नको ना रे
नको रे नको
नको म्हटलं ना
नको
नक्को ना. नको.
अं हं
न
नको
न न
नको
नक्को ना रे
नको
नको रे नको
नको म्हटलं ना
नको
नक्को ना. नको.
अं हं
न
नको
न न
नको
नक्को ना रे
नको
उडून गंध चालल्या फुलास वाटते
तसे कसे सुने - सुने उदास वाटते.
कधी वसंत येईल, बहरेन मी पुन्हा
झडून पान चालल्या तरुस वाटते.
पवन तुला करीत स्पर्श जातसे अता
दरवळला चहूकडे सुवास वाटते.
कशास जन्म हा जगून काढला इथे
उगाच का असे - तसे मनास वाटते.
निघून चाललीस तू इथून ज्या क्षणी
तिथेच संपला असे प्रवास वाटते.
दीपक पवार.
फिरुनी केली मनात दाटी जुन्या क्षणांनी
टिपे जराशी झरुनी गेली गालावरुनी.
जुन्या फुलांचा जुना सुगंध अवती भवती
किती क्षणांची घुटमळ जुन्या रस्त्यावरती
फिरूनी ओठावर येती पुन्हा जुनीच गाणी.
किती रेशीम क्षणांचा गुंता गुंतत असता
कुणी उसवला नाही मी पण व्यापून जाता
पसा गतकाळाचा भरला तुटलेल्या धाग्यांनी.
देठ तुटताना तेव्हा रडले होते पान पान
असे उठले होते वादळ उजाड हा माळरान
सडा सुकलेल्या फुलांचा गेला गंध उडुनी.
झोपली होती दुपार
घेऊन कोवळ्या उन्हाला
आवाज शांत स्पंदनांचा
ऐकू येई मनाला
तिरीप कोवळ्या उन्हाची
जणू दुपारची एकदाणी
झोपण्या आधी दुपारं
गात होती बडबड गाणी
पहुडली सुखाने अलवार
पांघरून पदर थंडगार
विसरून मध्यान्हीचा ताप
निष्पाप सवे जीवाच्या झोपली दुपार....
नभावरची साय
ऊतू ऊतू जाई,
गंधवेडी अवनी
बहरली रानो वनी||१||
फेसाळला नदीकाठ
ऋतू फुलांची गर्दी दाट
हिरव्या पदरावरती
दव मोती भरती ||२||
भिरभिरणाऱ्या अंगणात
फडफडती भिंगोरी पंखात
बरसणाऱ्या सरी धारा
काळजाचा गार निवारा||३||
-भक्ती
पेरणा :- तेच तेच पुन्हा पुन्हा http://misalpav.com/node/50115
शशक २०२२ मधली ही गोष्ट वाचली आणि पुन्हा एकदा विचार करू लागलो. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला ठाऊक असूनही त्या मार्गाकडे पावले का बरे वळत नाहीत? पुन्हा पुन्हा फिरून याच पिंजर्यात अडकावेसे का बरे वाटते? असा विचार करत असतानाच कानावर अरुण दातेंचा आवाज आला आणि मग जे सुचले ते पटकन लिहून काढले
चक्रव्युह
भोग हे भोगून संपवायचे
नाहीतर चक्रात अडकायचे
मेघ भरूनी येताना रिमझिम धारा झरताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.
रिमझिमती असते बरसात
चिंब चिंब भिजलेली रात
कोंब प्रीतीचे मनात माझ्या हळुवार रुजताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.
मृदगंध भारला वारा
भारी गंधाने गगन धरा
वार्यात मिसळल्या मातीच्या गंधावर झुलताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.
हे तरूवर सर्व स्तब्ध शांत
सभोती उदास हा एकांत
अंतरात या तव स्मृतींचा दिप हा जळताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.
नको आता वेदनांचे प्रमाण पुन्हा एकदा
नको आता आनंदाला उधाण पुन्हा एकदा
नको ग्रीष्मात सोनेरी क्षणाची सावली
नको आता सुखाचे विधान पुन्हा एकदा.
हरवून गेले ओळखीचे रस्ते संभ्रमामध्ये
नको आता ते आयुष्याचे भान पुन्हा एकदा.
डंख होतो पुन्हा पुन्हा स्वप्नांच्या इंगळीचा
नको आता निद्रेला अवताण पुन्हा एकदा.
देवा तुच धर हात माझा या मावळतीला
झालो आहे बालकासम अजाण पुन्हा एकदा.
मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले
अजूनी होते हवे ते परी न आता उरले
उबदार किती ते वाटे गारठ्यामधे
लेवून अंगी जणू चिलखत ते भासे
कितीही संकटे आली जरी
घाव वर्मी ते सोसतसे
किती निगूतीने वस्त्र निर्माण केले
उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले
शिलाई नाजूक टाके अचूक
रंग तयाचे भरदार असले
या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण
कुणी न विणकर आता न विणणार
भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला
पुन्हा कधी न उमटे
इंदिरा संतांची एक नितांत सुंदर कविता "पत्र लिही पण नको पाठवू". पण आजकाल पत्र तर सोडाच, हातानं लिहिणंसुद्धा दुर्मिळ झालंय. संवाद होतो तो मेसेज आणि इमोजीमधून.
इंदिरा संतांच्या त्या कवितेवर आधारित ही कविता.
* शेवटचं कडवं मूळ कवितेतील तसंच ठेवलंय.
उत्तर दे पण संदेशातुन
नको पाठवू बदाम रक्तिम,
रुक्ष कोरड्या जगण्यामध्ये
कसा साठवू पाउस रिमझिम?
नको पाठवू इमोजीतले
लाजाळू अन् सुमुख हासरे,
खुलता हासू ओठांवरती
प्रश्न विचारत बसती सारे.