिष्यत्व पत्करलेले दिसत आहे.

बाबा पाटील's picture

27 Jan 2015 - 11:40 am | बाबा पाटील

जि मो नाहीत ना ?

काळा पहाड's picture

27 Jan 2015 - 1:39 pm | काळा पहाड

मोजींकडे शिकवणी लावावी असा सल्ला देवू इच्छितो. त्यांच्या "काळी मावशी" (http://misalpav.com/node/27103) या कथेवर डिस्कशन्स वर डिस्कशन्स चालू आहेत.

पैसा's picture

27 Jan 2015 - 9:05 pm | पैसा

गोष्ट आवडली!

जेपी's picture

28 Jan 2015 - 10:09 am | जेपी

धन्यवाद सर्वांचे..
शिर्षक गंडले आहे हे नंतर लक्षात आले पण उगाच कशाला संम ला त्रास द्या म्हणुन तसेच राहु दिले.
रुपक एकाला हि कळ्ले नाही,असो कधितरी निरुपण करुन सांगेन.
याची जिल्बी/विडंबन करुन दाखवावे. भाषा वेगेरे न बदलता.
केल्यास ठाण्यात येऊन तिथल्या मिपाकरानां मामलेदाराची मिसळ पोटभर खाऊ घातली जाईल.
लागु द्या काय वेळ लागेल तो..सध्या मी पण रिकामा नाही. *wink*

संदीप डांगे's picture

28 Jan 2015 - 3:28 pm | संदीप डांगे

हे कुठेतरी केजरिवाल नामक इसमाशी जुळते काय?

इरसाल's picture

28 Jan 2015 - 6:06 pm | इरसाल

लाउलबाबा बद्दल आहे का ?

ताजा कलम- शाळेत त्रास देणार्‍या गुंड मुलाचे नाव शुभम नाही तर ओम आहे असे खात्रीशीर सुत्रांनकडुन कळाले आहे.

धन्यवाद.

श्रीरंग_जोशी's picture

31 Jan 2015 - 12:25 am | श्रीरंग_जोशी

या 'ओम' नावामुळे ही रूपककथा मराठवाड्यातील राजकारणावर आधारीत असावी असा अंदाज आहे.