समाज
अखेर ऑस्करला लिओ भेटलाच
आजचा दिवस संपतांना एक समाधानाची भावना आहे …
कारण आहे लिओनार्डो दि काप्रिओ ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे जे ऑस्कर मिळाले तो क्षण ….
अनेक महान अभिनेत्यांना कधीच ऑस्कर मिळाला नाही आहे त्यात
लिओ पण येतो कि काय अशी धाकधुक मनाला होती, तसे ऑस्कर काही अभिनयाचे सर्वस्व नाही हे पण वास्तव आहेच पण तरीही
अखेर लिओला ती बाहुली मिळालीच !! अधिक कौतुक वाटले ते त्याने केलेल्या मनोगताचे ….
सारे मिळूनी खाऊ
बिल्डिंग च्या गेटमधून बाहेर पडताना आमच्या सोसायटीचा गार्ड तिवारीनं मला आवाज देत सलाम ठोकला. हाडकुळया तिवारीला पाहून याच्या कोणत्या गुणाकडे पाहून याला नोकरीस घेतला असेल हा प्रश्न मला नेहेमी पडतो. साहेब मी असं ऐकलं कि तुमच्या ड्रायबाल्कनी चा प्रोब्लेम अजून तसाच आहे,पुन्हा पाहू का प्रयत्न करून. मी म्हटलं, होतं कधी कधी चोक अप. ठीक आहे , कर पुन्हा एकदा प्रयत्न असं मी म्हणताच...साहेब ,चला तुम्ही पुढे , मी आलोच असं म्हणून तिवारीनं आपल्या सामानाची शोधा शोध सुरु केली. बायकोला तिवारी काय म्हणाला हे सांगताच. .पहा नाहीतर तुम्ही..गेल्या दोन महिन्यापासून सांगते आहे..पण तुम्ही मनावर घ्याल तेव्हा.
भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ६)
भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम !
वस्तुतः मानवजातीला सोने जड जवाहीर्यांसारख्या चकाकत्या वस्तुंच्या आकर्षणाचे रहस्य मानववंशास्त्राला अद्यापी पुर्णतया उलगडले नसावे. बाकी जगातल्या लोकांना सोन्याचे वेड नसतेच असे नाही पण त्यात संपत्ती प्रेम अधिक आहे, भारतीयांच्या सुवर्ण प्रेमाचे स्वरुप आभूषण प्रेमाचे असावे.
भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ५)
कुत्री पालन ---- भाग २ ---- बीगल
पहिल्या भागाची लिंक ===> http://www.misalpav.com/node/34821
आमची स्वीटी (लॅब्रेडॉर जातीची) देवाघरी गेली आणि मी मानसीक रोगी झालो.(साधारणपणे कुत्री पाळणारे बहूतेक जण ह्या स्थितीतून जातात.)
मी जिथे असेन तिथे स्वीटी माझ्या जवळच असल्याने, तिचा विरह मला सहन होईना.बायकोच्या आणि मुलांच्या लक्षांत ही गोष्ट आली.३-४ दिवस रडण्यातच गेले पण मनाला काही आराम मिळेना.शेवटी एक दिवस बायको म्हणाली की, आपण आता अजून एक कुत्री पाळू या.
ह्या वेळी मात्र एक ठरवले की, मोठे कुत्रे घेण्यापेक्षा एखादे छोटे-खानी कुत्रे घेवू.
भारत 'माझा' देश आहे , खरच ?
भारत 'माझा' देश आहे , खरच ?
मी आणि माझ घर या पलीकडे आपण कधी विचार करतो का ? घरातला कचरा कचराकुंडीत टाकतानाही आपण जराही काळजी घेत नाही . सरळ भिरकावून देण्याचा प्रयत्न करतो. मग तो कचरा कुंडीत वा बाहेर आपल्याला काळजी नसते . कारण हा रस्ता आपला नसतो . बसमधुन प्रवास करताना बसची आसने फाडली जातात त्यातुन स्पंज काढला जातो .कारण बस आपली नसते .देशातील विविध स्मारक ,पर्यटन स्थळ इथं जाऊन आपण परिसर अस्वच्छ करतो.अयोग्य मजकूर लिहिला जातो.कारण ही स्मारक ,पर्यटन स्थळ आपली नसतात.
भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ४)
भाग १ | भाग २ | भाग ३
-------------
काश्मीर प्रश्नाचे वेगळे[पण समजून घेण्यासाठी मी प्रथम त्याची जुनागढ आणि हैद्राबाद बरोबर तुलना करतो आणि मग तेंव्हाचा घटनाक्रम सांगतो.
जुनागढ भारतीय भूभागाला लागून होते. हैद्राबाद भारतीय भूभागाने वेढलेले होते. या दोन्ही संस्थानांची पाकिस्तानशी भौगोलिक जवळीक किंवा सलगता नव्हती. तर काश्मीर भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांबरोबर मोठी सीमा असलेले संस्थान होते.