पशु पक्षांसाठी श्री. किरण पुरंदरे (पक्षीतज्ञ) यांनी केला नैसर्गिक अधिवासात कृत्रिम पाणवठा
गेल्या काही दिवसांपासून मी श्री. किरण पुरंदरे (पक्षीतज्ञ) यांच्याबरोबर पक्षी निरीक्षणासाठी जात आहे.
खालील माहिती त्यांनी व्हाट्स अप वरती पाठवलेली आहे, अनेक वर्ष ते पशु पक्षांसाठी तसेच निसर्ग संरक्षण याबद्दल जनजागृती आहेत.
सध्या होत असलेल्या हवामान बदलामुळे ऋतुबदल होत आहेत, त्याचा परिणाम पशु पक्षी यांच्या जीवनावर सुद्धा पडत आहे, तीव्र उन्ह्याळ्यात व पाणी टंचाईत, पशु पक्षी यांना पिण्यास पाणी नैसर्गिक अधिवासाप्रमाणे मिळावे यासाठी ते कार्य करीत आहेत. हे कार्य जनजागृतीतून अधिक लोकांपर्यंत ते पोहोचेल व अधिक लोकसहभागातून कार्यास हातभार लागेल, हाच उद्देश आहे.