पेरणा :- तेच तेच पुन्हा पुन्हा http://misalpav.com/node/50115
शशक २०२२ मधली ही गोष्ट वाचली आणि पुन्हा एकदा विचार करू लागलो. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला ठाऊक असूनही त्या मार्गाकडे पावले का बरे वळत नाहीत? पुन्हा पुन्हा फिरून याच पिंजर्यात अडकावेसे का बरे वाटते? असा विचार करत असतानाच कानावर अरुण दातेंचा आवाज आला आणि मग जे सुचले ते पटकन लिहून काढले
चक्रव्युह
भोग हे भोगून संपवायचे
नाहीतर चक्रात अडकायचे
स्वप्नात गुरफटून रहाणे
टाळती का बरं शहाणे?
अनुभव त्यांचे ऐकायचे
मोजून श्वासाची खोली
आवर मनास घाली
स्वत:ला आतुन बघायचे
थरारे मनाची पाती,
कंपने शरीरा वरती
मनाने स्थिर राहायचे
माझ्याया मनाच्या पाशी
करुणा दाटो जराशी
पसायदान हे मागायचे
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
27 May 2022 - 10:14 pm | राघव
हे मस्त जमलंय! क्लास! आवडले!! :-)
28 May 2022 - 7:57 am | प्रचेतस
सुरेख.
28 May 2022 - 9:58 am | Bhakti
माझ्याया मनाच्या पाशी
करुणा दाटो जराशी
पसायदान हे मागायचे
_/\_ हे आलं की जिंकलो!
28 May 2022 - 11:17 am | चांदणे संदीप
मस्तच.
सं - दी - प
28 May 2022 - 12:26 pm | सस्नेह
माझ्याया मनाच्या पाशी
करुणा दाटो जराशी
हे आवडले
28 May 2022 - 1:09 pm | चौथा कोनाडा
व्वा, सुंदरच !
💓
शेवटीचे कडवे .... एक नंबर !
28 May 2022 - 2:04 pm | तुषार काळभोर
मस्त!!
30 May 2022 - 6:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
क्या बात!! विडंबने कमी करुन असं जास्त लिहित चला!
30 May 2022 - 8:17 pm | कर्नलतपस्वी
+1
23 Jun 2022 - 2:56 pm | कुमार१
सुरेख.