माणसे जोडणे ...
आपण "माणसं जोडण्याच्या" मोठमोठया गोष्टी करतो आणि नेहेमी त्याची महती गात असतो.
आपण मित्र जोडतो, इतर सहकारी जोडतो.
पण रक्ताच्या नात्यांनी आधीच आपल्याशी जोडलेल्या माणसांना "जोडण्याचा" प्रयत्न कधी का करत नाही?
बाहेरची माणसे जोडतांना आपण त्यांना गुणदोषांसकट स्वीकारतो पण नात्यातील माणसांना मात्र आयुष्यभर वेगवेगळ्या अपेक्षा आणि नियमांच्या खाली दाबून टाकतो आणि आपण स्वतः मात्र आपल्यात बदल करत नसतो. म्हणून ते अवघड आहे.
कुणी म्हणेल की मित्र निवडतांना चाॅईस असतो, नात्यात नसतो.