त्यांची लँग्वेज वेगळीय!
*इ.स.२०३० मधल्या इयत्ता दुसरीतल्या दोन मुलांचे फोनवरचं संभाषण!*
चिन्मय: अरे अन्वय तुला माहिताय का? या मोठ्या लोक्सची लँग्वेज काही वेगळीच असते.
अन्वय: म्हणजे?
चिन्मय: अरे आपल्याला तो कम्पल्सरी सब्जेक्ट नै का? मराठी? त्यात आपण नंबर्स कसे प्रोनन्स करतो? म्हणजे २०१ ला आपण वीस आणि एक म्हणतो किंवा ४९ ला चाळीस नऊ म्हणतो ना?
अन्वय: हो बरोबर!
चिन्मय: अरे पण हे मोठे लोक्स तसं नै म्हणत.ते २०१ ला दोनशे एक म्हणतात. ४९ ला चाळीस नऊ न म्हणता एकोणपन्नास असं काहीतरी म्हणतात.
