शिक्रेट (शतशब्दकथा)
म्हराटी शाळंची घंटी वाजली. . . . मजी येक वाजला!
लगी म्या भांडं घिउन काकुंच्या घरला जाते.
''काकू जरा मुरवण देता का?''
''बस बाळा दोन मिन्ट, होतंय.'' काकू.
मलाबी बरं वाटतं जरा- रेडिवो आयकायला भेटतो. लई छान मराठी गाणी लावत्यात काकू.
काकू चांगल्या हायत. रोज मुर्वान मागितलं तरी नाय म्हणीत नैत.
पन तेंची तायडी?. ती घरात नसल्यालीच बरी.
नायतर मग चवकशा सुरूच-
''सुमी रोज कशाला येती?''
''आन मुरवान यवड्या मोट्ट्या भांड्यात कशाला?''
उरलं तर काकू कालवनच देत्यात. मग काय दिपवाळीच!