मुक्तक

तू कितीसा उजेड पाडलास?

उपयोजक's picture
उपयोजक in जे न देखे रवी...
5 Mar 2021 - 8:30 am

सोमिवरच्या पोष्टी पाहून विचारलेच त्याने एकदा
बरा वेळ मिळतो तुम्हाला बघावं तेव्हा पडीक असायला.
सतत ऑनलाईन दिसता; रिकामटेकडे आहात का?

आता आली वेळ बौद्धिक घेण्याची या वैतागेश्वराची
म्हणालो "तुला रे का इतकी काळजी इतरांच्या वेळेची?"
गरज काय दुसर्‍याच्या खाजगी जीवनात डोकावायची?

४७ नंतर विज्ञानातली किती नोबेल मिळाली भारताला?
की मिळाले एखादे ऑस्कर इथल्या उत्कृष्ट सिनेमाला?
बघ करतोस का प्रयत्न यातले एखादे मिळवायला?

कवितामुक्तक

आठवणी

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
2 Mar 2021 - 6:07 pm

मनुष्य आहे तिथे त्याचे दुःखही आहे. माणसांच्या विविधते प्रमाणे त्याच्या दुःखांची श्रेणी आणि त्यांची कारणेही तितकीच अमर्याद. अपवाद फक्त एका गोष्टीचा. अब्जावधी श्वास जसे एका प्राणवायूने सुखावतात त्याप्रमाणे याच अब्जावधी मनांना बधिर करणारी समान जागतिक शक्ती म्हणजे आठवणी. विज्ञानाने सचित्र खुला केलेला विश्वाचा अफाट पसारा पाहताना आपण हरखून जातो. पण त्या प्रकाशाच्या मुक्त नृत्यालाही ज्याचं चित्ररूप अजून गवसलं नाही अशा मनात साठवल्या जाणाऱ्या आठवणींची तुलना फक्त चांदण्यांनी भरलेल्या आकाशाशी होऊ शकते.

धोरणमांडणीमुक्तकप्रकटनविचारलेख

ठिपके

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
2 Mar 2021 - 9:19 am

शहरदिव्यांचे पिवळट ठिपके
काळ्याकरड्या रस्त्यांवरच्या
धुरात भेसुर
चमचमण्याच्या
थोडे आधी
तिथून निघूया,

पाखरठिपक्यांच्या नक्षीला
भगव्यापिवळ्या मावळतीशी
किलबिलणारा
कंठ फुटेतो
जरा थांबूया
मग बोलूया,

चांदणठिपक्यांची रांगोळी
गारूड पाडून विस्कटण्याच्या
थोडी आधी
चंद्रधगीने
जरा वितळू दे
मग थांबूया.

कविता माझीकवितामुक्तक

तुलना नको!

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
1 Mar 2021 - 7:47 pm

एक वेगळा विचार मांडणारा लेख इथे देतो आहे. वेगळा अशासाठी की काही लोक अमुक तमुक मिळाले नाही म्हणून निराश होतात,हव्या त्या प्रमाणात मिळाले नाही म्हणून निराश होतात,चिडतात. अशा वेळी काही लोक सल्ला देतात. "त्या अमुक तमुक व्यक्तीकडे बघ.त्याला तर तुझ्यापेक्षा कमी सुविधा मिळाल्या तरीही तो बघ तुझ्या पेक्षा जास्त यशस्वी झाला." किंवा याच्या उलट "तो तमुक व्यक्ती बघ.त्याच्या तुलनेत तुझं बरं चाललंय.कशाला काळजी करतोस उगाच?"

मुक्तकजीवनमानविचारसल्ला

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
27 Feb 2021 - 11:24 am

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

लॅटीन लिपीतून मराठी मजकूर लिहिणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!

माझ्या फोनमधे मराठी/देवनागरी किबोर्ड इन्स्टॉल होत नाही, फोनमधे देवनागरीत कसं लिहायचं ते मला माहित नाही अशा थापा मारणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!

फोनमधे देवनागरीत लिहायला फार वेळ लागतो म्हणणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!

मित्र, छत्रपती हे शब्द 'मिञ', 'छञपती' असे टंकणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!

'हिंदी' शब्द मराठीत घुसवणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!

मुक्तकभाषाविचारअनुभव

एका तळ्यात होती...

शब्दसखी's picture
शब्दसखी in जनातलं, मनातलं
26 Feb 2021 - 7:52 pm

खूप लहान असल्यापासून एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे गाणं सतत कानावर पडत आलंय. हळूहळू त्याचा अर्थसुद्धा समजायला लागला. बदकाच्या पिल्लांपेक्षा वेगळ्या किंवा कुरूप दिसणाऱ्या राजहंसाच्या पिल्लाला एकटेपणाचा आणि अवहेलनेचा सामना करत अखेर स्वतःच्या राजहंस असण्याची आणि पर्यायाने त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असण्याची जाणीव होण्याचा हा प्रवास. त्यावेळी हे गाणं संपताना त्या राजहंसासाठी छान तर वाटायचंच पण बदकांची बरी जिरली असं पण वाटायचं.

मुक्तकप्रकटनविचारलेख

हे घे ते घे

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
23 Feb 2021 - 9:01 am

हे घे, ते घे

हे घे,ते घे
हे जमव, ते जमव.
अरे लागेल कधी तरी म्हणत,
घरात मोठ्ठं भांडार वसव.

भिंतीवर घड्याळे, हँगिंग्ज, चित्रे,
लटकलेली आहेत जागोजागी.
तरीही आणखी म्युरल्स हवीत,
जुनी फोटोफ्रेमही थोडी जागा मागी.
इंच नि इंच जागा लढवतो
तरी आम्ही नवीन वस्तू खरीदतो.

मुक्तकजीवनमानप्रकटनविचार

१ अप ४ डाऊन

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
22 Feb 2021 - 9:50 pm

२००,३०० किमी BRM झाल्यावर पुढच्या स्पर्धेचा किडा वळवळला. आमच्या वेळापत्रकात बसेल अशी स्पर्धा शोध चालू होता. सगळे पर्याय विचारात घेता १९ फेब्रुवारीला औरंगाबादला असणारी ६०० किमीच्या BRM ची निवड झाली. बरोबर स्वप्नील दाभोळकरआणि तेजानंद होतेच. अचानक ३ दिवस आधी रोशनची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली.आता आम्ही एकूण ५ जण झालो. आताशा BRM ला ग्रुप ने जायचं कि बोलेरोमध्ये सायकल टाकायच्या आणि बाकीच्यांनी कारने जायचं हे जवळपास समीकरण ठरूनच गेलाय. ३०० नंतर ४०० न करता डायरेक्ट ६०० ची झेप घेणं आव्हानात्मक होत. पण प्रयत्न करून बघू, आपल्याला जमेल असा विश्वास होता.

मुक्तकअनुभव

आतल्या आत

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
21 Feb 2021 - 8:33 pm

संदर्भचौकटी मोडून पडल्या तेव्हा
मी अधांतराचा धरला अलगद हात
मग रिक्तपणाने भरलो काठोकाठ
अन् ओसंडून सांडलो आतल्या आत

धगधगून निखारे विझून गेले तेव्हा
मी हिमपातावर कसून केली मात
मग पलित्यातळिच्या अंधारात बुडालो
अन् लखलख तेजाळलो आतल्या आत

भ्रमनिरास बनले जगणे सगळे तेव्हा
मी सुखस्वप्नांचा सहज सोडला हात
जरी भोवतालच्या कोलाहली विस्कटलो
उलगडलो अवघा पुन्हा आतल्या आत

कविता माझीकवितामुक्तक