विचार

वाढदिवस..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
13 Oct 2020 - 2:16 pm

मला या वयातही वाढदिवस साजरा करणं फार आवडतं. तो अगदी थाटामाटात,सर्व जवळच्या व्यक्तींना बोलावून,घरीच मस्त पार्टी करुन साजरा करायला मजा येते.

माझ्या लहानपणी मुलांचे काय कुणाचेच वाढदिवस साजरे करण्याची पद्धत नव्हती. नवे कपडे नाहीत, केक नाही, बुके नाही, हाॅल सजवणं नाही, गोडधोड नाही, अगदी साधा शिरा सुद्धा नाही. खेळगड्यांना बोलावणं नाही, गालाची पापी घेणं नाही. काही काही नाही.

जीवनमानविचार

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
7 Oct 2020 - 2:40 pm

अफझलखानः-
अफझलखान हा मुळचा अब्दुल्लाखान.एका भटारीण बाईचा मुलगा.पण आपल्या अंगभुत गुणाने आणि पराक्रमाने तो मोठा झालेला होता. अफझलखान हि त्याला विजापुर दरबाराने दिलेली पदवी होती. स्वभावाने अत्यंत क्रुर असा हा ईसम.कपट आणि दगाबाजी हि त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्येच होती. ज्या शहाजी राजांच्या खांद्याला खांदा लावून बसवपट्टणची लढाई जिंकली त्या शहाजी राजांना जिंजीच्या वेढ्यात कैद करताना त्याचे हात जराही थरथरले नाहीत.

इतिहासविचारसमीक्षालेखमाहिती

एका नातवाची आजी....

Vivekraje's picture
Vivekraje in जनातलं, मनातलं
2 Oct 2020 - 9:56 am

रोजची रात्री साडेआठची बस. या बसला शक्यतो रोज अप डाऊन करणारे, काही कॉलेजची मुलं अशी नेहमीची गर्दी. मुंबईत नसलो तरी आम्ही बस ने अप डाऊन करताना तसाच लोकलचा फील यायचा आम्हाला. कारण प्रत्येक बस ला वेगळा ग्रुप, वेगळी माणसं त्यामुळे आपली रेग्युलर बस चुकली की एकदम अनोळखी प्रदेशात आल्यासारखं वाटायचं.

मांडणीवावरमुक्तकसमाजजीवनमानप्रकटनविचारअनुभव

मावळतीला

Pratham's picture
Pratham in जनातलं, मनातलं
29 Sep 2020 - 11:54 am

दिवस मावळतीकडे झुकताना सावल्या अदृश्य होऊ लागतात.मनात एक हुरहूर लागून राहते.ती हुरहूर आपल्याला नेमक्या शब्दांत व्यक्त करता येत नाही,हवीहवीशी तरीही नकोशी.एक वेगळीच भावना असते ती.चार भिंतीमध्ये बसून राहिले तर मन उदासीन होते तेच जर मोकळ्या हवेत गेले तर एकदम शांत वाटते,अस्तित्वाची जाणीव होते.सूर्य मावळतानाचे दृश्य खूप सुखद वाटते.सूर्य हळूहळू कलत असतो,आकाशात तांबड्या-केशरी रंगाची उधळण असते.एखाद्या तळ्या किनारी मावळतीचे दृश्य भलतेच सुंदर दिसते.पाण्यावर सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असते,आकाश लाल रंगात न्हाहून गेलेले असते,पक्षी दिवसभर अन्नासाठी भटकून परतताना दिसतात.झुंडीने ते एका संथ लयीत उडत असतात.पा

साहित्यिकजीवनमानप्रकटनविचारलेख

आत्मविश्वास वाढवणारं भाषण

लेखनवाला's picture
लेखनवाला in जनातलं, मनातलं
18 Sep 2020 - 9:19 pm

“तुम्ही इथे उगाच नाही जन्माला आला आहात, काहीतरी कारण आहे, तुम्हाला हा नश्वर देह घेवून नुसतंच जगायचं नाहीय, तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तुम्ही ईथे आहात….. आणि ईथे तुम्ही अस्तित्वात आहात… जिवंत आहात…. हीच गोष्ट पुरेशी आहे….. आता फक्त तुम्हाला सिदध करायचं….. तुमची सगळी मेहनत ही तुमच्या मनाची मशागत करण्यासाठी असायला हवी…..एकदा त्यांच्यावरती ताबा मिळवला की झालं…. मनात गोष्ट पक्की करायची, त्यांच्यामागे लागायचं, यांसाठी काही ध्येय डोळ्यांसमोर ठेवावी लागतील….. तुम्हाला आभाळाएवढी स्वप्न बघावी लागतील, तुमच्या सध्याच्या परिस्थितीवरुन तुम्हालां ते अशक्यप्राय वाटेल…..

धोरणमांडणीवावरवाङ्मयकथाप्रकटनविचारलेख

अदूला सहाव्या वाढदिवसाचं पत्र- औ पाबई!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
18 Sep 2020 - 9:04 am
समाजजीवनमानविचारअनुभव

देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा!

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
16 Sep 2020 - 3:48 am

p {
text-align: justify;
font-size: 17px;
}

देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा!

‘हजारो भारतीय चीनच्या हेरगिरीचे लक्ष्य’ , ‘भारताच्या 10 हजार व्यक्तींवर चीनची नजर’ अशा मथळ्याच्या बातम्या आपल्यापैकी बहुतेकांनी नुकत्याच वृत्तपत्रांमधून वाचल्या असतील.

मांडणीराजकारणविचारलेखमत

Once in a lifetime....!

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
12 Sep 2020 - 1:35 pm

२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ?

मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच.

मांडणीआरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणप्रकटनविचारसद्भावनाप्रतिक्रियालेखअनुभवमाहितीप्रश्नोत्तरेमदतआरोग्य

माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
10 Sep 2020 - 9:24 am

प्रस्तावना - काही दिवसांपुर्वी अंनिस वार्तापत्राच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला अन माधव रिसबूडांची तीव्रतेने आठवण झाली. माधव रिसबूड 2003 मधे निवर्तले. त्यांच्यावर कै. माधव रिसबूड: एक कठोर फलज्योतिष चिकित्सक असा लेख अंनिस वार्तापत्र दिवाळी अंकासाठी त्यावेळी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबूडांनी फलज्योतिषचिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठिकाणी वकीली केली होती. त्यावेळी गाजलेल्या नाडीग्रंथ प्रकरणात तर ते अगदी हिरिरीने लेख लिहित.

समाजफलज्योतिषविचारलेख