श्वास...
श्वास...
जीर्ण झाली सारी पाने
आता हवा एक देठ नवा
तिच फुले अन तेच वारे
आता हवा गंध नवा
सावल्यांनी घेरले आहे
आता हवा एक सूर्य नवा
ओशटलेली सारी नाती
आता हवा एक बंध नवा
जुने झाले श्वास सारे
आता हवा एक श्वास नवा
राजेंद्र देवी
श्वास...
जीर्ण झाली सारी पाने
आता हवा एक देठ नवा
तिच फुले अन तेच वारे
आता हवा गंध नवा
सावल्यांनी घेरले आहे
आता हवा एक सूर्य नवा
ओशटलेली सारी नाती
आता हवा एक बंध नवा
जुने झाले श्वास सारे
आता हवा एक श्वास नवा
राजेंद्र देवी
नुसताच फुत्कार नको...आता डसून दाखवा.....
भारतभूच्या सुपुत्रांनो ...आता करुनच दाखवा......!
शब्दाचा मार फक्त शहाण्यालाच...मूर्खांना लाथाच घाला....
लाखो अश्राप मातापित्यांचे अश्रू, त्याविना कसे थांबती बोला ?
आताही काही बोललो नाही... तर उरणार नाही कणा....
आता नजरा तुमच्यावर आहेत... हर हर महादेव म्हणा...!
... असंही होतं ना कधी कधी....
अंगणातलं सुखाचं बी
बहरातली पाखरांची गाणी
हरवून जातात कुठंकुठं....
पण मनाचा सर्च कायम असतो
दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार
मनातलं मांजर हसतंच कि मजेदार!
... असंही होतं ना कधी कधी....
बियांना कोंब येईपर्यंत
आपलाच नसतो पेशन्स !
दु:खाच्या माजणार्या ताणावर
आपलाच नसतो कंट्रोल!
वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो,
पण तशा वैराण रानातही
एखादे रानफुल हसून बोलतंच कि
एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि!
... असंही होतं ना कधी कधी....
इंजिनीयरींगची चार वर्षे...
तसे सगळेच इंजिनीयर स्वत:ला आम्ही चार वर्षे घासून इंजिनीयरींग पुर्ण केली असं म्हणतात. अगदीच खरंय हे. मि व माझ्या साथीदारांसाठी ती घासाघासीच होती. सुरुवात होते ती अगदी कॉलेजच्या लोकेशनपासून.
कॉलेज तसं अडगळीत, ग्रामिण भागात. आजूबाजूला लोकवस्ती विरळ. ७-८ किलोमिटर वर बाजारपेठ. बाजारपेठेपासून कॉलेजपर्यंत दिवसाला दोनच बसेस. रिक्षासाठी २ किलोमिटर पर्यंत पायपीट करावी लागायची. बाईक्स मोजक्याच. त्याही दिवसभर कुणी ना कुणी ठरवलेल्या असायच्या. कॉलेजला करमणूक म्हणून लेडीज हॉस्टेल, कँटीन, ग्राऊंड नाहीतर वेज प्लॉट.
कुठेतरी फुललेलं फुलपाखरु आणि लाल फुलांचा सडा असावा
वाटतं मला
काही पक्षी रंगीबेरंगी किडे बाजरीचं कणीस पाणी चौफेर असावं
वाटतं मला
आभाळ झळाळून ऊन पडावं
पंक्चर झालेल्या सायकलला वंगण लावून दमडावं
रीम वाकडी व्हावी चिखलात चाक रुतावं खांद्यावर घेऊन घरला चालत जावं
असावी म्हणून ठेवलेली
दाढी
चांगली हातभर वाढली
जंगलातून भुत बाहेर पडावं
तश्या माझ्या कविता
अचानक आलेल्या
जरीची टोपी घालूनंच
मी कविता लिहायला बसतो
अगदी राजबिंडा
दारी श्रावण दारी साजण....
पाऊस आला पाऊस आला
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
सरींवर सरी अशा कोसळल्या
डोळ्याच्या कडा ढासळल्या
असा काही बरसला श्रावण
न्हाऊन निघाली तुझी आठवण
रोज खेळते आठवणींची भातुकली
वाट पाहते तुझी एकली, तुझी एकली
कळलेच नाही कधी ठाकला
दारी श्रावण दारी साजण....
राजेंद्र देवी
नाही पुरेसे....
जगात शर्यती खूप आहेत
नाही पुरेसे चपळपण सशांचे
नको राहूस आळशी
ठेव आदर्श कासवांचे
चांगुलपणाचे दाखले नुसते
नाही पुरेसे दाखवायचे
लाव हातभार तू पण
जग हे आसवांचे
विझण्यास सूर्य
नाही पुरेसे ढग पावसांचे
नको राहूस कोरडा
ढाळ चार दोन थेंब आसवांचे
राजेंद्र देवी
दिशा
स्थापना तुझी करतात गणेशा
पण मागत नाहीत बुद्धी हे ईशा
धांगडधिंगा अन सैराट वागणे
लाज वाटत नाही लवलेशा
कोठे चाललो आहोत आपण सारे
कधी करणार विचार हे गणेशा
तूच कर आता चमत्कार काही
थांबव या मानवाच्या विनाशा
ढोल, ताशे, डिजे कल्लोळ नुसता
फाटून गेले कर्ण या कर्कशा
नाही ठेवीत पावित्र्य सणांचे
सापडत नाही यांना योग्य दिशा
राजेंद्र देवी
cursor च्या सुईने
inbox मधील पत्रे
क्लीक्लिक्लीक्लिकत शेवटी
हव्या त्या पत्राशी आल्यावर,
अत्तराच्या डोळ्यांनी पहातवाचत,
blank page वर नजर खिळवून
काय काय लिहून पाठवायचे परत
याचे तासनतास जाळे विणतेच कि मन!
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी?
शिवकन्या
श्रावणभुल
एक शलाका नभास छेदून गेली
तुझ्या आगमनाची वर्दी देऊन गेली
विचाराने तुझ्या, हृदयी धडधड वाढली
जणू ज्वालामुखीने धरणी कंप पावली
तुझ्या आगमनाची सारी तयारी झाली
मेघांनी सारी सृष्टी न्हाऊन गेली
सारे रस्ते सजले फुलांनी
श्वासात सारे वास मिसळून गेली
ऊन सावलीचे खेळ खेळता
श्रावणभुल पण हरखून गेली
राजेंद्र देवी