भारत 'माझा' देश आहे , खरच ?
मी आणि माझ घर या पलीकडे आपण कधी विचार करतो का ? घरातला कचरा कचराकुंडीत टाकतानाही आपण जराही काळजी घेत नाही . सरळ भिरकावून देण्याचा प्रयत्न करतो. मग तो कचरा कुंडीत वा बाहेर आपल्याला काळजी नसते . कारण हा रस्ता आपला नसतो . बसमधुन प्रवास करताना बसची आसने फाडली जातात त्यातुन स्पंज काढला जातो .कारण बस आपली नसते .देशातील विविध स्मारक ,पर्यटन स्थळ इथं जाऊन आपण परिसर अस्वच्छ करतो.अयोग्य मजकूर लिहिला जातो.कारण ही स्मारक ,पर्यटन स्थळ आपली नसतात.
इथले रस्ते ,बगिचे,कार्यालय ,सार्वजनिक वाहतुक व्यवस्था ,जंगलं,स्मारक ,पर्यटन स्थळ यातल आपल काहिच नसत. म्हणून याची कोणतीही जवाबदारी आपल्यावर नाही .हे सगळ आपल नाही तर आपल काय आहे या देशात . म्हणूनच प्रश्न पडतो, खरच भारत 'माझा' देश आहे ?
प्रतिक्रिया
25 Feb 2016 - 1:21 pm | पैसा
आपल्याकडे वैयक्तिक स्वच्छता त्या मानाने बरी असते. सार्वजनिक स्वच्छता नेहमी दुसर्यांनी करायची असे साधारण दिसते. यासाठीच स्वच्छ भारत उपक्रम राबवलेला दिसतो.
तुम्ही याबद्दल जरा विस्तृत लेख लिहायचा होता.