थोडी कॉफी, थोड्या गप्पा
6.30 pm
You are late.
I always am.
हम्म..
come on! एक तर इतक्या महिन्यांनी भेटतोय. वेळेवरून ऐकवणार का?
का ऐकवू नये? मी काय तुझी गर्लफ्रेंड किंवा बायको आहे का? तुझं मन जपायला?
बोर नको करूस. छान दिसतेयस.
thanks. पण विषय बदलू नकोस.. मगाचपासून इथे एकटी बसलेय. वेटरला मी इतकी बिचारी वाटले की माझी कॉफीची सुद्धा ऑर्डर घ्यायला आला नाही.
हां बाई, sorry. तुला सवय नसेल ना अगदीच, कुणा मुलाची वाट बघायची?
of course. कशी असेल? तुझ्यासारखे नमुने कमीच. चल आता, I need coffee.