मुक्तक

जेव्हा अदम्य ऐसी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
18 Feb 2021 - 6:27 pm

जेव्हा अदम्य ऐसी
निद्रा कवेत घेते
आकाशभाषितांना
ध्वनिचित्ररूप येते

अंधार भिनत जाता
भवताल स्तब्ध होते
संवेदनांस अवघ्या
व्यापून साक्षी उरते

दिग्बंध सैल होती
तर्कास काम नुरते
कालौघ थांबतो अन्
आभास सत्य होते

अज्ञातशा स्वरांचा
अनुनाद ऐकू येतो
एकेक जाणिवेचा
अस्पष्ट बिंदू होतो

निद्रा अशी कृृृृपाळू
अंकी तिच्या मी क्लांत
मी शून्य एरवी, पण
निद्रेत मी अनंत

माझी कवितामुक्तक

मुक्त

सरीवर सरी's picture
सरीवर सरी in जे न देखे रवी...
14 Feb 2021 - 11:25 pm

आभाळातून बरसून ही
पानावरच्या दवासम अस्तित्व
मिसळायच नाही वाहायच नाही..

अनाहूतपणे भेटून ही
स्वप्नांचा कापसासम स्पर्श
बांधून नाही हूरहूर नाही..

भेटीची ओढ असूनही
अनवट वाटेसम गूढ
टाळणार नाही विसरणार नाही..

कविता माझीकवितामुक्तक

कहानी पूरी फिल्मी हैं!

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
13 Feb 2021 - 3:47 pm

फेसबुकवर सिनेमागली नावाचा एक ग्रुप आम्ही चालवतो. त्यावर नुकतीच कहानी पूरी फिल्मी हैं ह्या नावाची स्पर्धा घेतली..
त्यानिमित्ताने लिहिलेलं..

#CinemaGully
#कहानी_पूरी_फिल्मी_हैं

"राजहंसाचे चालणे जगी झालेया शहाणे,
म्हणून काय कोणी चालूच नये की काय!"

ह्याच चालीवर आम्ही म्हणतो,

'राज अन राहूलचे तराने, ऐकले कितीदा जगाने!
म्हणून आमचे गाऱ्हाणे, ऐकूच नये की काय!

मुक्तकविरंगुळा

आण्णामहाराज!!!

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
12 Feb 2021 - 8:27 pm

"घे गरमागरम चहा.थोड्यावेळाने पोहे करते गरमागरम."

"काय झालं? यांनी तरी दिला का सकारात्मक प्रतिसाद?"

"कळवतो म्हणाले."

"हात्तिच्या.म्हणजे नेहमीसारखंच."

"हो नेहमीसारखंच.तुम्हाला बरं वाटलं ना?"

"विवेक किती चिडतोस? नीट बोल त्यांच्याशी"

"कशाला? आण्णामहाराजांची टेप ऐकायला?"

"अरे! तुझा काहीतरी प्रॉब्लेम आहे,सुटायला अवघड आहे म्हणून सांगतात ना ते?"

"काय सांगतात? आण्णामहाराजांची पोथी वाच, त्यांच्या समाधीवर डोकं टेकून ये हे सांगतात? त्यानं काय होणारेय?"

मांडणीमुक्तकप्रकटनविचार

काही अविस्मरणीय डायलाॅग ....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
6 Feb 2021 - 7:12 am

हिंदी आणि मराठी, सिनेमे बघत असतांना, काही डायलाॅग, आयुष्यभर साथ देतात....तसे, हे डायलाॅग, असतात एक ते दोन वाक्यांचेच, पण, जबरदस्त परिणाम करतात ....

लोहा, लोहे को काटता है.

सिक्के और आदमी में, यहीं तो फर्क है.

सोन्या, तुम जानती हो की, ये रिव्हाॅल्व्हर खाली है, मैं जानता हूं के ये रिव्हाॅल्व्हर खाली है, लेकिन, पुलिस नहीं जानती हैं की, ये रिव्हाॅल्व्हर खाली है ..

डाॅन को पकडने की कोशीश तो, ग्यारह मुलकों की पुलीस कर रहीं है.

मुक्तकचित्रपटप्रकटनविचार

तुम्हे अल्फाजों मे..... २

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
27 Jan 2021 - 7:52 am

मी कॉफीचा कप घेऊन येतो आणि म्हणतो. मी का आलो माहिती आहे? काल फोनवर विसरलो होतो. हॅलो म्हणायचं. ते सांगायला....

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........
..................... चकोर शाह.

मुक्तकप्रतिभा